शनिवारच्या लोकसत्तेच्या चतुरं ग पुरवणीत बोधिवृक्ष सदरातील प्रयत्नाचं महत्व सांगणारे "प्रयत्नांती सर्व काही" हे संकलन बालपणात घेऊन गेले. बालपणी रोज रात्री झोपताना आजोबा कविता बोलायचे. कविता ऎकतच झोपेच्या स्वाधीन व्हायचे. आजोबा छान चालीत कविता म्हणायचे , कविता हि सहज, सोप्प्या सुंदर होत्या. कवितेतून काहीतरी उपदे श असायचा. प्रयत्न आणि निश्चयाचे महत्व सांगणारी "एका कोळ्याचे प्रयत्न ", एका कोळियाने (Spider ) हि कविता आठवते. एक कोळी आपले जाळे खूप उंचावर बांधतो. जाळ्यातून खाली येतो आणि परत जाता येईना खूप कष्टी होतो. परत परत प्रयत्न करतो. धीर धरून पुन्हा प्रयत्न करतो जाळ्यात जाताना झोक जाऊन पडतो. आपल्या दैवाला दोष देतो. परंतु चित्त त्याला स्वस्थ बसू देत नाही. मग नेटानी उठून सर्व खबरदारी घेत जाळ्यावर पोहोचतो व आत प्रवेश करतो. आणि आनंदून जातो. कवी ने शेवट तुकारामांच्या पक्तीने केला आहे " निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ".
एका कोळिय़ाने एकदा आपुले।जाळे बान्धिय़ेले ऊन्च जागी।।
तेथुनि सुखाने खालती तो आला।परि मग झाला कष्टी बहू।।
मागुति जाळिया माजि जाता य़ेना।धाग्य़ावरुनि पुन्हा पुन्हा पडे।।
चार वेळ तो ह्या परि पडे। जाय बापुडा भागुनि पुढे।।
आस खुन्टली येतसे रडे। आन्ग टाकुनी भूमिसी पडे।। तेथुनि सुखाने खालती तो आला।परि मग झाला कष्टी बहू।।
मागुति जाळिया माजि जाता य़ेना।धाग्य़ावरुनि पुन्हा पुन्हा पडे।।
चार वेळ तो ह्या परि पडे। जाय बापुडा भागुनि पुढे।।
फिरुनि एकदा धीर घरुनिया।लागे हळुहळु वरती चढाया।।
परि जाळ्यमघि शिरताना। तो झोक जाउनी पडला।।
परि जाळ्यमघि शिरताना। तो झोक जाउनी पडला।।
पाचहि वेळा यत्न करुनिया। आले यश न तयाला।।
गरिब बापुडा कोळी तेव्हा। दुक्खि अतिशय झाला।।
हिम्मत धरुनि फिरुनि । आणखि धागा चढुनि गेला।।
परि जाळ्यामधि शिरताना । तो झोक जाऊनि पडला।।
अहा मज ऐसा दैवहत प्राणी ।खचित जगतीया दिसतनसे कोणी।।
निराशेने बोलुनी असे गेला। परि चित्ति स्वस्थता नये त्याला।।
मग वेगे वेगे ऊठे धागा चढु लागे नेटे। बहु घेई खबरदारि जाई पोचे जाळ्यावरी।।
अहा मज ऐसा दैवहत प्राणी ।खचित जगतीया दिसतनसे कोणी।।
निराशेने बोलुनी असे गेला। परि चित्ति स्वस्थता नये त्याला।।
मग वेगे वेगे ऊठे धागा चढु लागे नेटे। बहु घेई खबरदारि जाई पोचे जाळ्यावरी।।
हळुच मग आत शिरे पोटी आनन्दाने भरी।झटे निश्चयाचे बळे अन्ति त्याला यश मिळे।।
निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ
निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ
प्रयत्न करणा-यांला कधीच अपयश येत नाही, पराभव होत नाही. कवी सूर्यकांत त्रिपाठी "निराला" , सागतात मैदान सोडून पळू नका संघर्ष करा. फुकटचा जयजयकार कधी होत नाही
कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती
लहरों से डर कर नौका पार नहीं होती,कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती ।
नन्हीं चींटी जब दाना लेकर चलती है,
चढ़ती दीवारों पर, सौ बार फिसलती है ।
मन का विश्वास रगों में साहस भरता है,
चढ़कर गिरना, गिरकर चढ़ना न अखरता है ।
आख़िर उसकी मेहनत बेकार नहीं होती,
कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती ।
डुबकियां सिंधु में गोताखोर लगाता है,
जा जा कर खाली हाथ लौटकर आता है ।
मिलते नहीं सहज ही मोती गहरे पानी में,
बढ़ता दुगना उत्साह इसी हैरानी में ।
मुट्ठी उसकी खाली हर बार नहीं होती,
कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती ।
असफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो,
क्या कमी रह गई, देखो और सुधार करो ।
जब तक न सफल हो, नींद चैन को त्यागो तुम,
संघर्ष का मैदान छोड़ कर मत भागो तुम ।
कुछ किये बिना ही जय जय कार नहीं होती,
कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती ।
दोन्ही कवींनी उदाहरणं दिली आहेत कि छोटे छोटे जीव (मुंगी,कोळी) प्रयत्नांनी ठरविलेलं उद्दिष्ट गाठतात तर मनुष्याला काहीच अशक्य नाही. योग्य प्रयत्नांनी सर्व काही साध्य आहे. परमेश्वर सुध्दा प्राप्य आहे.