युवर एरोनिअस झोन्स हे डॉक्टर वेन डायर याचं पहिले पुस्तक. जे एक वर्षाहून अधिक काळ बेस्ट सेलर म्हणून राहिलं आहे. एरर म्हणजे चूक.
एरोनिअस झोन्स म्हणजे आयुष्य जगताना आपण करत असलेल्या चुका ,हे पुस्तक वाचताना एक गोष्ट लक्षात येईल कि आपल्या भावना वर आपण नियत्रण करू शकतो. जीवनात जी स्थिती उदभवते किंवा ज्या परिस्थितीचा सामना करावा लागतो, ती स्थिती किंवा परिस्थिती आपल्या भावनाची किंवा प्रतिक्रियांची निर्मिती असते. भावना किंवा प्रतिक्रियेची आपण निवड करत असतो प्रसंग,वस्तू किंवा माणसा विषयी आपण भावना व्यक्त करत असतो किंवा प्रतिक्रिया देत असतो. आपण निवड करणारी एक व्यक्ती असतो. या पुस्तकात ते आपल्या चुकीच्या मानसिकतेचे विश्लेषण करतात व त्यावर मात करण्याचे उपाय सुचवतात.
दोन विशेष /मुद्धे मांडतात : आपण कोण आहोत, असायला हवे हे आपणच ठरवत असतो आणि चालू क्षणा वर आपण ताबा घ्यायला हवा. जीवनाच्या प्रवाहात आपण काही चुकीच्या संकल्पना मानत आलो आहोत.
बहुतेक वेळा काही विपरीत घडल्यावर त्याची जबाबदारी झटकून परिस्थितीला किंवा दुस-याला आपण दोषी ठरवत असतो. जीवनात घडणा-या प्रत्येक गोष्टीला आपण स्वत: जबाबदार असतो ,आहोत.
नवीन असं काही नाही, आपण आपले विचार संयमित करत असतो, ज्याचा परिणाम आपल्या भावना वर होत असतो,त्यातूनच क्रिया , प्रीतीक्रिया घडत असते .
आपण जे करू इच्छितो त्यामध्ये नकारात्मक विचार खो घालते ते करण्या पासून परावृत्त करते उदाहरण द्यायचं झाल्यास लाजाळू पणा मुळे तुम्ही आपल्या आवडीच्या माणसाला ओळख करून देत नाहीत.
लहानपणा पासून आपल्या वर नकारात्मक विचाराचा प्रभाव असतो. हे करू नका , ते करू नका , हे तुम्हाला जमणार नाही , ते आपले काम नाही असे विचार आदळत असतात. हे सर्व टाळायला हवे. हे बदलून सकारात्मक विचार आत्मसात करणे कठीण आहे परंतु सकारत्मक विचारानेच आपण प्रगती करू शकू.
जीवनात मोठे होण्याची प्रत्येकाची इच्छा असते. आपल्यात काही कमी आहे, काही मिळवायचे आहे त्यासाठी केलेली मेहनत दुय्यम मानली जाते. दुसरा एक विचार म्हणजे जीवन प्रवाह म्हणजे जीवनमानात सतत होणारी वाढ. अश्या वाढी मुळे जीवन अधिक समृध्द होते, आनंदी बनते.
स्वत: वर प्रेम करा
असं म्हटलं जातं कि जो स्वत:वर प्रेम करू शकत नाही, तो दुस-यावर प्रेम करू शकणार नाही. स्वत: वर प्रेम करणे म्हणजे आपण जसे आहोत तसा स्वीकार करणे. त्याने स्वत:ची एक सकारात्मक प्रतिमा तयार होते.
स्वत:ला कमी लेखण हि एक पळवाट/ सबब आहे. (उदा. काही गोष्टी न करण्यासाठी अशी कारणं दिली जातात …. मी जाड आहे, लंबू आहे, त्यामुळे …. . मी रागीट , मी लाजाळू आहे त्यामुळे …. )
संमती (Approval)
इतरानी केलेली प्रशंसा , दिलेली मान्यता/संमती सर्वाना आवडते , आनंददायी वाटते, तथापि ती आपली गरज असू नये. आपले अस्तित्त्व जर दुस-याच्या मान्यतेवर /संमती वर अवलंबून असेल तर त्यांनी मान्यता काढून घेतल्यावर कोसळून जाईल. दुसरे काय म्हणतात याची चिंता करत राहिलो तर आपण आनंदी राहू शकत नाही.
संमती / मान्यतेची गरज का वाटते?
जबाबदारी दुस-यावर टाकण्याची वृत्ती , तुम्ही दु:खी कष्टी आहात कारण इतरांमुळे
कोणी सांगितल्या शिवाय पुढाकार न घेणे,
संमतीच्या आवश्यक्यते मुळे तम्ही स्वत:ला गरीब बिच्चारे बनवता. त्यांमुळे काही करू शकत नाही अशी प्रतिमा तयार होते.
स्वत:ला पटलेल्या गोष्टी करा. कोणीही तुम्हाला कमी लेखू शकत नाही जो पर्यत तुम्ही स्वत: तसे वाटून घेत नाहीत.
खंत, दोषी / चिंता, काळजी
खंत भूतकाळाशी निगडीत आहे तर चिंता काळजी भविष्याविषयी असते. दोन्ही गोष्टी वर्तमान काळातील आनंद हिरावून घेण्याचे काम करत असतात.
झालेल्या गोष्टीबद्दल स्वत:ला दोष देणे किंवा त्याची खंत बाळगल्यामुळे भूतकाळ बदलत नसतो. चुका पासून शिका पुन्हा होणार नाहीत असं पहा.
चिंता किंवा काळजी भविष्यकाळात काय घडेल या विषयी असते. काळजी करण्यापेक्षा योग्य योजना आखून पुढील गोष्टीची काळजी घ्या. चिंतेला कारणच ठेवू नका.
अज्ञाता ची शक्यता पडताळून पहा.
अज्ञाता ची भीती खूप वेळा कोणाला काय वाटेल यातून उदभवते, कोण काय म्हणते या पेक्षा आपल्या वागणुकीचे मूल्यमापन करा .
अज्ञात गोष्टीची भीती वाटत असते. निवीन लोकांना भेटा , निवीन गोष्टी शिका.
परंपरेची बेडी
निवीन मार्ग न शोधता मळलेल्या वाटेने जाण्याचा कल असतो. बदलत्या परिस्थितीत नाविन्याचा शोध घ्या.प्रगतीला बाधक ठरणा-या परंपरेचा त्याग करा.
जर खात्री नसेल तर नवीन मार्ग न शोधता, जुनी मळलेली वाट धरून जबाबदारी टाळली जाते. परंपरा पाळणे सोप्पं असते. विचार करण्याची गरज नसते.
समर्थन
योग्य बदल नकरता चुकीचं समर्थन करत राहणे , तो तसे करू शकतो तर मी का नाही. असं समर्थन करणं हे चुकीचं वागणं आहे. हि एक सबब असते.
चालढकल
आपण काही करू इच्छितो परंतु सतत पुढे ढकलत राहतो , जसं आज नाही उद्या. काही गोष्टीच महत्त्व जाणून वेळच्या वेळी करणं योग्य असते.
चालढकल का करतो.
चालढकल समस्या टाळण्याचा मार्ग आहे असे वाटते. समस्या आपोआप टळेल असे वाटते.
अपयशाची भीती वाटून काही न करणे.
पुरेसा वेळ द्यायला लागू नये.
स्वावलंबी बना.
दुस-यावर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला अशी एक म्हण आहे. अवलंबून असलेल्यांना दुस-याचा कलाने वागावे लागते. स्वावलंबन म्हणजे आपल्या उक्ती कृतीचा स्वत: मुख्यातार.
राग
राग हि खिळवून ठेवणारी नकारात्मक भावना आहे. माणसाच्या निराशेची किंवा नाराजीची ती एक प्रतिक्रिया आहे. बहुतेकदा अपेक्षेच्या विपरीत घडल्यावर हि भावना उदभवते.
आपण रागावतो कारण आपल्या कृतीची जबाबदारी दुस-या वर ढकलण्यासाठी.
दुस-यांना घाबरवण्यासाठी रागावतो.
आपल्याला पाहिजे तसे रागावल्या मुळे होत असेल तर रागावतो.
लेखकाने जीवनाच्या विविध अंगात जाणता ,अजाणता घडणा-या चुकांची चर्चा , कारणमीमांसा केली आहे. योग्य मानसिकतेने ह्या गोष्टी टाळता येऊ शकतात.