Monday, 10 August 2015

जग बदलायची सुरवात आपणा पासून!

घराला आग लागली आहे. 
. . 
घरात माणसं झोपलेली आहेत  आणि त्यांच्या जीवाला धोका आहे. 

घराच्या भोवती   सात शेजारी  आहेत, वृत्तीने हे शेजारी भिन्न भिन्न आहेत. आग विझवून कोण वाचवेल या घरातील रहिवाश्यांना!   

शेजारी क्रमांक १

आपल्याच विचारात गर्क आहे.त्यातच तल्लीन आहे त्यामुळे आगीच भान सुद्धा नाही.  
 
शेजारी क्रमांक २

घराला लागलेली आग दिसत आहे परंतु मला काय त्याचे अश्या  वृत्ती ने पुढे निघून जातो. 
 
शेजारी क्रमांक ३

घराला लागलेली आग पाहतो आणि  मूर्च्छीत  होऊन पडतो.  
 
शेजारी क्रमांक ४ 

घराला लागलेली आग पाहतो आणि प्रथम अग्निशमन दलाला फोन करतो नंतर घरात झोपलेल्या रहिवाश्यांना जागं करण्यासाठी धडपड करतो. 

शेजारी क्रमांक ५ 

घराला लागलेली आग पाहतो आणि कोणी करणार नाही अश्या  धैर्याने घरात प्रवेश करून रहिवाश्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतो. 
 
शेजारी क्रमांक ६ 

घराला लागलेली आग पाहतो आणि एकंदरीत अंदाज घेतो आपणा साठी काय संधी आहेत. परिस्थितीचा कसा फयदा उठवू शकतो. 

शेजारी क्रमांक ७
  
घराला लागलेली आग पाहतो, काश्याशीच काळजी न करता लपून मजा बघतो. 

 आग लागलेलं घर म्हणजे आपली धरणी माता. 

आणि भूमातेला या संकटा पासून , समस्या पासून , वाचवू शकतील अशी तिची लेकरें  सर्व साधारण पणे वरील सात वृत्तीत  विभागलेली. आपण कोणती वृत्ती जोपासतो आणि त्यापेक्षा उन्नत कसे होता येईल.    
 
वरील  कवितेची मध्यवर्ती कल्पना संध्याच्या काळातील महत्वाच्या प्रश्नाशी निगडीत आहे. आपलं जग वेगवेगळ्या समस्येच्या अग्नीने  वेढलेलं आहे आणि कड्यावरून कोसळण्याच्या स्थितीत आले आहे. आपण प्रत्यके जण काय करू इच्छितो , योग्य आणि आवश्यक कृती करण्यासाठी लोकामध्ये कश्याप्रकारे चेतना निर्माण करू शकू यावर भविष्य अवलंबून आहे. 

अर्थातच आपल्या पैकी खूप कमी जण जगाच्या कल्याणासाठी आपलं बलिदान करतील. आपण सदैव त्यांच्या ऋणात राहू परंतु आपणही शेजारी क्रमांक चार प्रमाणे आग विझवायचं  , लोकांना जागृत करण्याचं काम करायला हवं. 
 
दुर्दैवाने या विशिष्ट  टप्प्यावर मोठी समस्या आहे कि खूप थोडया लोकांना आगीची, समस्येची  जाणीव आहे आणि  ती विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. खूपशा लोकांना आगीची जाणीव नाही किंवा मला काय त्याचे अशी वृत्ती आहे, 

पहिल्या क्रमांकाच्या शेजा-याला घराला आग लागली आहे , हे दिसतच नाही. त्यांना समस्येची जाणीवच नाही. ते अज्ञानात जगत आहेत, आपल्या रोजच्या जगण्यात गुरफटले आहेत.मुळात हि मंडळी चांगली आहे, आपले शेजारी आणि मित्र आहेत. हळुवार पणे त्यांना जागृत करून, शिक्षित करून, समस्येच्या सोडवणुकीच्या कामात सामील करून घ्ययला हवे.
   
दुस-या प्रकारचे शेजारी फारच भयानक आणि सर्वात जास्त डोकेदुखी. देणारे आहेत. या सर्वाना आपण चांगले लोक म्हणून समजतो परंतु चांगली लोकं कायमच योग्य गोष्टी करतात असे नाही. त्यांना समस्येची जाणीव आहे परंतु ते मदत करायचं नाकारतात, ते प्रयत्न करू इच्छित नाहीत. 
ते आळशी आहेत का ? कदाचित काही जण निरुत्साही आहेत , काही जण आत्मकेंद्रित आहेत व आरामदायी जीवन जगण्यात मश्गुल आहेत. त्यांना लोकांच्या सुख दुख:शी देणे घेणे नाही. जग असेच चालणार काही बदलणार नाही अश्या नकारात्मक दृष्टीकोना मुळे प्रयत्न करण्या अगोदरच  हे हरेलेले असतात.   अश्या लोकांकडे आपण दुर्लक्ष करायला हव. अशी लोक कधीच प्रेरित होणार नाहीत अश्यांना सांगायला हवे तुम्ही मदत करू शकत नसाल तर अडथळा आणू नका,  रस्त्यातून दूर व्हा . 
 
तिस-या प्रकारची लोकं चांगली आहेत. त्यांना समस्येचं भान आहे. भीतीनी त्यांची गाळण उडते , प्रसंगाला सामोरे जायचं मनोधैर्य नसते. अश्या लोकांची  भीती दूर करायला हवी आणि चांगल्या  कामा साठी मन तयार करायला हवे. 
 
चार आणि पाच प्रकारची लोकं प्रामाणिकपणे व विवेकबुद्धीने लोकांना मदत करत असतात. आपल्याला अश्या प्रकारच्या जास्त लोकांची आवश्यकता आहे. 
 
सहा आणि सात या प्रकारातील लोकं, चांगल्या कामात आडकाठी आणत असतात. 
 
सहाव्या प्रकारातील लोकं संधिसाधू असतात. आपल्या स्वार्थासाठी परिस्थितीचा उपयोग करून घेतात यातील खूप लोकानी समजूत करून घेतलेली असते कि  दया, करुणा , औदार्य इत्यादी गुण  म्हणजे मूर्खपणा आहे. ते आपल्या विघातक स्वार्थी वागणुकीचे समर्थन करतात ते दुराग्रहाने इतरापेक्षा स्व:ताला मोठे समजतात.
  
 सातव्या प्रकारचे लोकं जाणीवपूर्वक आग लावत असतात, आगीत तेल ओतण्याचे काम हि मंडळी करत असते.अशी लोकं दुष्कृत्या  मध्ये क्रियाशील असतात. त्यांची गणना दुष्टात होते. आपल्या व जगाच्या भल्या साठी अश्या लोकांना प्रेम, दया, सहानभूतीने , समजून घेऊन  त्यांनी पत्करलेल्या मार्गा पासून दूर करायला हवे. 

जग संभ्रम आणि अराजकतेच्या उंबरठ्यावर आहे. हि फैललेली आग आपला घास घेईलच परंतु त्याबरोबर  सहाव्या आणि सातव्या प्रकारातील शेजा-याचा हि घास घेईलच. अंतिमता यात कोणाचाही जय नाही. 

एकमेव आशा आहे , ती म्हणजे चार आणि पाच या प्रकारची वृत्ती समाजात मोठ्या प्रमाणावर कश्या प्रकारे  वाढेल  या साठी सर्वांनी प्रयत्न करणे आणि ती सुरवात आपणा पासून करायला हवी. 

जग बदलायची सुरवात आपणा पासून ,
जग बदलेल का ?  नाही माहित  
पण एक नक्कीच,  आपलं जग बदलेलच 
आणि
 जग ही बदलेलं असेल तितक्या प्रमाणात.

 होय ना !


(एका लेखाचं स्वैर भाषांतर , त्रुटी भाषांतराच्या )