Wednesday 12 June 2013

संजीवनी फ्युचर पाठशाला



संजीवनी व्याख्यानमाला २०१० मध्ये   "मला उधोजक व्हायचे" आहे या विषयावर कॉर्पोरेट लॉयर  श्री नितीन पोतदार यांचे व्याख्यान झाले होतेव्याख्यानानंतर झालेल्या चर्चेत त्यांनी संजीवनी परिवाराच्या उपक्रमाचे कौतुक केले श्री अतुल राजोळी यांच्या फ्युचर पाठशाळेच्या उपक्रमाची माहिती देऊन आपल्या  विध्यार्थ्या साठी हा  कार्यक्रम  सुचवला.  फेब्रुवारी मध्ये संजीवनी परीवारीची बोर्न टू  विन  च्या  प्रतिनिधीशी  मिटिंग झाली    सदर उपक्रम   प्रायोगिक तत्त्वावर राबवायचे ठरले.   ४० विध्यार्थांची एक तुकडी घ्यावी नंतर उपयुक्तता पाहून पुढे जावे. हा कार्यक्रम सशुल्क आहे म्हणून पालकांची एक बैठक निर्मळ येथे घेऊन, विद्यार्थ्यांची नावं नोंदणी सुरु केली
 संजीवनी फ्युचर पाठशाळा दिनांक ११ - २१ मे 2013 दरम्यान भाऊसाहेब वर्तक विध्यामंदीर नाळे येथे  आयोजित   केली  होती
 विध्यार्थ्याच्या  जाणीवा वाढवणारी   शाळा  अशी  एका  वाक्यात  या उपक्रमाची  माहिती देता येईल.
 या दहा दिवसात विध्यार्थ्यांना खालील विषय शिकविले जातात.                                          


संवाद साधताना बॉर्न टू विन चे श्री अतुल राजोळी
    
      ·   ध्येयनिश्चिती (Goal Setting)
       ·  गो गेटर प्रवृत्ती (Go-Getter Attitude)
        ·   संभाषण कौशल्य (Communication Skill)
       ·   मानवी स्नेहसंबंध  (Interpersonal Relationship)
          ·      आरोग्य (Health)
           ·     संघ बांधणी (Team Building)
·     मेंदूचा विकास (Brain Stimulation)
·     आत्मविश्वास जागवा (Be Confident)
·     भावनांवर ताबा (Mental Diet)
 
या मध्ये कार्यशाळा घेतली जाते. त्यामधून विध्यार्थ्याचा एक दृष्टीकोन तयार होण्यास मदत होते. फ्युचर पाठशाळेत सहभागी झालेल्या मुलांना संजीवनी तर्फे पाच प्रश्न विचारण्यात आले होते व त्यांचा लिखित प्रतिसाद घेण्यात आला.   काही मुलांचा  प्रातिनिधिक प्रतिसाद  असा.  
                  

  अ) पाठशाळा अभ्यासक्रम  कसा वाटला?

  •            खूप मजा आली अभ्यासक्रम चांगला वाटला. बरंच काही शिकायला मिळाले. खूप चांगली शिकवण मिळाली.
  •            खूप चांगला वाटला मजा सुध्दा आली इथे येउन आमच्या मध्ये एक confidence व  attitude जागं झालं आहे. आमच्या मध्ये खूप बदल दिसून आल. 
  •            एका शब्दात सांगायचे तर अतिउत्तम.  life मधील हे १० दिवस कसे भरले ते कळलच नाही. त्यातील Goal Settin, Health , Interpersonal relationship हे सगळे खूप आवडले. आयुष्यातील  प्रत्येक टप्प्यावर क्षणा क्षणाला फ्युचर पाठशाळा नक्की उपयोगी पडेल thank you future pathshala.
  •            खूप छान वाटले अश्या उपक्रमामुळे ध्येय निश्चित करणे सोप्पे जाईल. त्यामुळे त्याचा फायदा पालकांना हि होईल आपल्या मुलांची भविष्याची चिंता मिटेल.

ब) पाठशाळा अभ्यासक्रमामुळे स्वत: मध्ये झालेला बदल नोंदवा.
  •            पाठशाळा उपक्रमामुळे विचार करण्याची क्षमता वाढली. तसेच स्व:ताच्या आरोग्या विषयी काळजी कशी घ्यावी हे  कळले. नाते सबंध जपण्यासाठी कसे बोलवे,वागावे हे समजले.
  •            माझ्यामध्ये तर प्रचंड बदल झालेला आहे. माझ्या केसा पासून ते पायाच्या नखापर्यंत everything gets changed माझं Career Decide झालंय माझी Health म्हणजे मला weight वाढवायला  सांगितले आहे आणि कसे  हे पण कळाल आहे.        
  •           स्वत: मध्ये एक माणूस जागा झाला आहे. म्हणजे  confidence  वाढला आहे  व  stage fear वाटत नहि. मोठ्या लोकांत बोलायची व पुढे न येण्याची भीती गेली. 
  •           मझ्यात आत्मविश्वास वाढला. चार लोकात बोलण्याची शक्ती मिळाली. स्टेज  फियर  गेला माझे ध्येय निश्चित झले. झाले.  आरोग्य ,स्नेह सबंध सुधारण्यात मदत होईल. बरेच मित्रमैत्रिणी मिळाल्या.
 क) पाठशाळेच्या अभ्यासक्रम मधून तुमचे ध्येय निश्चित झाले काय व कोणते?
  •          माझं ध्येय तर पहिल्यापासून निश्चित झाले होते कि  I want to be a CA    
  •          पाठशाळा अभ्यासक्रमां तून ध्येय निश्चित केले. माझे ध्येय आहे कि मोठे झाल्या वर मला जिल्हाधिकारी  (IAS Officer)  व्हायचे आहे.
  •           पाठशाळा आभ्यासक्रमातून ध्येय निश्चित झाले आहे. Interior designer of Architecture.
  •           होय , कॉमर्स (Commerce)
 ड) पाठशाळा अभ्यासक्रमात सर्वात जास्त आवडलेले सत्र कोणते? कारण?
  •           पाठशाळे मधील आरोग्या विषयी माहिती मला खूप  आवडली कारण आहाराचे नियम, वजन कसे वाढवावे,  स्वस्थ कसे राहावे, त्यासाठी शरीराची निगा कशी राखावी ,खाण्या पिण्याचे पथ्थ कसे पाळावे हे समजले.   
  •          प्रत्येक सत्रा काहीना काही नवीन शिकायला मिळालं मला go getter आणि शेवटच   टीम बिल्डिग हे जास्त आवडले. पहिल्या सत्रात अंगात  पुढे जाण्याची शक्ती संचारली  व  शेवटच्या सत्रात एकी वाढवण्याचे, टीम  बनवण्याचे बळ मिळाले.
  •          Health Session फार आवडला कारण असे कि आपण कसे पाहिजेत आणि कसे आहोत हे कळाल. 
  •         सर्वच सत्रं आवडली Health  विषयक जास्त आवडलं   कारण  health care कशी घ्यायची हे सांगितले व आरोग्या शिवाय  सर्व काही अपूर्ण असते. 
 ई) संजीवनी परिवाराकडून ह्यापुढील वाटचालीत कोणत्या अपेक्षा आहेत?                                              
  •       हा उपक्रम सुरु ठेवून प्रत्येक मुलांना त्याचा फायदा मिळाला या कडे लक्ष ध्यावे. तसेच समाजातील सर्व गावांना कळावे जेणेकरून पाल्यांना या पाठशाळेचा लाभ घेत येइल.  
  •         असेच मस्त मस्त उपक्रम राबवत राहा आणि कळवायला विसरू नका. संजीवनी परिवारा बद्दल बोलू तेवढे थोडे आहे. मी सदैव संजीवनी परिवाराची ऋणी राहीन Thank you again.
  •         संजीवनी परिवारा कडून अश्याच अपेक्षा आहेत  कि असे कार्यक्रम दरवर्षी ठेवा यातून शिकायला मिळते व आनंद हि मिळतो. या कार्यक्रमा साठी Thank You.
  •         संजीवनी  परिवार जे   कार्य करत आहे ते कौतुकास्पद आहेत.संजीवनीने नेहमीच असे कार्यक्रम राबवावेत संजीवनी परिवाराला खूप धन्यवाद त्यांच्या मुळे मला पाठ्शालेचा आगळा वेगळा अभ्यासक्रम अनुभवायला मिळाला.  आम्ही निश्चितच संजीवनीच्या सर्व उपक्रमात सहभागी होउ. 


२६ मे ला बॉर्न टू विन तर्फे षण्मुखानंद हॉल माटुंगा येथे जोश कार्यक्रमा चे आयोजन करण्यात आले होतेआपल्या विध्यार्थ्यानी त्यात भाग घेऊन एका मोठ्या व्यासपीठाचा अनुभव घेतला


टीम संजीवनी फ्युचर पाठशाला


Tuesday 4 June 2013

तारकर्ली


सुंदर व स्वच्छ    समुद्र किनारा   
       
सुरुची बाग  
                    तारकर्ली :       






मुंबई पासून ५५२ किमी.  मालवण पासून ७ कि मी अंतरावर सुंदर व स्वच्छ    समुद्र किनारा.  सुरुची बाग व  या बागेतील  MTDC ची समुद्र  किनारीच    राहण्याची  व्यवस्था, सतत समुद्र दर्शन.



सूर्योदय   

 इंद्रधनुष्य 
MTDC रिसॉर्ट 

तारकर्ली च्या एकाबाजूला समुद्र आहे तर दुसऱ्या बाजूला कर्ली नदी आहे. कर्ली नदी मध्ये बोटिंगचा आनंद घेत येतो. त्सुनामीच्या वेळी इकडे एक बेट तयार झाले आहे. या बेटा वर  वॉटरस्पोर्टची मजा घेता येते. कर्ली नदी व अरबी समुद्राचा संगम इकडे पाहता येतो. एका बाजुला कर्ली नदीचे निळेशार शांत पाणी तर दुसर्‍या बाजूला सफेद फेसांचा उसळलेल्या लाटांचा समुद्र. 

कर्ली नदीतील सफर


वॉटरस्पोर्ट



होडीतून कर्ली नदीतील सफर , सूर्यास्त व आकाशातील रंगाची   उधळण क्षणभर सर्व विसरायला होते. 



रंगाची उधळण


कर्ली नदीचा किनाऱ्या वरून सूर्यदर्शन



सूर्यास्त

रापण जाळ्यातील मच्छीमारी आणि  जाळ्या मधील चांदीची मासोळी -





रापण जाळं   

चांदीची मासोळी 

मालवण जवळ कुणकेश्वर व आंगणेवाडी येथील भराडी देवीचे मंदिरं  प्रसिध्द आहेत.
 .
 मालवण पासून ४५ किमी वर , कुणकेश्वर पांडव कालीन  महादेवाचे  मंदिर  आहे. मंदिर  समुद्र किनारी आहे.

श्री  कुणकेश्वर मंदिर 

आंगणेवाडी येथील   भराडी देवीचे मंदिर