Saturday 15 December 2018

डोळे फसवतील , फसवतील डोळे

 सूर नवा ध्यास नवा चा भाग पाहत होतो. नेहमीच छोटे सुरवीर छान गातात. परंतु कालचा स्वराली जाधवने लावलेला सूर स्वर्गीय होता. गीतकार गुलजार, संगीतकार विशाल भारद्वाज, गायक राहत  फत्ते अली खान आणि चित्रपट ओमकारा. स्वरालीचं गाण्याला वन्समोअर मिळाला. पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या कलाकार जितेंद्र जोशींनी स्वरालीचं छान कौतुक केलं त्यांनी कबीर इन राजस्थान ह्या अल्बमची आठवण सांगितली. पुढे म्हणाले गुलजार माझं दैवत आहे.  अजूनही गुलजार मला नीटसा कळत नाही  परंतु  स्वरालीने  सुराबरोबर शब्द व भावना पोहोचवल्या.  
काय आहे गीत , काय आहेत शब्द 

 नैनो की मत मानियो रे नैनो की मत सुनियो
नैनो की मत मानियो रे नैनो की मत सुनियो
नैनो की मत सुनियो
नैना ठग लेंगे
नैना ठग लेंगे ठग लेंगे नैना ठग
नैना ठग लेंगे ठग लेंगे नैना ठग

जागते जादू फुकेंगे रे जागते जागते
जागते जादू फुकेंगे रे नींदे बंजर कर
नैना ठग लेंगे
नैना ठग लेंगे ठग लेंगे नैना ठग
नैना ठग लेंगे ठग लेंगे नैना ठग
नैनो की मत मानियो

भला मंदा देखे ना पराया ना सागा
नैनो को तो डसने का चस्का लगा
भला मंदा देखे ना पराया ना सागा
नैनो को तो डसने का चस्का लगा
नैनो का जहर नशीला रे
नैनो का जहर नशीला
नैनो का जहर नशीला रे
नैनो का जहर नशीला

बादलो मे सतरंगिया बोवे भोर तलक़ बरसावे
बादलो मे सतरंगिया बोवे नैना बाँवरा कर
नैना ठग लेंगे
नैना ठग लेंगे ठग लेंगे नैना ठग
नैना ठग लेंगे ठग लेंगे नैना ठग
नैना ठग लेंगे ठग लेंगे नैना ठग लेंगे

नैना रात को चलते चलते स्वर्गा मे ले
मेघ मल्हार के सपने डीजे हरियाली
नैना रात को चलते चलते स्वर्गा मे ले
मेघ मल्हार के सपने डीजे हरियाली

नैनो की ज़ुबान पे भरोसा नही
लिखाद परख ना रसीद ना
नैनो की ज़ुबान पे भरोसा नही
लिखाद परख ना रसीद ना
सारी बात हमारी रे
सारी बात

बिन बदल बरसाए सावन सावन बिन
बिन बदल बरसाए सावन नैना बाँवरा कर
नैना ठग लेंगे
नैना ठग लेंगे ठग लेंगे नैना ठग

नैनो की मत मानियो रे नैनो की मत
नैनो की मत सुनियो रे
नैना ठग
जागते जादू फुकेंगे रे जागते जागते
जागते जादू फुकेंगे रे नींदे बंजर कर
नैना ठग लेंगे
नैना ठग लेंगे ठग लेंगे नैना ठग
नैना ठग लेंगे ठग लेंगे नैना ठग लेंगे
नैना ठग लेंगे ठग लेंगे नैना ठग लेंगे
नैना

स्वैर मराठी करण 


डोळ्यावर विसंबू नका , डोळे काय सांगतात ह्या कडे लक्ष देऊ नका !!
डोळे फसवतील , फसवतील डोळे. 
जागेपणी डोळ्यात धूळफेक करतील ,झोप हरवून बसतील. 
डोळे फसवतील ,
डोळे फसवतील , फसवतील डोळे.
 डोळ्यावर विसंबू नका
डोळे आपलं परकं असं बघत नाही. 
त्याला डंख मारण्याची चटक लागली आहे. 
त्यांची नजर  विखारी
त्यांची नजर  विखारी  रे 
डोळे फसवतील , फसवतील डोळे

गगनी इंद्रधनुष्य  रिमझिम सूर्यास्तापर्यंत 
गगनी इंद्रधनुष्य डोळयांना भुलविते 
डोळे फसवतील ,
डोळे फसवतील , फसवतील डोळे. 

डोळे रात्री स्वप्नात स्वर्गरोहण करतील 
स्वप्नाचा पाऊस स्वप्नातील हिरवळ 
 डोळ्याच्या बोलण्यावर विश्वास नाही. 
ना पावती ना लिखापढी. 
आम्ही सांगू तेच. 
मेघा शिवाय श्रावणात बरसणे श्रावणा शिवाय 
डोळ्याला दिपवीत मेघा शिवाय श्रावणात बरसणे
डोळे फसवतील ,
डोळे फसवतील , फसवतील डोळे. 

जागेपणी डोळ्यात धूळफेक करतील ,झोप हरवून बसतील. 
डोळे फसवतील ,
डोळे फसवतील , फसवतील डोळे. 

गुलजारचं काव्य म्हटलं म्हणजे कळलं असं वाटत असतानाच, अंतर्मुख करणारं परत परत खातरजमा करायला लावणारं. 


Tuesday 7 August 2018

यशस्वी व्हायचं आहे! सोडा ह्या गोष्टी !!!


 

काहीवेळा यशस्वी होण्यासाठी , आपल्याला जीवनांत जे साध्य करावयाचे आहे त्यासाठी अधिक काही करण्याची आवश्यकता नसते तर काही गोष्टी सोडून देण्याची गरज आहे.
काही गोष्टी सार्वत्रिक आहेत. जर या गोष्टी तुम्ही सोडल्या तर यश तुमचंच.

आरोग्यास धोकादायक जीवनशैली सोडून द्या : जीवनात काहीही साध्य करायचं असल्यास प्रथमतः आरोग्याची काळजी घेणं आवश्यक. निरोगी जीवनामुळे अनेक गोष्टी साध्य करता येतील. "शीर सलामत तो पगडी पचास" आरोग्यासाठी नियमित झोप ,सकस आहार आणि व्यायाम ही त्रिसूत्री आहे. .






 

झटपट फायदा सोडून द्या : नजीकचा (short term) फायदा बघू नका. दीर्घकालीन ध्येय ठरवा. रोजच्या छोट्या छोट्या चांगल्या सवयीतून उद्दिष्ट गाठलं जातं. चांगल्या सवयी जोपासा. त्या आपल्या रोजच्या जीवनाच्या अंग बनवा.










छोटी ध्येय सोडून द्या : छोट्या ध्येयाने कोणाचंच भलं होत नाही. आक्रसून जाण्यात शहाणपण नाही. त्यामुळे आजूबाजूचं वातावरण असुरक्षित बनतं. तुम्हाचा निर्भयपणा इतरांना भयापासून मुक्त करू शकतो. नवनवीन कल्पना राबवा अपयशाला घाबरू नका आणि यशापसून पळ काढू नका. जर आपण मोठी स्वप्न पहिली नाहीत मोठ्या संध्या घालवल्या तर आपण आपल्या क्षमतेचा मुक्तपणे उपयोग केला नाही असं होईल. आपल्या क्षमतेला पूर्णपणे वाव द्या.












सबबी सोडून द्या : सबबी आपली व्यक्तिगत व व्यावसायिक वाढ खुंटवते आपण कारणं शोधत राहतो. यशस्वी लोकांना पूर्णपणे माहित असत की आपलं जीवन आपणच घडवू शकतो. आपल्या जीवनात घडणा-या चांगल्या किंवा वाईट गोष्टीला आपणच जबाबदार आहोत याची जाणीव असते.








ठाम मतं किंवा निश्चित मानसिकता सोडून द्या.: निश्चित मानसिकता असेलेले लोक मानतात की बुद्धिमत्ता आणि प्रतिभा दैवीदेणगी आहे. जी बदलू शकत नाही. यशस्वी लोक,मानसिकता विकसित करण्यासाठी , नवीन ज्ञान प्राप्त करण्यासाठी, नवीन कौश्यल्य शिकण्यासाठी, समज प्रगल्भ करण्यासाठी रोज वेळ काढत असतात. ज्यामुळे जीवन उन्नत होण्यास मदत होईल. एक लक्षात ठेवा "आज आपण जे कोणी आहोत तेच उद्या असायला पाहिजे असं नाही. उद्या अधिक सुंदर करता येईल.









जादूच्या कांडी वर विश्वास ठेवू नका : एका रात्रीत जग बदलेले ही भाकडकथा आहे. प्रसिद्ध लेखक एमिल म्हणतो "दररोज , प्रत्येक मार्गाने मी अधिकाधिक विकसित होत आहे ". दररोज केलेल्या छोट्याशा सुधारणा कालांतराने इच्छित परिणाम साध्य करणा-या ठरतात. आपल्याकडे असलेला वेळ बघून भविष्याचं नियोजन करून रोज थोड्या थोड्या सुधारणा करायला हव्यात.






परिपूर्णता सोडून द्या : आपण कितीही प्रयत्न केले तरी परिपूर्ण असं काही नसतं यशापयशाची भीती कृती पासून दूर नेते. योग्य वेळेची वाट बघत बसू तर हातातील अनेक संध्या निसटून जातील. म्हणून सुरवात करा आणि रोज सुधारणा घडवीत रहा.










एकाच वेळी अनेक गोष्टी करण्याचं टाळा : एक ना धड भराभर चिंध्या अशी एक म्हण आहे. एकाच वेळी एक गोष्टीवर लक्ष केंद्रित करून त्याच्यात छोटी छोटी विभागणी करून तडीस न्या. अपेक्षित यश मिळवण्यासाठी एकाच कामावर लक्ष देणं आणि बांधिलकी पाळणे अपरिहार्य आहे.





प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवण्याची वृत्ती सोडा : काही गोष्टी आपल्या हातात असतात तर काही गोष्टी हाताबाहेरच्या. या गोष्टी वेगळ्या करता येणे महत्वाचं. आपण ज्या गोष्टीवर नियंत्रण ठेवू शकत नाही अश्या गोष्टीपासून दूर राहा. नियंत्रण ठेवू शकतो अश्यावर लक्ष द्या. एक लक्षात असू द्या आपण नियंत्रण ठेऊ शकतो अशी एकमेव गोष्ट म्हणजे एखाद्या विषया संदर्भातील आपला स्वभाव , आपली वृत्ती.











उद्दिष्टाच्या आड येणा-या गोष्टीना होय म्हणायचे सोडून द्या : उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कधी कधी काही कामांना , उपक्रमांना व मित्र मैत्रिणी, कुटुंबाकडून होणं-या मागणीला नाही म्हणावं लागतं. त्यामुळे काही काळा साठी आनंद हिरावला असं वाटेल परंतु उद्दिष्टपूर्ती सर्वांना आनंद देईल.






कुसंगत सोडा : नकारात्मक लोकांची संगत सोडा, प्रत्येक गोष्टीत त्यांना खोट दिसत असते. तुम्ही जर कारणं शोधणा-या , दुस-याना दोष देणा-याच्या संगतीत राहिलात तर तुम्ही तसेच बनाल. तेच जर तुम्ही व्यक्तिगत आणि व्यवसायिक रित्या उत्तम प्रगती करणा-या बरोबर राहिलात तर अधिक यशस्वी व्हाल.














आपण आवडतं असायला पाहिजे हे सोडून द्या : आपण काहीही केलं तरी आपण सर्वांचे आवडते असू शकत नाही. हे नैसर्गिक आहे आणि समर्थन करण्याची आवश्यकता नाही. परंतु आपण प्रामाणिक, रोज आपल्यात सुधारणा व आपलं मूल्यवर्धित करणारे असायला पाहिजे.












वेळ दवडू नका : आपण विचार करतो की आपणाकडे वेळ आहे. खरं तर हीच समस्या आहे. आपल्याला मौल्यवान जीवन मिळालं आहे. दिवसातील २४ तासाचा पुरेपूर उपयोग करा. आपण मरणार आहोत, म्हणून चांगला वारसा निर्माण करा आणि जीवन समृद्ध करण्याचे काम थांबवू नका.
(इंग्रजी लेखाचा स्वैर अनुवाद ,त्रुटी माझ्या )

Wednesday 25 July 2018

वृक्षवाढदिवस आणि विद्यार्थी कौतुक मेळावा

" फक्त गुणपत्रिका  म्हणजे सर्व काही नाही"  - सौ सुरभी नाईक. प्रसिद्ध समुपदेशक 

विद्यार्थी मित्रांनो गुणांना महत्त्व आहेच परंतु गुणपत्रिका म्हणजे सर्वं काही नाही. शिक्षणाबरोबरच आपलं व्यक्तिमत्व विकास व्हावा. आपल्या वक्तिमत्वातील दोष कमी करणे आणि व्यक्तिमत्त्वातील चांगले गुण जोपासणे म्हणजे व्यक्तिमत्त्व विकास ही सततची प्रक्रिया असल्याचं प्रतिपादन प्रसिद्ध समुपदेशक सौ सुरभी नाईक यांनी वसईतील संजीवनी परिवार आयोजित वृक्षवाढदिवस व विद्यार्थी कौतुक मेळाव्यात केलं. 
प्रा. सायनेकर सरांच्या प्रेरणेने २००५ साली सुरु झालेल्या  " संजीवनी वनराई " या वृक्षरोपण व वृक्षसंवर्धन प्रकल्पाचा तेरावा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी समाजमित्र पत्रकार मयुरेश वाघ यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आलं. सौ सुरभी नाईक  , श्री बबनशेठ नाईक , श्री राजन नाईक , श्री यशवंत पाटील , व विद्यार्थी मित्राच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले. आज रुद्राक्ष, कदंब , पंगारा ,अशोक वृक्षाचं रोपण करण्यात आलं. 



स्वच्छता ,वृक्षजगत ,पर्यावरण या विषयाशी आपले विद्यार्थी मंडळी जोडली जावी म्हणून विद्यार्थी कौतुक व वृक्षवाढदिवस एकत्र साजरा केला जातो. दहावी बारावीचे निकाल नुकतेच लागलेले असतात. वर्षभर अभ्यासाचा तणाव असतो. यश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थी विद्यार्थी मित्रांना  एकत्र बोलवून एखादं गुलाबपुष्प देऊन ,,पेढा देऊन कौतुक करावं असं साधं स्वरूप या कौतुक मेळाव्याचे आहे असं प्रास्ताविकात नरेश जोशींनी सांगितलं. सुनील म्हात्रेंनी सूत्रसंचालन केलं. कार्यक्रमाला श्री द. ग नाईक, श्री यशवंत पाटील, श्री राजन नाईक , श्री बबनशेठ नाईक  श्री चिंतामण नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. 

 

आषाढी एकादशी - बोलावा विठ्ठल



आषाढी एकादशीचे औचित्य साधून पंचम निषाद गेली तेरा वर्ष बोलावा विठ्ठल या अभंगवाणीचे आयोजन करत आहे. 
कालचा कार्यक्रम बहारदार झाला, ज्ञानेश्वराला वंदन करून जय जय रामकृष्ण हरी गजराने सुरु झालेली अभंगवाणी टाळचिपळ्या च्या संगतीने आलेला श्रोत्याला  वारकरी करून नादवून गेली. 
सर्वच कलाकार , ते गायक असुदे की वादक सर्वच शिखरस्थ ( श्री शशी व्यासाचा शब्द) कलाकार. प्रत्येकाचा सादरीकरण उत्तम झालं त्यांच्या गायकीने सूरमय विठ्ठल साकारला. कलकत्त्याच्या कौशिकी चक्रवर्तींनी सर्वांची मन जिंकली. त्यांनी गायलेले अभंग उत्कृष्ठ होते की त्यांचं निवेदन. खूप मजा आली. मराठी न येणारी  कौशिकी फक्त अभंग सादर करण्यासाठी आलेली एकमेव गायिका असावी. त्यांच्या बोलण्यातून आपल्या गुरुविषयी असलेला आदर , सहकलाकारा कडून शिकणं , त्यांना गुरुस्थानी मानणं, त्यांना नमन करून अभंगाला सुरवात करणं, भाषा आणि उच्चार शास्राचे महत्त्व अधोरेखित करणं, काही शब्द , उच्चार नवीन असल्याचं सांगून आपल्या मर्यादा ची जाणीव करून देणे. त्याच बरोबर या मर्यादांवर मात करून उत्कृष्ठता  प्रकट करणे. नेमक्या शब्दात पंडित भीमसेन जोशी , सुश्री किशोरीताईंची महती मांडणे, अभंगातून श्रद्धासुमन अर्पण करणे. हिंदी आणि मराठी तील अभंगातील साम्यस्थळं शोधून भक्तीतील , अध्यात्मातील अद्वैतता दाखवणे. सगळंच लाजबाब. सुंदर ध्यान पासून सुरवात करून  किशोरीताईंनी शब्दबद्ध  केलेल्या ज्ञानेश्वरीच्या  अंतरीच्या प्रवास उलगडून दाखवणा-या ओव्यांनी समेवर येणे , सर्वच अविस्मरणीय. निर्भेळ आनंद देणारं.    
 जयतीर्थ मेवुंडी   अभंगवाणीत वेगळा रंग भरणारे गायक,या वेळी नेहमी प्रमाणे रंग भरले. तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल , गुरु विठ्ठल , गुरुपूजा .........  गुरु च्या आगळ्या वेगळ्या पैलूचं दर्शन त्यांच्या आणि एस आकाशाच्या सादरीकरणाच्या वेळी झालं. शिष्याला संधी , वाव , स्पेस देणे इतकंच नव्हे तर आपल्या गाण्यात सामावून घेऊन शिखरावर जाण्यासाठी मार्ग करून देणे. आणि आकाश ने तितक्याच ताकतीने पेलणं. विशी बाविसाच्या उंबरठ्यावर असलेल्या आकाशाचा व्यासपीठावरील वावर आश्वासक वाटला. 
राहुल देशपांडे अधिक प्रगल्भतेकडे वाटचाल करणारा कलाकार. आलापी , गायकी , अभंग तेच असले तरी प्रत्येक वेळी नव्या जागा शोधण्याचा प्रयत्न, विठ्ठलाचा शोध घेण्याचा ध्यास , कधीतरी अवचित पणे  त्याचं प्रकटणे , संगीत साधना  आणि साधक  वैष्णवाच्या जथ्याचं आणि स्वतःचा प्रवास  उलगडून दाखवणारं गायन. 
आनंद भाटे गेल्या तीस पस्तीस वर्षात गंधर्व पदवी मिळवणारा कलाकार, पंडितजींचा शिष्य. पंडितजींचे अभंग सादर केले. आपण ठेवणीतील जोहर मायबाप होतंच. 

वादक कलाकार , अजय जोगळेकर , आदित्य ओक, तबल्यावर , पाध्ये , तळवळकर , बँकर , पखवाज सुखद मुंडे, सूर्यकांत सुर्वे , बासरी वर एस आकाश. 
प्रसिद्ध सुलेखक अच्युत पालव  अक्षरातून विठ्ठलाचे देखणे चित्ररूप व्यासपीठावर  गेली अनेक वर्ष साकारत असतात. 
कार्येक्रम संपल्यावर एस आकाशची भेट झाली. त्याला विचारलं एस म्हणजे काय? सतीश आकाश. श्री  एम एन सतीशकुमार व श्रीमती वाणी सतीश चा मुलगा. 

शेवट राहुल देशपांडे आणि आनंद भाटेंच्या टाळ बोले चिपळीला नाच माझ्यासंगे .... 
पुढची आषाढी १२ जुलै १०१९. 

Thursday 14 June 2018

आनंदाची गुरुकिल्ली - कृतज्ञता

 
बेंजामिन हार्डी ,स्तंभलेखक , प्रसिद्ध ब्लॉगर , कृतज्ञता विषयी त्यांच्या अंतर्मनातील  काही गोष्टी आपल्या समोर मांडतात.  

कृतज्ञता ही आनंद आणि यशाची गुरुकिल्ली आहे असा बेन यांचा विश्वास आहे. कृतज्ञते मुळे मनाला विशालता प्राप्त होते. जेव्हा आपण मोठ्या मनाने एखाद्या गोष्टीवर  विचार करतो. तेव्हा आपल्याला असंख्य संधी  दिसतात आणि अनेक शक्यता उपलब्ध असल्याची जाणीव होते. आपल्या पाशी जे आहे. त्याविषयी जेव्हा आपण  कृतज्ञ असतो  तेव्हा  चांगल्या गोष्टी , चांगली माणसं आपल्या कडे आकर्षित होत असतात. अधिक सकारात्मक गोष्टी घडतात. 
                        
कृतज्ञता सर्व गुणांची जननी आहे.  यश संपादना साठी तिचं  फार मोठं महत्व असून . त्यासाठी एक गुपित आहे ,रोज दिवसाची सुरवात सकाळी कृतज्ञतेच्या जाणिवेने करणे. 

कृतज्ञते मुळे माणसं बदलतात. जेव्हा तुम्ही कृतज्ञता दर्शवता तेव्हा इतरांकडे पाहण्याचा  दृष्टिकोन व त्याच्या विषयी आदर व्यक्त होत असतो. 

वेन डायर म्हणतात , जेव्हा तुम्ही  एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलता  तेव्हा त्या गोष्टीही नवीन रूप धारण करतात. 

प्रसिद्ध तत्त्ववेत्ता  गटे म्हणतो    "एखादी गोष्ट, वक्ती आपण जशी पाहतो त्याच  प्रमाणे  आपण वागतो,  आणि त्याच प्रमाणे गोष्टी, व्यक्ती आपल्याला प्रतिसाद देतात. पण जेव्हा आपण एखाद्या व्यक्ती कडे , गोष्टी कडे वेगळ्या दृष्टीने पाहतो तेव्हा त्या गोष्टी ,व्यक्ती बदलतात. परंतु फक्त त्यांच् बदलतात असं नव्हे, तुम्ही ही  बदलत असता.  

आपल्या वर्तणुकी वरून आपलं मूल्यांकन होतं  असतं. आपल्या वर्तणुकीनुसार आपली ओळख बनते' आणि आपलं वागणं आपल्या श्रद्धेला बळकटी देते. 




( आलेल्या मेलचा स्वैर अनुवाद )

Monday 28 May 2018

गुलजार

सम्पूर्ण सिंह कालरा, जन्म   १८ ऑगस्ट १९३४ ला दीना जिल्हा झेलम पंजाब येथे झाला आता  हा भाग पाकिस्तान मध्ये येतो . फाळणी नंतर हे कुटूंब अमृतसर मध्ये आलं. संपूर्ण सिंह अमृतसर मार्गे मुंबईला आले एका गॅरेज मध्ये मॅकेनिक म्हणून काम करू लागले, फावल्या वेळात कविता करण्याचा छंद जोपासत होते. आणि इथेच जन्मला  आपल्या सर्वाचा आवडता कवी , गीतकार , संवाद लेखक, पटकथाकार, निर्देशक  असं सर्व आकाश व्यापणारा गुलजार   वाया गुलजार दीनजी.  त्यांच्या आवडणा-या काही कविता. 


आदमी बुलबुला है पानी का
और पानी की बहती सतहा पर
टूटता भी है डूबता भी है
फिर उभरता है, फिर से बहता है
न समुंदर निगल सका इस को
न तवारीख़ तोड़ पाई है
वक़्त की हथेली पर बहता
आदमी बुलबुला है पानी का
भावार्थ : माणूस पाण्याचा बुडबुडा आहे. आणि वाहत्या पाण्याच्या पृष्ठभागावर तो फुटतो,बुडतो , परत आकार घेतो आणि वाहत राहतो. . सुमुद्र त्याला गिळू शकला नाही, नाही खंदक त्याला तोडू शकला. काळाच्या छातीवरून तो सतत वाहतो आहे. माणूस पाण्याचा बुडबुडा आहे. मानवी क्षणभंगुरता , प्रत्येक प्रसंगाला समोर जाणे,आणि प्रखर इच्छाशक्तीने जीवन पुढे नेत राहणे किती समर्थ पणे आले आहे. (क्रमश:)

Friday 11 May 2018

प्राचीन विज्ञानात भारतीय वैज्ञानिकांची अचूकता प्रसंशनीय !


 


पृथ्वीची, चंद्राची स्वतः भोवती फिरण्याची वेळ  ३५०० हजार वर्षांपूर्वी अचूक वर्तवली होती. तशी नोंद आर्यभटीया या आर्यभट्टच्या ग्रंथात सापडते. इसवीसन पूर्व भारतीय जीवन संस्कृती खूप प्रगत होती. तक्षशिला , नालंदा अश्या शैक्षणिक संस्था होत्या. भारताचा GDP ३३% इतका होता. भारतात बनणारे स्टील खूप उच्चं दर्जाचं होत. एक उद्योग संस्कृती वसत होती असे प्रतिपादन टाटा मूलभत संशोधन संस्थेचे प्रा डॉ श्रीगणेश प्रभू यांनी वसईतील संजीवनी व्याख्यानमालेत काढले.ते प्राचीन विज्ञानातील भारतीय वैज्ञानिकांचे योगदान या विषया वर बोलत होते.




 


त्या काळी भारतात संशोधन आणि संशोधकांसाठी पूरक वातावरण  होतं.राजकीय स्थिरता , सुबत्ता , चांगल्या शैक्षणिक संस्था  जे परकीय आक्रमणामुळे नष्ट झालं.   आर्यभटीया ग्रंथात पृथ्वी स्वतः भोवती फिरण्याची वेळ २३ तास ५६ मिनिटं ४० सेकंद सांगितली आहे तर चंद्राभोवतीची वेळ (२७.३९६४६७३५७२) सात डेसिमल पर्यंत अचूक सांगितली आहे. साइन कोसाइन टेबल ही भास्कराचार्य यांची देणगी आहे. केरळीय गणिती पद्धतीने हजारो वर्षपूर्वी न्यूटनच्या ही खूप आधी  कॅल्कुलश ची सूत्रं  कटपयादि पद्धतीने श्लोकांत मांडून ठेवली आहेत. ह्या सर्वांला ग्रंथांचा आधार आहे.





आता काही मंडळी महाभारत काळात इंटरनेट होतं असं सांगतात  असं बोलल्याने  जगात आपलं हसं होतं हे त्यांच्या लक्षात येत नाही.

कार्यक्रमाच्या सुरवातीला संजीवनीचे जेष्ठ कार्यकर्ते रमेश नाईक यांना   श्रद्धांजली वाहण्यात आली.





सुनील म्हात्रे यांनी प्रास्ताविक व पाहुण्याची ओळख करून दिली. कु प्राप्ती पाटील हीने ईशस्तवन सादर केलं. अरविंद पाटील व कौस्तुभ पाटील यांनी साथसंगत केली. अध्यक्षस्थानी श्री भालचंद्र पाटील होते.
















व्याख्यानमाला २०१८  यशस्वी करण्यासाठी साह्यकरणा-या जैमुनी पतपेढी,   बसिन कॅथॉलिक बँक, वसई जनता सहकारी बँक , इंडियन ऑइल,भारत पेट्रोलियम ,सामवेदी ब्राह्मण संघ ,त्रिलोक साउंड सर्व्हिस , मंडप व्यवस्थेसाठी  श्री किशोर नाईक ,जाहिरातदार, देणगीदार  व  श्री विष्णू पाटील यांचे आभार मानले.  

हरवलेलं बालपण परत करणारं नर्मदालय !






नर्मदा परिक्रमेच्या वेळी , नर्मदा किना-यावरील ग्रामवासीय व विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना लक्षात आलं की ८ वी ९ वीच्या विद्यार्थ्यांना स्वतः चं  नाव ही लिहता येत नाही तेव्हाच नर्मदाकिनारी  बालशिक्षण क्षेत्रात काम करायचं ठरवलं सुरवातीला मंडलेश्वरच्या समोरच्या तटावर आठ किलोमीटर दूर असलेल्या लेपा गावी नर्मदालय  सुरु केल. नर्मदालय म्हणजे अनौपचारिक  शिक्षण (Non formal Education ).  मुलांना सांगितलं होतं की शाळेत गृहपाठ घेणार नाही , परीक्षा नाही,पहिले काही महिने  वह्या, पुस्तकाला  हातच लावायचा नाही , पहिल्या दिवशी १४ विद्यार्थी होते. एका गावातून दुस-या ,तीस-या ,पाचव्या खेड्यात असे आज पंधरा खेड्यातून १७०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.  गरजेतून मेडिकल कॅम्प सुरु झाले. एकटीने राहण्यापेक्षा जोडीला तीन मुलांना  घेतलं  त्यातून निवासी नर्मदालय सुरु झालं आज ४० आदिवासी विद्यार्थी निवासी नर्मदालय मध्ये आहेत. ही मुलं दहावी पास होऊ शकत नाही हे लक्षात आलं होतं. त्यांना  पाबळ येथील विज्ञानाश्रमातील  एक वर्षाच्या बेसिक इन रूरल टेक्नोलोंजि या कोर्स साठी पाठवलं, मुलांनी तो उत्तमरीत्या केला त्यांचं टाटा मोटार्स सारख्या कंपनीत निवड झाली परंतु ह्या मुलांनी ते नाकारून आपल्या गावी येऊन काम करण्याचं ठरवलं शाळेतील इलेक्ट्रिक , वेल्डींग व सुतारकामं ही मुलं करतात.


मध्यप्रदेश शिक्षण विभागाशी संलग्न असलेल्या रामकृष्ण शारदा निकेतन ची तीन विद्यालयं लेपा , तेली भटियार आणि  छोटी खरगोन येथे सुरु झाली. ह्या शाळेत मोफत मध्यान्ह भोजन दिलं जातं.समतोल आहारामुळे गैरहजेरी कमी झाल्याचं , मुलांचं आजारपण कमी झाल्याचं तसेच आकलन शक्तीत वाढ झाल्याचं लक्षात आलं. निवासी शाळे मधील  सरदार सरोवराच्या मध्यवर्ती ठिकणातील ही  आदिवासी मुलं पहाटे पाच वाजता उठतात. प्रार्थना म्हणतात त्याना भगवद गीतेतील चार अध्याय पाठ आहेत. आदिशंकराचार्याची २२ स्तोत्रं मुखोद्गत आहेत. नर्मदालयातील मुलांनी बनवलेल्या सोलार ड्रायरला NCRT आणि मध्यप्रदेश स्टेट एजुकेशन बोर्ड यांनी आयोजित केलेल्या स्पर्धेत राज्यस्तरीय पाहिलं पारितोषिक मिळाले.  टाटांनी मध्यप्रदेशातील पाहिलं रूरल टेकनॉलॉजि सेंटर नर्मदालयात केलं त्याचं उदघाटन प्रसिद्ध शास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांनी केलं.   हे सर्व करीत असताना लोकं  "तुम्ही यातून काय साध्य केलं ? असे विचित्र प्रश्न विचारतात.  मी त्यांना सांगते तुम्ही ज्याला बालमजुरी म्हणता त्याला मी एक प्रकारचं जीवनशिक्षण म्हणत असते. अश्या मुलांना त्याचं हरवलेलं बालपण अंशतः परत करण्याचं काम नर्मदालय करते असे प्रतिपादन श्रीमती भारतीताई ठाकूर यांनी केलं.




त्या वसईतील संजीवनी व्याख्यानमालेत बोलत होत्या. संजीवनी परिवारानी नर्मदालयाल ५१ हजार देणगी देण्याचं निश्चित केलं होते हे जेव्हा डॉ नारळीकर दांपत्यांना कळलं तेव्हा त्यांनी मानधन  न घेता नर्मदालयाला वर्ग करण्याची विनंती केली एकूण ६१ हजाराची देणगी संजीवनी टीमने ताईकडे सुपूर्त केली.


सुरवातीला सौ स्वाती नाईक यांनी पाहुण्यांची ओळख व प्रास्ताविक केलं. अध्यक्ष स्थानी सौ. सुलभा म्हात्रे होत्या. सौ उर्मिला नाईक हिने स्वागतगीत सादर केले.  साथसंगत श्री अरविंद पाटील व कौस्तुभ पाटील यांनी केली. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन धनाली जोशी हिनं केलं. 


संजीवनी व्याख्यानमाला आयोजनात जैमुनी पतपेढी , बस्सीनं कॅथॉलिक बँक , इंडियन ऑइल कॉर्पोरेशन व भारत पेट्रोलियम नी मोलाचं सहकार्य केलं.




 संजीवनीच्या कापडी पिशवी मधून - वसईचा मेवा 

भारतीय संशोधकांचा दर्जा उत्तम --- डॉ. जयंत नारळीकर







भारतीय संशोधकांचा  दर्जा उत्तम असून त्यांना विशेष   मागणी आहे. कॅलिफोर्निया इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजि मध्ये खगोलशास्त्र विभाग पाहायला गेलो असताना यंत्रसामुग्री अशीच पडून होती त्या विषयी विचारल्यावर मला सांगण्यात आलं की आयुकातून भारतीय तंत्रज्ञ आल्यानंतर त्याची जोडणी केली जाणार आहे. अशी माहिती डॉ जयंत नारळीकर यांनी  वसईतील संजीवनी परिवार आयोजित  व्याख्यानमालेत बोलताना दिली. 

    






 
मुलांना रोज पाठयपुस्तकातील एक धडा मोठ्याने वाचायला सांगा, कोचीन क्लास ची आवश्यकता राहणार  नाही. असे मार्गदर्शन  डॉ. मंगला नारळीकर  यांनी    बालपण व शिक्षण या विषयी बोलताना केलं.
रविवार दिनांक २९  एप्रिल रोजी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खगोलशास्रज्ञ  डॉ जयंत नारळीकर व डॉ मंगला नारळीकर याच्या मुलाखतीचं आयोजन करण्यात आले होते श्री अरविंद परांजपे , संचालक नेहरू तारांगण यांनी मुलाखतीतून नारळीकर सर व मॅडमचा जीवनपट उलगडून दाखवला. सरांचं बालपण व शिक्षण बनारस   मध्ये झालं व लहानपणा पासूनच ते त्रैभाषिक होते.आणि कधीच पहिला नंबर सोडला नाही.  मंगला मॅडमना लहानपणा पासून गणिताची आवड होती त्यात इतक्या तल्लीन  होत की गणित सोडवतना त्या शाळेत अडकून पडल्याचा किस्सा सरांनी सांगितला. 

डॉ. नारळीकरांनी आपले समकालीन कार्ल पिअरसन व नुकतेच जग सोडून गेलेल्या स्टीफन हॉकिंग च्या आठवणी जागवल्या.   स्टीफन हॉकिंग मीडियाचा आवडता होता व त्याच्या विषयी उलटसुलट बातम्या छापून येत असत स्टीफन हॉकिंग ला त्याच्या जीवनात उत्तम साथ देणा-या पत्नीशी घटस्फोट  तो देव मानत नव्हता आणि ती देव मनात होती ह्या कारणामुळे झाल्याचं छापून आल्याचा किस्सा सरांनी सांगितला. 
 

सुरवातीला हेमंत नाईक यांनी वर्षभराच्या उपक्रमाचा आढावा घेतला व पाहुण्याची ओळख करून दिली. सुत्रसंचलन प्रतीक म्हात्रे यांनी केलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री राघो नाईक होते. ईशस्तवन  व स्वागत गीत जुईली पाटील हिने  सादर केलें. 

वसईचा मेवा फळं, पालेभाजी, भाजी  ,सुकामेवा ची परडी/टोपली पाहुण्यांना देताना ,







Monday 16 April 2018

"आज" सूंदर बनवू या !!!


             
 
उजाडणारा प्रत्येक दिवस जीवन अधिक प्रगल्भ ,परिपक्व करत असते. कळीचं सूंदर फुलं बनतं. जीवनात गुंतागुंत आहेच परंतु इच्छाशक्ती असेल जगण्याचं एक   सूत्रं असेल. तर प्रत्येक दिवस सुंदर , सर्वोत्तम बनल्याशिवाय राहत  नाही.
बहुतांश लोकं दिवस चांगला कसा गेले. हे सांगू शकत नाहीत. ते ग्रह ता-यांना  ,नशिबाला श्रेय देतात. आणि आपला दिवस चांगला का गेला याच  सूत्र हरवून बसतात. भूतकाळात रमतात.  
म्हणून   रोजिनींशी किंवा नोंद करून ठेवल्यास,  . चांगला दिवस व्यतीत करण्याचं सूत्र गवसेल.
जीवनात उद्देश, कृतज्ञता , साधना , मजा आणि प्रवाहीपणा, कामसूपणा  असेल तर प्रत्येक दिवस चांगला होत जातो





 उद्दिष्टाचा पाठपुरावा करा ! :
आज आपल्याला काय साध्य करायचं आहे , त्यासाठी काय करणे आवश्यक आहे. हे लिहून काढा. एकदा उद्दिष्ट ठरलं की वृत्ती तशी बनते. उद्दिष्ट अधिक आनंददायी होईल या कडे कल होतो  ,नैसर्गिक रित्या त्या दृष्टीने काम करण्यास प्रवृत्त होत . दिवस सुंदर बनत जातो. 
कृतज्ञ बना !
कृतज्ञता आपल्या जीवनातील नकारात्मकता ,भीती निराशाला पळवून लावते. सकाळी दिवससुरु करण्याअगोदर आपल्या आयुष्यातील अदभूत गोष्टी बद्दल, व्यक्ती बद्दल , मित्रपरिवारा बद्दल कृतज्ञता व्यक्त करा. जीवनात अश्या असंख्य गोष्टी आहेत कि ज्या विषयी आपण कृतज्ञ असायला हवं.  कृतज्ञता दर्शवणे सर्वस्वी आपल्या हातात आहे. जेव्हा तुम्ही कृतज्ञता बाळगता तेव्हा दिवस आपोआप चांगला बनतो.
साधक व्हा!
 चिंता,भीती,अधीरता, कृतघ्नता या भावना   रात्रंदिवस आपल्याला अस्वस्थ करतात परंतु  या गोष्टी वर जाणीवपूर्वक ताबा मिळवता येतो. रोजचं दहा वीस मिनिटाची साधना ,संकल्प दृढ करण्यास मदत करते, मनातील नाकारात्मक  विचारांचं मूळ शोधण्यात मदत होते. दिवस सर्वोत्कृष्ठ बनवण्याची संधी देते.
 मजा करा रे मजा मजा !!
सर्वोत्तम दिवस म्हणजे खूप परिश्रम असा अर्थ नव्हे. लहानपणची कविता आठवते का मजा करा रे मजा मजा, आजचा दिवस तुमचा समजा!  जर आपण जीवनाची मजा घेत  नसू  तर उत्साह टिकणार नाही. मजा यश टिकवून ठेवण्यात मदत करते. 
 प्रवाहित रहा, कामसू बना!!      



 प्रवाह म्हणजे अविचलित वाहत राहणं.  तुम्ही करत असलेल्या कामा व्यतिरिक्त , दुसरं काही सुचत  नाही. अश्या ध्यासाने एखादी गोष्ट करत असू तर दिवस,काम  सर्वोत्तम बनल्याशिवाय राहणार नाही. सर्वोत्तम दिवस बनवण्यासाठी लक्ष  विचलित कारण-या गोष्टीचा त्याग करावा लागेल. उदा. फेसबुक , सोशल मेडीय आपलं लक्ष विचलित करतात. कामात व्यत्यय आणतात. अश्या गोष्टी टाळायला हव्यात.  
खात्री आहे की जर आपण रोजचा दिवस आपल्या जीवनातील सर्वोत्तम दिवस बनविला तर या जगातील सर्वात मोठ्या समस्या गायब होतील लोक आपल्या स्वतःच्या जीवनावर प्रेम करतील.   औषधे किंवा अल्कोहोलचा खोटा आधार घ्यावा लागणार नाही .गुन्हे , हिंसा गुन्हेगारी अशांतता ची मूळ कारणं नष्ट होतील.
  ज्याचा रोजचा दिवस सुंदर छान व्यतीत झाला त्याचा आठवडा , पंधरवडा , महीना , वर्ष , जीवन ही छान सूंदर कृतार्थ झालं की. 
आपण आजचा दिवस सूंदर, छान  सर्वोत्तम करू या !!! 
 
  (एका इंग्रजी लेखाचं स्वैर भाषांतर, त्रुटींची जबाबदारी माझी)