सुळेश्वर कडून विमलतीर्थ |
निर्मळ कडून वसई कडे जाताना उजवीकडे असलेल्या तलावाला विमलतीर्थ म्हणतात. विमालासुर दैत्या वरून हे नाव पडले अशी कथा प्रचलित आहे. विमालासुर हा शिवभक्त होता. त्यांनी तुंगारेश्वर येथे तपस्या करून शंकराला प्रसन्न करून घेतले होते व त्यांच्या कडून अभय मिळविले होते. पुढे त्यांनी लोमहर्षण ऋषीकन्येचे अपहरण केले. ऋषी कन्येने परशुरामाचा धावा केला. परशुराम भूमिकर्ते व आश्रयदाते होते. त्यांनी विमलसुरा चा वध केला. विमलासुराचे शीर खाली पडल्यावर आनंदाने हसू लागले, व परशुरामांना म्हणाले, मला थोर शिवभक्तां कडून मरण आले आहे. ज्या ठिकाणी माझे शरीर पडले आहे तेथे शिवमंदिराची स्थापना करा व त्याला विमलेश्वर महादेव म्हणून प्रख्यात करा. परशुरामाने त्याच्या इच्छे प्रमाणे सुंदर मंदिर बांधले व शिवलिंगाची स्थापना केली. मंदिराभोवती तलाव खोदून त्यात वैतरणा , गंगा , भागीरथी आदी पवित्र तीर्थाचे पाणी आणून सोडले,
हेच विमलतीर्थ.
निर्मळ मंदिरा कडून विमलतीर्थ |
दक्षिणे कडून विमलतीर्थ |
विमालासुर जिथे पडला तेथून त्याच्या रक्ताचे पाट पूर्वे कडे वाहत गेले. तो गाळ काढून तीर्थ निर्माण केले म्हणून पलीकडील (पूर्वेच्या) तीर्थाला निर्मळतीर्थ म्हणतात. त्याच्या जवळच्या टेकडीवर निर्मळेश्वर मंदिराची
स्थापना केली.
स्थापना केली.
निर्मळतीर्थ |
दुर्गामाता मंदिर |
गणेश मंदिर |
हनुमान मंदिर |
श्री सांब सिद्धेश्वर मंदिर : विमलतीर्थाच्या ईशान्य कोप-यावर हे मंदिर आहे. पेशवे सरकारचे सुभेदार श्री शंकराजी केशव फडके यांनी त्याचा जीर्णोद्धार केलेला आहे. दर्शनी दरवाजा जवळ अलीकडेच दत्तमंदिर बांधलेले आहे. मंदिराच्या मागे एक भव्य शिवलिंग आहे.
श्री सांब सिद्धेश्वर मंदिर |
श्री सुरेश्वर महादेव : हे मंदिर परशुरामांनी निर्माण केले. पेशवे काळात ह्याचा जीर्णोद्धार झाला. श्री सुरेश्वर महादेव म्हणजे सुरपूरी च्या देवाचे देव. मंदिराच्या बाहेर चौथ-या वर श्री पार्वतीचे शिल्प आहे. लोक त्याची उपासना सुरेश्वरी देवी म्हणून करतात. पूर्वी नवसाला पावणारी देवी म्हणून ख्याती होती.
श्री सुरेश्वर महादेव |
विमलतीर्थ व परिसरातील मंदिरं पाहीली असता तसेच श्रीमंत पेशव्यांनी केलेला जीर्णोद्धार बघता विमलेश्वर, विमलतीर्थ हिंदू साठी फार मोठे तीर्थस्थान होते याची जाणीव होते. या स्थळांचा लोकजीवनावर हि फार मोठा प्रभाव होता हे खालील अंगाई गीतावरून ध्यानात येईल.
पड रे तू पाण्या , दारी माझ्या चिखल !
घरी माझ्या विठठल पंढरीसो !!
पंढरीसो विठोबा विटेवरी उभो !
सर्व अंगी टीळो चंदनासो !!
नारायणे देवा एवढे बाळे सांभाळा !
मी जाईने इंबाळा आंघोळीला !!
इंबाळामीने कंबळाशी शोभा !
ईश्वराची पूजा करो जाईने
इंबाळामीने कंबळाशी शोभा !
(संदर्भ आद्य श्री परशुरामक्षेत्र निर्मळ सुरपूर -विवेकानंद गोडबोले ,इतिहास संशोधन मंडळ कल्याण .)
|