वृक्ष हे भुतलावारील देवदूत आहेत. मानवाच्या जन्मापासून मृत्युपर्यंत साथ देणारा मित्र म्हणजे वृक्ष. पांगुळगाडा ते तीरड़ीपर्यंत साथ देणारा सोबती. दगड मारणार्याला ही मधुरफळ देणारा, पाणि देणार्या व् खांडावयास आलेल्या दोघानाही सारखीच सावली देणारा तत्त्वज्ञ, मार्गदर्शक म्हणजे वृक्ष.
निसर्गाच्या व्यवस्थापना मध्ये वेगवेगळी चक्र सुरु असतात. शाळेत असताना शिकलेल जलचक्र आठवत का ?. ह्या सगळ्या चक्राकार कृतिमुळ मर्यादित साधनांची अमर्याद कालापर्यंत वापरण्याची व्यवस्था निसर्गाने केलेली आहे .
माणूस उच्छवासातुन कार्बन डायऑक्साइड सोडतो, झाडं तो ग्रहण करतात व् त्यानी सोडलेला प्राणवायु माणूस ग्रहण करतो. माणसाच्या वाढ़ीसाठी आवश्यक असणारी जीवनसत्व व् खनिज, झाडा पासून मिळत असतात (फळ ,भाजीपाला कडधान्य) ,जमिनीची धुप व् भुगार्भातील पाण्याची पातळी टिकविण्याचे काम झाडं
करत असतात. असंख्य पक्षांच व् प्राण्यांच झाड हे आश्रयस्थान आहे. आशी ही झाडं त्यांच्या सान्निध्यात आलेल्याना न बोलता शिकवतात.
करत असतात. असंख्य पक्षांच व् प्राण्यांच झाड हे आश्रयस्थान आहे. आशी ही झाडं त्यांच्या सान्निध्यात आलेल्याना न बोलता शिकवतात.
ह्या वृक्षाची चैत्रा मधे पालवी नीट पाहिली तर हिरव्या रंगाच्या सर्व छटा आपणास दिसतील
तसेच पिंपळाचे
पाना ची पूर्ण गळती होऊन पिंपळ निष्पर्ण होतो आणि
नवीन पालवीच्या रूपाने रंगाची उधळण सुरू होते.सुरवातीला
लुसलुसीत कोवळी तांबुस पाने हळूहळू पोपटी रंग घेतात व हिरव्या रंगाची रूपॅ दाखवत गर्द हिरवी होतात.
विविध रंगाच्या, विविध सुवासाच्या फुलांनी मानवाचं जीवन अधिक सुंदर व अर्थ पूर्ण बनवले आह
अश्या ह्या झाडांना दर रविवारी भेटण्यातून संजीवनी ला प्रेरणा मिळत असते, नवनवीन उपक्रमाला चालना मिळत असते
आणि मिळत असते प्रसन्नता अनलिमिटेड
श्रीमत शंकराचार्य मंदिरा समोरील पिंपळ आपण या !!!. भेटत राहू या दर रविवारी, न |