ठरल्या प्रमाणे ३१ जानेवारीला संजीवनी कट्ट्यावर "सहजीवन : अपेक्षा आणि जबाबदारी " या विषयावर आज चर्चा झाली. तीस पस्तीस सदस्य उपस्थित होते. सुरवातीला अध्यक्षांनी विषया मागील पूर्वपीठीका मांडली. सर्व उपस्थित सदस्यांनी चर्चेत सहभाग घेऊन विषयात जान आणली. बघा ह्या चर्चेची झलक ( कोणी काय सांगितले पेक्षा "काय सांगितले गेलं" हे महत्वाचे.)
सहजीवन आपल्या जन्मापासून सुरु होतं परंतू आज मर्यादित म्हणजे तो,ती किंवा पती पत्नी या विषयावर बोलणार आहोत.
सहजीवन म्हणजे उतायचं नाही, सहजीवन म्हणजे मातायचं नाही
घेतला वसा टाकून कधी तुटेपर्यन्त ताणायचं नाही.
घेतला वसा टाकून कधी तुटेपर्यन्त ताणायचं नाही.
सहजीवनात नसतं बंदिस्त, दोघांचंच, दोघांपुरतच
कुटुंब, गणगोत, आप्त, मित्र सामावून घेणं.
कुटुंब, गणगोत, आप्त, मित्र सामावून घेणं.
सहजीवन म्हणजे मी पासून आम्ही पर्यंतचा प्रवास.
विश्वास ,आदर , आणि त्याग यांनी सहजीवन बहरतं फुलतं
एकमेका विषयी आदर , समजून घेणे , पोषक ठरतं
स्वत:ची ओळख, स्वत:ला ओळखता यायला हवं
काय हवं काय नको हे ठरवता येणे महत्वाचे.
खूप अपेक्षा,घातक ठरतात ,
आपल्या जुन्या पद्धतीला नवीन गोष्टीची जोड द्यायला हवी.
आपलच म्हणणे खरे हा हेका नको.
पालकांनी हि आपल्या पाल्यांना नुसत्या भौतिक गोष्टी न देता , प्रेम जिव्हाळा, वेळ ध्यावा,
निर्णय क्षमता , घेतलेल्या निर्णयावर ठाम राहता येणे इत्यादी
आपल्या समाजाच्या शक्ती स्थानाची चर्चा झाली , निभावून नेण्याची क्षमता , घटस्पोट नव्हते, आताशा असलेलं अत्यंत अल्प प्रमाण नक्कीच टाळू शकू इत्यादी
काही वेळा पालकांचा हस्तक्षेप मुलांच्या जीवनात गुंतागुंत निर्माण करतात.
मुलींना आपले आईवडील प्रिय असतात तसेच त्यांनी सासू सास-यांना समजून घ्यायला हवे
युवा मंडळी साठी समुपदेशकाचा कार्यक्रम घ्यावा.
संजीवनी कट्टा म्हणजे विचारचं आदान प्रदान करणारं व्यासपीठ समाजात सर्वदूर पसरावं म्हणून प्रयत्न करायला पाहिजेत.
असे अनेक मुद्दे चर्चे दरम्यान आले. वेळेच्या बंधना मुळे आवरते घ्यावं लागलं
लिहिताना हि काही मुद्दे सुटले असतीलच, आपण जोडावं अशी अपेक्षा.
(जे येऊ शकले नाहीत ते नक्कीच काहीतरी गोष्टी पासून वंचित राहिले )