Sunday 13 October 2013

देवाचा विश्वास असलेले चित्रकार वासुदेव कामत


शनिवारच्या (१२ ऑक्टोबर २०१३)  चतुरंग मध्ये चित्रकार वासुदेव कामत यांची   मैफल वाचली आणि २ ऑक्टोबर २०१० मध्ये मोगरा फुलला प्रदर्शन पहिल्याची  आठवण झाली. लोकसत्तेतील प्रदर्शनाची बातमी वाचून आम्ही सहकुटुंब जहागीर आर्ट , म्हणजेच कलेच्या पंढरीला गेलो होतो. प्रदर्शन पाहून सगळ्या संताच्या रुपात विठ्ठल दर्शनाचा आनंद मिळाला होतो. ज्ञानेश्वर, तुकाराम,एकनाथ,चोखामेळा , रामदासांपासून ते मीराबाई, जनाबाई, मुक्ताई,नरसी मेहता,शिखांचे गुरु गुरुनानक,शंकराचार्य,   कान्होपात्रा, कबीर,   सूरदास, कनकदास, निवृतीनाथ असे अनेक संत प्रदर्शनात अवतरले होते. एक एक संत वचनाचा/शिकवणीचा  अर्थ प्रकट करणारी चित्र मालिका, मनाला भावणारी. आनंद देणारी होती. कालच्या लेखाने पुनर्प्रत्येयाचा आनंद झाला  .

 
 
 
 
 
 
 
त्यावेळी  आचार्य विनोबा भावे यांच्या  चित्रा  सोबत    चित्रकार कामतांचे छायाचित्र  घेता आले होते त्याचा  आनंद  अवर्णनीय होता. 
 



 
चित्रकार कामतांचा वावर आपल्या परिसरात होता त्यांनी चितारलेले श्रीमत शंकराचार्य मंदिर , निर्मळ 
 
 
चतुरंग मैफल मध्ये सरांनी आपल्यातील चित्रकाराचे  सूर आळवलेले आहेत.त्यामुळे चित्रा मागची त्यांची भूमिका आपल्याला कळते व आपणास चित्र बघण्याची दृष्टी मिळते.  सर म्हणतात 
 
 कलेच्या क्षेत्रात सातत्यशील अभ्यास आणि सराव (रियाझ) तितकाच महत्त्वाचा आहे, कारण कलानिर्मितीसाठी वापरात येणारे साधन हे माध्यम आहे. त्याची यथायोग्य हाताळणी करणारे आपले हात आणि संपूर्ण शरीर हेदेखील माध्यम आहे आणि पुढे जाऊन असे म्हणू की, या शरीराशी संलग्न आपले मन-चित्त हेसुद्धा माध्यमच आहे. या मनाला आणि शरीराला एकाग्रतेचा सराव द्यावा लागतो. अशा सिद्धतेने तयार झालेल्या कलाकृतीमधून मनाला होणारी समाधानाची जाणीव करून घेणारा आपल्यामध्ये कुणी वेगळाच असावा असे वाटते. बहुतेक याच अनुभूतीला ज्ञानेश्वर 'नेणीव' असे म्हणतात. अशा अर्थाने आपण करीत असलेल्या कलानिर्मितीत 'आध्यात्मिक' अनुभूतीचा अंश आहे, असे समजणे गैर नाही.
बालपणी घरून चित्रकलेला प्रोत्साहन होते, तसेच चांगल्या कलाशिक्षकांचे मार्गदर्शनही मिळाले. याबरोबरच अंधश्रद्धेचा स्पर्श होऊ न देता घरातून भक्तिमार्गाची धार्मिक बसकण होती. पुढे योगायोगाने भगवान बुद्धांनी शिकविलेली 'विपश्यना' विद्येची शिबिरे केल्याने आपल्या प्रत्येक कृतीशी आणि विचारांशी स्थितप्रज्ञ होऊन जागरूकतेने पाहण्याची कला आत्मसात करता आली. भगवान बुद्ध 'प्रज्ञा' विषयाचे तीन टप्प्यांत वर्गीकरण करतात. श्रुतमयी प्रज्ञा, चिंतनमयी प्रज्ञा आणि भावनामयी प्रज्ञा. जे जे आपण पाहतो, वाचतो, ऐकतो, इंद्रियांनी अनुभवतो ते श्रुत ज्ञान. याला आपण निरीक्षण (Observation) म्हणू. ही ज्ञानाची पहिली पायरी. त्यानंतर येते ते निरीक्षणासंदर्भातले चिंतन. (Thoughtful Process) या ठिकाणी आपण अनुभवलेल्या गोष्टींचे मूल्यांकन, योग्य-अयोग्य निवड करतो आणि तिसरी पायरी 'भावनामयी प्रज्ञा'ची. याचा प्राचीन अर्थ प्रत्यक्ष कृतीमधून अनुभूती. या तीनही पायऱ्या अभिजात कलेच्या सर्जनप्रक्रियेत अंतर्भूत असतात. यातली एक जरी पायरी वगळली तर ती कलाकृती कमजोर ठरेल. निरीक्षणामुळे त्या निर्मितीला सत्याचा आधार असतो. चिंतनामुळे निरीक्षणाला योजकता आणि रचना कुशलता (creativity) प्राप्त होते. ती कलाकृती केवळ अनुकरण ठरत नाही आणि शेवटी प्रत्यक्ष कृती ही कलाकृतीला साकार रूप देत असते. प्रा. कोलते सरांचे एक चांगले वाक्य आहे. ते एका ठिकाणी म्हणतात की, 'मी पाहून चित्र काढत नाही, तर काढून चित्र पाहतो.' सरांचे हे विधान त्यांच्या कलानिर्मितीचे मूलाधार आहे; अनेक कला विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे आहे. माझ्या 'बोध' चित्रांमध्येदेखील मी जे काही दाखवतो ते नुसते पाहून काढलेले नसते तर माझ्या विचारांचे मूर्त स्वरूप असते. 'विचार' हा माझ्या चित्रांचा विषय असतो आणि पूर्ण चित्रांतून तो अभिव्यक्त करण्याचा माझा प्रयत्न असतो.
 
संत कबिरांच्या काही दोह्य़ांवर आधारित मी चित्रे रंगविली त्या वेळी त्यांच्या एका दोह्य़ाने अत्यंत प्रभावी झालो.
कबीरा मन निर्मल भया जैसे गंगा नीर।
पीछे पीछे हरि चले कहत कबीर कबीर।।
हरी जाणून घेण्यासाठी हरीचा नामजप करीत भजन करणाऱ्या कबिराचे मन गंगाजलासारखे निर्मल झाले, त्यात आता कुठलीच आसक्ती राहिली नाही. अगदी हरीच्या साक्षात्काराचीदेखील आसक्ती उरली नाही. त्यामुळे ज्याचा नामजप करायचा तो हरीदेखील कबिराच्या मागे राहिला. आत्मज्ञानाचा साक्षात्कार झालेला कबीर आपल्या मस्तीत चालला आहे आणि त्याच्या मागून हरी कबिराच्या नामाची माळा जपत अनुसरण करतोय असे हे चित्र. या चित्रात भगवंताचा चेहरा दाखविलेला नाही. जणू तो आपला 'नेति नेति' असा परिचय घेऊन चालला आहे.
जेव्हा हे चित्र तयार झाले तेव्हा सर्व संतांच्या ओळींचा साक्षात्कार त्या त्या संतांना कसा झाला असावा याचा विचार करून 'मोगरा फुलला..' हे चित्रमालिका रंगविण्याचे ठरविले. या चित्रमालिकेने मला खूप काही दिले. विचारांना आणि चित्रांना आध्यात्मिक रंग कसा चढतो याची अनुभूती मला आली. आकाशगुंफेच्या उंबरठय़ावर बसलेले ज्ञानेश्वर, ताटी उघडा म्हणून साद घालणारी मुक्ताई, मंदिराच्या बंद दरवाजाबाहेर विठू रूप घेऊन नाचणारा चोखामेळा, 'इथं का उभा तू श्रीरामा' म्हणून विठ्ठलाला जागविणारे रामदासस्वामी, 'ठुमक चलत रामचंद्र' म्हणणारे संत तुलसीदास आणि असे एकेक करीत नास्तिकालाही आस्तिकतेचे भान आणणारे अगदी अलीकडचे संत विनोबापर्यंत अनेक संतचित्रांनी माझ्या मनावर खोलवर संस्कार केले. प्रदर्शनात साश्रुनयनांनी चित्रातल्या भावार्थाशी तादात्म्य पावणारा रसिक प्रेक्षक पाहिला. तो अपूर्व सोहळा होता.


Wednesday 9 October 2013

संजीवनी, पालक शिबिर

संजीवनी परिवाराने दिनांक ६ ऑक्टोबर २०१३ रोजी पालक शिबिराचे आयोजन दोन सत्रां मध्ये  केले होते. प्रथम सत्र १३ वर्षापर्यंत पाल्यांच्या पालकासाठी होते तर दुसरे सत्र १३ वर्षावरील पाल्यांच्या पालकासाठी होती. दोन्ही पालकांनी उपस्थित राहावे असा प्रयत्न होता. परंतु प्रथम सत्रात एकूण ३५ पालाकापैकी ११ सिंगल पालक होते. दुस-या सत्रात एकूण ३३ पालाकापैकी ७ सिंगल पालक उपस्थित होते. सहभागी झालेल्या पालकांचा शिबिराविषयी चांगला अभिप्राय होता व पालकांसाठी  अशी शिबिरं व्हायला हवीत असे सांगणे होते.



 
काही प्रकाशचित्रे , व स्टडी मटेरीअल
 

 

            सुजाण पालकत्व -पालक शिबिर              

                             संजीवनी  परिवार   

 


 

 

 

 

 

शनिमंदिर,फुलारे,वाघोली       

ऑक्टोबर २०१३

 

 
 

Quick Reminders:                                                                              लक्षात असू ध्या !

Alternatives to Punishment             शिक्षेला पर्याय

 

ü  State your feelings                                   तुम्हाला काय वाटतंय ते सांगा,

ü  State your expectations                            तुमच्या अपेक्षा सांगा!

ü  Show how to make amends [corrections] सुधारणेचा मार्ग दाखवा.

ü  Offer a choice                                            वेगवेगळे पर्याय शोधा

ü  Take action                                                निर्णय घेऊन, अंमलबजावणी करा

                                                 


Skills for engaging Co-operation

 

ü  Instead of giving orders,               आज्ञा करण्यापेक्षा

o   Describe the problem.                                 स्वरूप समजावून ध्या

ü  Instead of attacking the teenager, ओरडण्यापेक्षा

o   Describe what you feel.                          तुम्हाला काय अपेक्षित आहे ते सांगा.

ü  Instead of blaming,                          दोष देण्यापेक्षा

o   Give information.                           माहिती पुरवा, उत्तर शोधण्यास मदत करा.

ü  Instead of threats or orders,             धमकावण्यापेक्षा

o   Offer a choice.                                          मार्ग/पर्याय सुचवा

ü  Instead of a long lecture,                  व्याख्यान देण्यापेक्षा                

o   Say it in a word.                                               नेमक्या शब्दात सांगा.

ü  Instead of pointing out what’s wrong,    चूक शोधण्यापेक्षा

o   State your expectations or values.         योग्य /अयोग्य ठरविण्यात मदत करा

 

 


 

 

 मुलांशी संवाद  साधताना     

 

मुलांशी सुसंवाद राखण्यासाठी काही गोष्टीची काळजी घेणे महत्वाचे आहे. एरवी हसरी खेळती मुले पालकांशी बोलताना अबोल किवा घुमी होतात.

 

मुलं काय सागतात ते  ऐका  : मुलं जेव्हा काही सांगत असतात तेव्हा लक्ष देऊन ऐका. ऐकण्या मुळे खूपशा प्रश्नाची उकल होते. रात्रीचं जेवण सर्वांनी एकत्र घेतलं तर दिवसभरातील घडामोडीवर बोलता येते जिव्हाळ्याचे बंध हि निर्माण होतात.

तात्पर्य काढण्याची घाई करू नका. मुलांना वाटले पाहिजे कि आपले म्हणणे संपूर्ण ऐकले जाईल. त्यावर चर्चा होईल. अश्या विश्वासा मुळे वातावरण मोकळे राहण्यास मदत होईल

भाषेकडे लक्ष ध्या :  चुकीची भाषा वापरणे टाळा. नेहमी रागावू नका.

मुलांच्या केलेल्या  सूचना/कल्पने विषयी आदर दाखवा : मुलांनी एखादी कल्पना मांडल्यास ताबोडतोब खोडून काढू नका. तीच योग्य ते मूल्यमापन करा, त्याच्याशी चर्चा करा, योग्य सुचनांचं , कल्पनेचं स्वागत करा.

तडजोड करा : एखादी गोष्ट खेचून धरू नका , विचारविनिमय करा, त्यातून मार्ग काढा.

आपुलकी / जिव्हाळा दाखवा : आपल्या भल्याची पालकांना काळजी आहे, त्या साठी धडपड आहे हे मुलांना दिसू ध्या. त्याच्या छोट्या छोट्या यशा बद्दल आनंद प्रकट करा. कौतुक करा.

शब्दाविण संवाद साधण्याची कला अवगत करा. खूप वेळा मुलं मोकळेपणे बोलत नाहीत. त्याचं काही बिनसलं आहे ते कळू देत नाहीत. त्यांच्या देहबोली वरून , वागण्या वरून काही गोष्टी आपल्याला वाचता यायला हव्यात.

स्पष्टीकरण : गैरसमज दूर करा, रागावला असाल तर त्याचे कारण मुलांना कळू ध्या, म्हणजे सुधारणा होण्यास मदत होईल.

सुसंवादाची आशा सोडू नका :  रागावून अबोल धरणे म्हणजे संवादाची दारे बंद करणे असे करू नका.

 

 

पालकत्वाच्या वेगवेगळ्या पद्धती

पालकत्व ही मुळातच एक मोठी जबाबदारी असते. ही जबाबदारी घेत असताना आईवडील म्हणून त्यांना काही नियम हे लागू असतातच; परंतु आई किंवा वडील अशी भूमिका निभावताना त्या पाठीमागे असलेली "व्यक्‍ती' पालकत्व निभावताना अडचणीची ठरू शकते. उदा. आई जर करिअरीस्ट असेल तर ती व्यक्‍ती म्हणून यशस्वी असेलही; पण आई म्हणून अपयशी ठरण्याची शक्‍यता असते. म्हणूनच एक स्त्री आणि पुरुष जेव्हा लग्न करतात तेव्हा दोन भिन्न व्यक्तिमत्त्वे घेऊनच पुढे आईवडिलांच्या भूमिकेत जातात. एकंदर पालकत्व निभावताना संशोधकांनी तीन  प्रकारचे पालकत्व मांडले आहे. यामध्ये दोन्हीही पालकांचा प्रकार एक असू शकतो किंवा वेगवेगळा असू शकतो, तर हे प्रकार आता आपण पाहू.

1)अधिकार दर्शक पालकत्व (Authoritarian Style):
या प्रकारचे पालक आक्रमक आणि मुलांवर सत्ता गाजवणारे असतात. त्यांचा घरामध्ये चांगलाच धाक असतो. ""सर्व काही माझ्या मर्जीने व्हायला पाहिजे'' असा त्यांचा हट्ट असतो. शिस्तीचा अतिरेक आणि नियमांचे काटेकोर पालन हे या प्रकारच्या पालकांचे वैशिष्टय असते. अशा पालकांसमोर मुले दबून आणि सतत दडपणाखाली असतात. असे पालक मुलांवर छोट्या छोट्या गोष्टींसाठी रागावतात, चिडतात, प्रसंगी मारहाण सुध्दा करतात. जर वडील या प्रकारात असतील, तर ते मुलांना सतत सूचना किंवा हुकूम सोडत असतात आणि त्यांच्या मुलांकडून असलेल्या अपेक्षा एकतर्फी असतात. आई या प्रकारच्या पालकत्वामध्ये असेल, तर मुलांच्या एकंदरीतच वागण्या बोलण्यावर, अभ्यासाबाबत, इतर गोष्टींबाबत आक्षेप असतो. जर दोघेही पालक आक्रमक असतील, तर मुलांनी काय केले पाहिजे आणि काय नाही याबाबत मुलांवर नियमावली थोपविली जाते. एकंदरीतच आपल्या मुलांना काहीही अक्‍कल नाही आणि त्यांचा उद्धार करणे ही आपली एकमेव जबाबदारी आहे, असा या पालकांचा सूर असतो. त्यामुळे मुलांच्या नैसर्गिक वाढीत अनेक अडथळे येतात. विशेषतः: पौगंडावस्थेत मुले असताना या पालकांचा त्रास अतिरिक्‍त प्रमाणात वाढतो.  
पौगंडावस्थेत असे पालकत्व मिळालेली मुले खोटे बोलणे, तणावाखाली असणे, घरात थांबण्यास अनुत्सुक असणे, मित्रमैत्रिणी जास्त जवळचे वाटणे, किंवा खूप मिळमिळीत, शाय, स्वतः:च्या निर्णयाबद्दल सतत शंकेखोर असणारी, अशी होऊ शकतात. अशा पालकांची पौगंडावस्थेतील मुले पालकांवर नाराज असतात आणि काही वेळा डिप्रेशनमध्ये जाऊ शकतात.

या पालकत्वाच्या प्रकाराची वैशिष्ट्ये :-

  • आई किंवा वडील म्हणून "माझेच बरोबर आहे' अशी समजूत कायम असते. 
  • राग, चिंता, अस्वस्थता, विषण्णता, विफलता या भावनांनी असे पालक ग्रस्त असतात. 
  • असे पालक अधिकारशाही वापरत असल्यामुळे मुले लहान असताना दहशतीमुळे पालकांचे सर्व काही ऐकतात; पण पौगंडावस्थेत प्रवेश केल्यानंतर मुलांना पालकांचा सहभाग खटकण्यास सुरवात होते आणि त्यामुळे पालक व मुले यांच्यात तूतू-मैमै सुरू होते. 
  • अशा प्रकारचे पालक आपल्या मुलांना आपल्यावर पूर्णपणे अवलंबून ठेवतात. 
  • अशा पालकांच्या मनात ""मी पालक असल्यामुळे माझ्या मुलांकडून हवे ते करून घेणारच'' असा अविवेकी दृष्टिकोन असतो. 
  • पालक आणि मुलांच्या संबंधात पालकांचे स्थान कायम सर्वश्रेष्ठच असले पाहिजे असाही अविवेकी दृष्टिकोन असतो. 
  • असे पालक मुलांची वर्तणूक नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करतात. 
  • अशा पालकत्वामुळे मुलांच्या "स्व' चा विकास खुंटू शकतो. 
  • असे पालक मुलांचा स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार हिरावून घेतात. 
  • - अशा पालकांची मुले आपल्या वर्तनातून पालकांचा अपमान करू पाहतात आणि सूड घेण्याचा प्रयत्न करतात. 
  • - अशा प्रकारच्या पालकांना नेहमी मुलांनीच स्वतः:मध्ये बदल केला पाहिजे अशा प्रकारचा हट्ट असतो. 
  • - अशा प्रकारचे पालक मुलांच्या बाबतीत ओव्हर पझेसीव असतात म्हणजे मुले ही फक्‍त आपल्याच मालकीची आहेत असे समजतात. 


2) शरणागत पालकत्व / परवानगी देणे (Permissive Style):
या प्रकारच्या पालकत्वामध्ये अधिकारदर्शक पालकत्वाच्या बरोबर विरुद्ध पालकांचा होरा असतो. म्हणजेच असे पालक मुलांना अति स्वातंत्र्य देणारे, आवश्‍यक तिथे नियंत्रण न ठेवणारे, कधी कधी अति काळजी करणारे   असतात. या प्रकारचे पालक मुलांनी आयुष्यात छोटे छोटे धोके घेऊ नयेत अशा प्रकारे वर्तन करणारे असतात.  स्वतः: अनुभवलेले कठोर आणि खडतर आयुष्य आपल्या मुलांच्या अजिबात वाट्याला येऊ नये अशा समजुतीत असतात. त्यामुळे ते मुलांशी इतक्‍या अति प्रेमाने वागतात की अशी मुले बेफिकीर वर्तन करतात. अशा प्रकारच्या पालकत्वामुळे मुले खूप उद्धट, बेफिकीर, इतरांचा विचार न करणारी, अप्पलपोटी किंवा आत्मकेंद्रित होऊ शकतात.

अशा पालकांची मुले हट्टी बनतात आणि आपलेच म्हणणे खरे करतात. पालक मुलांना कमीत कमी दुखवून त्यांना हव्या त्या वस्तू दिल्याच पाहिजेत आणि त्यांच्या मनाप्रमाणे वागलेच पाहिजे अशा समजुतीतून स्वतः:ला दुखवून घेतात. परिणामी त्यांच्यामध्ये चिंता, हताशा, निराशा, असहाय्यता अशा भावना भेडसावू लागतात.
जर दोन्ही पालक या प्रकारचे असतील तर मुलेच या पालकांचे पालक बनतात. या पालकांच्या मनात आपण मुलांना अजिबात न दुखवता त्यांची सदा सर्वकाळ देखभाल केलीच पाहिजे आणि सर्वतोपरी सेवा करणे आपले कर्तव्य आहे असा दृष्टिकोन मनात बाळगतात. या दृष्टिकोनामुळे मुलांसमोर सतत नमते घेण्याची सवय पालकांना लागते. मुलांना आपल्यावरती पूर्णपणे अवलंबून ठेवून स्वतंत्र काही करण्यापासून किंवा कोणत्याही प्रकारची रिस्क घेण्यापासून दूर ठेवतात. त्याचा परिणाम म्हणून अशी मुले पालकांना गृहीत धरतात आणि आपल्याला सांभाळण्याची जबाबदारी मोठे झाल्यावरही पालकांचीच आहे असा दृष्टिकोन बाळगतात.

जर वडील या प्रकारात असतील आणि अतिमवाळ असतील, तर मुले वडिलांना अजिबात किंमत न देता आक्रमक बनतात. प्रसंगी वेडेवाकडे बोलून वडिलांचा अपमान करतात. विशेषतः: पौगंडावस्थेत असताना मुले अत्यंत वात्रट, आगाऊ आणि उद्धट वर्तन करतात. त्यांच्यावर वडिलांचा काहीही धाक नसतो.

जर आई या प्रकारात असेल तर ती मुलांचे अति लाड करते आणि मुलांच्या अविवेकी वर्तनाचे सुध्दा समर्थन करत राहते. उदा. आई इतरांसमोर आपल्या मुलांना सतत कशी माझीच गरज असते हे कौतुकाने सांगत असते आणि मुलांच्या चुकीच्या वर्तनाचे समर्थन करते. मुलांना कुठेही न दुखवता त्याचे सर्व काही सेवाभावी वृत्तीने करतच राहते. त्यामुळे अशी मुले स्वावलंबी बनत नाहीत.

शरणागत पालकत्वाची वैशिष्ट्ये :

  • असे पालक कायम मुलांच्या कलेने चालतात आणि मुलांपुढे शरणागती पत्करून त्यांचेच बरोबर आहे, असा दृष्टिकोन मुलांच्या मनात निर्माण करतात. 
  • असे पालक मुलांना शक्‍यतो नकार देत नाहीत. 
  • अशा पालकांची मुले जीवनात कुठलीही गोष्ट न मिळणे हे सहन करू शकत नाहीत त्यामुळे हातपाय गळून हरल्याची भावना त्यांना येते. 
  • असे पालक मुलांशी कायमच गोड गोड बोलतात आणि जेव्हा गरज असते तेव्हा ठोस पावले न उचलता स्वतः:ची जबाबदारी झटकून मोकळे होतात. 
  • अशा पालकांचे मुलांवर योग्य ते नियंत्रण नसते त्यामुळे पालकांवर कुरघोडी करण्यासाठी मुले नवीन नवीन तंत्रे व क्‍लृप्त्या शोधून काढतात आणि पालकांच्या मवाळपणाचा फायदा उचलतात. 
  • असे पालक मुले मोठी झाल्यावरसुद्धा मुलांना घाबरूनच असतात आणि निर्णयासाठी मुलांवर अवलंबून राहतात. 
  • असे पालक मुलांना अति स्वातंत्र्य देऊन मुलांनी स्वतः:ची जबाबदारी घेण्यास मुलांना परावृत्त करतात. 
  • असे पालक मुलांची अति काळजी करून मुलांच्या आयुष्यात अनेक वर्षांपर्यंत ढवळाढवळ करत राहतात. 
  • आई या प्रकारात असेल तर मोठेपणी मुलगा मम्माज बॉय म्हणून हिणवला जातो आणि मुलगी असेल तर लग्न झाल्यानंतर तिच्या संसारात ढवळाढवळ करू शकते. 
  • अशा प्रकारच्या पालकांची मुलांमध्ये अतिरिक्‍त भावनिक गुंतवणूक असते त्यामुळे ते दिवसरात्र मुलांचा विचार करतात. 
  • अशा पालकांची मुले पालकांच्या चुका दाखवून त्यांना सतत गिल्ट देण्याचा प्रयत्न करत असतात. 

 

3) सकारात्मक  पालकत्व / लोकशाही पद्धत (Democratic Style):

हे असे पालक असतात की, जे आपल्या मुलांना त्यांनी स्वत: केलेल्या प्रत्येक गोष्टीला आणि कृतीला ते स्वत: जबाबदार राहतील यासाठी मदत करीत असतात. अशे आई-बाबा त्यांच्या अपेक्षा आपल्या मुलावर सारख्या लादत असतात आणि ते एका विशिष्ट गोष्टीबद्दल या अपेक्षा का लादतात हे सांगत असतात. या सर्व गोष्टीमुळे मुलांचे धैर्य वाढीस लागण्यास मदत होते. नियम पाळणेसाठी मुल सदैव अग्रेसर रहातात. आणि त्यामुळे ते स्वत:चे निर्णय स्वत: घेण्यास सक्षम होतात, त्यांना हे माहीत असते की, जरी निर्णय घेण्यात आपले चुकले तरीही आपले पालक याकामी आपल्या मदतीला नक्की धावून येतात.

 

तेव्हा लक्षात असू द्दयात, जर तुम्ही पालक असाल तर, प्रथम एक विश्वासरुपी बंध तुम्ही आणि तुमच्या मुलात तयार करा. आणि तेव्हाच तुम्ही एक सकारात्मक परिणाम तुमच्या मुलावर साधू शकाल.
  

सकारात्मक पालकत्वाची वैशिष्ट्ये ः-
* या प्रकारच्या पालकांना पालकत्वाचा पूर्ण स्वीकार झालेला असतो.
* जन्मापासून मुलांच्या वाढीमध्ये अशा पालकांना मनापासून रस असतो.
* मुलांच्या चौफेर वाढीबद्दल ते दक्ष असतात.
* मुलांच्या भूमिकेत जाऊन मुलांना समजावून घेतात आणि त्यांच्यावर आपली मते लादत नाहीत.
* अशा पालकांना मुलांच्या मर्यादा स्थाने, कमकुवत स्थाने याबद्दल बऱ्यापैकी जाण असते, त्यामुळे मुलांना वस्तुस्थितीच्या पातळीवर जाणून घेतात.
* मुलांवर अपेक्षांचे ओझे न लादता, आवश्‍यक तेव्हा पाठिंबा, काळजी आणि सहभाग घेऊन मुलांना स्वावलंबी बनायला मदत करतात.
* या पालकांच्या दृष्टिकोनातून मुलांचा व्यक्तिमत्त्व विकास म्हणजे फक्त मार्कस मिळवून यशस्वी होणे असा नसून त्यांचा शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक, बौद्धिक, सांस्कृतिक, कलात्मक आणि क्रिडात्मक या सर्व अंगाने विकास साधण्याचा प्रयत्न असतो.
* मुलांनी अभ्यासाबरोबर रोजचे वर्तमानपत्र वाचणे, वाचनाची आवड जोपासणे, वेगवेगळ्या विषयांची माहिती घेणे, एखादा छंद किंवा कला जोपासणे, आर्थिक व्यवहार समजून घेणे, कोणत्याही खेळामध्ये रस दाखवणे अशा सर्व क्षेत्रांमध्ये मुलाची आवड व कल बघूनच विकास घडवण्याचा प्रयत्न करतात; पण त्यासाठी कोणताही अट्टहास किंवा जबरदस्ती करत नाहीत.
* असे पालक मुलांच्या मनामध्ये विश्‍वास निर्माण करून आणि मुलांवरती पूर्ण विश्‍वास ठेवून परस्पर संमतीने संवाद करतात. म्हणजे संवाद नेहमी दुतर्फा करण्याचे प्रयत्न करतात.
* असे पालक मुलांना कोणताही उपदेश, सूचना न करता त्यांच्या भावना नीट समजावून घेऊन त्यांचे मनापासून पूर्णपणे ऐकून घेतात आणि गरजेचे असेल तेथेच मार्गदर्शन करतात.
* असे पालक मुलांवर वेडीवाकडी टीका न करता त्यांच्या अयोग्य वागण्याची फक्त जाणीव करून देतात आणि त्याचे फायदे-तोटे दाखवून त्यावर मुलांना स्वतःला निर्णय घेण्यास उद्युक्त करतात.
* मुलांच्या यशाने हुरळून जात नाहीत आणि अपयशाने खचूनही जात नाहीत. मुलाला योग्य ते प्रोत्साहन आणि प्रेरणा देत असतात.
* विशेषतः पौगंडावस्थेत मुलांमध्ये होणारे सर्व प्रकारचे बदल नीट समजावून घेत त्यांना या बदलांशी जुळवून घ्यायला योग्य मदत करतात.
* या पालकांचे विचार विवेकनिष्ठ असू शकतात, तसेच त्यांचे भावनिक व्यवस्थापन (एीोंळेपरश्र चरपरसशाशपीं) उत्तम असू शकते.
* दोन्ही पालकांपैकी एक पालक जरी या प्रकारात मोडत असेल तरीसुद्धा मुलाला याचा चांगला फायदा होतो.

* अशा पालकत्वामुळे मुलांची वाढ अत्यंत नैसर्गिकरीत्या आणि निकोप होते.
* अशी मुले मोठेपणी भावनिकदृष्ट्या स्थिर, स्वतःशी प्रामाणिक आणि आत्मविश्‍वासू बनतात, त्यांना सामाजिक भान असते.
* अशी मुले मोठ्यांचा मान राखणारी आणि मनापासून मदत करणारी होतात; तसेच हवा तिथे नकार द्यायला आणि मिळालेला नकार स्वीकारायला शिकतात. त्यामुळे अशा मुलांची निर्णय क्षमता सकारात्मक बनते.