Tuesday, 21 July 2026

आंतरिक ऊर्जा : सजगता= उत्साह, अपव्यय= निराशा !

सध्याच्या परिस्थितीत आपण ऊर्जेच्या वापरा विषयी खूपच जागरूक झालो आहोत. ऊर्जा वाचवण्यावर खूप भर दिला जात आहे. योग्यच आहे.  आपण आपल्या आंतरिक ऊर्जा, उत्साहा विषयी सतर्क आहोत का?

आपल्याला दिवस संपता संपता, थकवा आणि अशक्तपणा जाणवतो का?  जाणवत असेल तर समस्या शारीरिक श्रमात नसून, शारीरिक स्थतीवर नसून,  मानसिक स्थितीवर अवलंबून  आहे. म्हणूनच म्हणत असतो कामाने माणूस थकत नाही, तर विचाराने, ताणाने माणूस थकून जातो.

या विषयी नुकताच श्री बावा दिनेश यांचा Feeling Tired All The Time? Fix it now हा विडिओ पहाण्यात आला.

या व्हिडिओमध्ये आपल्या मेंदूची शक्ती, एकाग्रता आणि मानसिक शांतता हळूहळू कमी करणाऱ्या दैनंदिन जीवनातील पाच महत्त्वाच्या सवयी टाळायची सूचना केली आहे आणि आपली एकाग्रता, कार्यक्षमता (Productivity) व मनःशांती  कशी सांभाळावी याचे सोपे आणि प्रभावी उपायही सांगितले आहेत. रोजच्या आयुष्यातील काही साध्या सवयी—उदाहरणार्थ महत्त्वाचे निर्णय सतत पुढे ढकलणे किंवा मोबाईलवरील सूचना (Notifications) वारंवार तपासणे—मेंदूवर प्रचंड मानसिक ताण निर्माण करतात. आपला मेंदू आधीच शरीरातील एकूण रक्तपुरवठ्यापैकी २०% पेक्षा अधिक रक्त वापरत असतो. अशा परिस्थितीत जर आपण सतत मल्टिटास्किंग करण्याचा प्रयत्न केला किंवा मनात त्याच त्याच भावनिक प्रसंगांची पुनरावृत्ती (Emotional Replays) करत राहिलो, तर आपण आपल्या मौल्यवान मानसिक ऊर्जेचा अनेक पटींनी अधिक वेगाने अपव्यय करतो.

१ निर्णय घेण्याचे टाळणे अनेक गोष्टी आपण पुढे, उद्या वर ढकलत राहतो, नंतर करेन इत्यादि. अशा प्रकारे मनात अनेक गोष्टी ओपन ठेवत असतो. संपवून (क्लोज) टाकत नाही. यात मेंदूची ऊर्जा खर्च होत असते.  निर्णय घेताना खलील गोष्टी उपयुक्त ठरतील.

जे खरोखर करायचेच नाही ते पूर्णपणे सोडून द्या. जर करायचे असेल तर तारीख आणि वेळ निश्चित करा. आत्ता नाही पण भविष्यात करायचे आहे.

२. उत्पादकतेचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे एकाचवेळी अनेक गोष्टी करणे (Multitasking)  आपल्याला वाटते आपण अनेक गोष्टी एकाच वेळी करू शकतो. मेंदूची रचना एका वेळी एकाच कामासाठी आहे. त्यामुळे एकाच वेळी अनेक गोष्टींना न्याय् देणे अवघड होते. दर्जा, गुणवत्ते वर परिणाम होत असतो.

३. मनातील काल्पनिक संवाद,  आपण मनात सतत कल्पना करत असतो. मनोरथ वेगाने दवडत असतो. त्यात  मन अकारण व्यग्र होते, उत्साहावर, उर्जेवर विपरीत परिणाम होत असतो.

४. सर्वांना "हो" म्हणण्याचा सापळा: लोकं  नाराज होऊ  नयेत  म्हणून आपण हो ला हो म्हणत असतो. पण प्रत्येक वेळी स्वतःच्या मनाविरुद्ध वागलो की स्वतःबद्दलचा आदर कमी होतो. मनात दव्द्व निर्माण  होते. प्रेम, आदर  म्हणजे अंध आज्ञाधारकपणा नाही.  गरज असेल तिथे ठामपणे "नाही" म्हणता आले पाहिजे.

५. माहितीचा अतिरेक (Information Overload) आज आपल्यावर माहितीचा अक्षरशः मारा होत असतो. माहिती म्हणजे ज्ञान हा गैरसमज पसरत आहे. नको असलेली माहिती ताण, चिंता, अस्वस्थता निर्माण करते, उत्साह हरवून बसतो. 

 

 दिवसाच्या शेवटी जाणवणारा थकवा हा अनेकदा शारीरिक श्रमामुळे नसून मानसिक ऊर्जा अयोग्य ठिकाणी वापरल्यामुळे  जाणवत असतो.  हे आपल्या लक्षात येईल. योग्य काळजी घेऊन, साध्या साध्या सवयी स्वीकारून विचाराची स्पष्टता, एकाग्रता आणि उत्साह उत्तमरित्या वाढवू शकतो. उदा. चालढकल न करता वेळच्या वेळी कामाची सवय, एकाच वेळी एकच कामावर लक्ष केंद्रित करणे, सोशल मीडिया चा अतिरेक टाळणे. नम्रपणे नाही सांगता येणे. इत्यादि सवयी स्वत:ला लावून घेणे म्हणजेच अनावश्यक उर्जेचा, वेळेच्या अपव्यय टाळणे.

ऊर्जा न  ओसांडता, निराशा टाळू या. उर्जेचा योग वापर करून रोजच्या जीवनातील उत्साह वाढवू या !

जिज्ञासूनी यूट्यूब वरील विडिओ अवश्य पहावा.

Sunday, 24 May 2026

तंदुरुस्त, तल्लख आणि सक्रिय वृद्धत्व.

 


अलीकडेच मुंबईत   “ सन्मानाने, स्वावलंबीपणे आणि आनंदाने वृद्धत्व ”   या विषयावर परिसंवाद झाला. तज्ज्ञ मंडळीचा सहभाग होता. त्यातील काही  मुद्दे, विचार.

भारतात पुढील दहा वर्षात,  प्रत्येक ७ पैकी १ व्यक्ती ६० हून अधिक वयाची असेल. वरिष्ठ नागरिकांसाठी  सेवा, उद्योग, आरोग्य, तंत्रज्ञान, निवास, सामाजिक व आर्थिक व्यवस्था उभी करावी लागेल. खालील मुद्द्यावर चर्चा झाली.         


 

सक्रिय वृद्धत्व       :  सक्रिय, स्वतंत्र आणि सन्मानाने वृद्धत्व.

एकाकीपणा          : एकाकीपणा हा मोठा आरोग्यधोका.

आहार ,पोषकतत्त्वे :  प्रथिने, जीवनशैली औषध.

गतिशीलता           : संयुक्त संरक्षण, व्यायाम, संतुलन.

ज्येष्ठांसाठी तंत्रज्ञान  : ॲप्स,  डिजिटल सहवास, प्रवेशयोग्यता.

पिढीगत नाते          :  तरुण आणि ज्येष्ठ पिढ्यांमधील नातेसंबंध.

 

फक्त जास्त वर्षे जगणे महत्त्वाचे नाही; ती वर्षे स्वाभिमानाने, स्वावलंबीपणे आणि आनंदाने जगणे अधिक महत्त्वाचे आहे.”

आपल्यातील प्रत्येकाला स्वाभिमानाने, कुणावरही अवलंबून न राहता आनंदाने आपले रोजचे जीवन जगता यावे अशी मनोमन इच्छा असते.

आज आपल्याकडे वरिष्ठ नागरिकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कुटुंबव्यवस्था बदलते आहे, मुले त्याच्या व्यवसायाच्या दृष्टीने परदेशात किंवा वेगळ्या शहरांत राहत आहेत, आयुर्मान वाढत आहे; पण त्याचवेळी एकाकीपणा, हालचालीतील मर्यादा, जीवनशैलीजन्य आजार आणि मानसिक ताणही वाढत आहेत. अशा काळात  सक्रिय वृद्धत्व  Active Ageing” ही संकल्पना केवळ आरोग्यविषयक नसून सामाजिक, मानसिक आणि सांस्कृतिक गरज बनली आहे.

सर्व तज्ज्ञांनी एक गोष्ट स्पष्ट केली — वृद्धत्व म्हणजे निष्क्रियता नव्हे; तर नव्या प्रकारे सक्रिय होण्याची संधी आहे.

स्वावलंबन, स्वतःची कामे स्वतः करता येणे, चालणे, विचार करणे, निर्णय घेणे, समाजात सहभागी राहणे आणि शेवटपर्यंत सन्मानाने जगणे — हेच सक्रिय वृद्धत्वाचे केंद्र आहे.

वय वाढणे थांबवता येत नाही; पण शरीराची कार्यक्षमता टिकवता येते. त्यांनी “Activities of Daily Living (ADL)” या संकल्पनेवर भर दिला — म्हणजे दैनंदिन कामे सहज करता येणे. वयापरत्वे  शारीरिक शक्ती कमी होते (Strength), समतोल ढळतो (Balance), हालचालीवर बंधनं येतात (Movement), स्नायूची लवचिकता (Flexibility) आणि मानसिक सजगता (Cognitive Sharpness)  या बाबीकडे विशेष लक्ष द्यायला सांगितले.

आहार — औषधापेक्षा प्रभावी,  ८०% आरोग्य हे पोषणावर अवलंबून असते.  , diabetes, fatty liver, obesity यांसारख्या समस्या ६०-७० वयानंतरही जीवनशैली (lifestyle) बदलांनी सुधारू शकतात. सर्वात मोठा गैरसमज म्हणजे या वयात आता काय बदल होणार?”  बदल कोणत्याही वयात शक्य आहेत.  खाण्यात  प्रथिने (protein)  आहे का ते पाहा, प्रक्रिया केले अन्न  (processed food) आणि साखर (sugar)  कमी करा, वाईट आहाराला (supplement food) भरून काढू शकत नाहीत.

अनेक वरिष्ठ नागरिक diabetes किंवा BP मुळे नव्हे, तर  एकाकीपणा (loneliness)  मुळे मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या खचतात.  स्वतःला चार भिंतींमध्ये बंद करू नका.” “Second Innings” ची सुंदर कल्पना मांडली. संपूर्ण आयुष्य कुटुंबासाठी घालवल्यानंतर आता स्वतःसाठी जगण्याची वेळ आली आहे.  ज्ञान घेण्याला वय नसते. नवीन छंद जोडा, मित्रमंडळी तयार करा, कला, योग, सामाजिक उपक्रम यांत सहभागी व्हा,  तरुण पिढीकडून  technology शिका.

समस्या वयाची नाही; समस्या रूढिवादाची  (stereotypes) आहे. म्हणजेच रूढी,परंपरा चा अतिरेक.

तंत्रज्ञान (technology)  ही एकाकीपणा (loneliness)  कमी करण्यासाठी, शिकणे (learning) सुरू ठेवण्यासाठी आणि स्वावलंबन (independence)  टिकवण्यासाठी महत्त्वाची साधन आहे. 

दीर्घायुषी, वृद्ध आहे म्हणजे भाग्यवान आहे.   अनेक senior citizens  फेसबुक, व्हॉटसअप्प,  सक्रिय असल्याचे दिसतात.

भारतीय समाजात वृद्धत्व म्हणजे वेदना स्वीकारणे अशी मानसिकता आहे. पण आजच्या वैद्यकीय प्रगतीमुळे  प्रत्येक अपायवर उपाय आहे.

वेदना ही सामान्य गोष्ट नाही. (Pain is not normal.)  ती संकेत, खूण समजून लवकर निदान करून प्रतिबंधात्मक उपाय योजता येतात. मोठ्या समस्या टाळता येतात.

 कधीही  Longer Life पेक्षा Better Life महत्त्वाचे.

(जिज्ञासू साठी परिसंवाद लिंक https://www.youtube.com/watch?v=2njCg-lNfyI)