निर्मळ यात्रेच विशेष महत्त्व आहे . दिवाळी पासूनच यात्रेचे वेध लागत असतात , लोकभाषा मधे " दिवाळी आली खायाला जत्रा आली न्यायाला " अशी म्हण प्रचलित आहे. म्हणजे दिवाळीत खायची चंगळ तर जत्रेला भेट देण्याची पर्वणी
श्रीमत शंकराचार्य मंदिर, निर्मळ |
कार्तिक कृ एकादशीला निर्मळ तिर्थात अंघोळी व् द्वादशीला पालखी सोहळा . इ पू ४०४ मधे कार्तिक कृ एकादशीला पुरीचे पाचवे जगतगुरु शंकराचार्य विध्यारण्य स्वामीनी विमलेश्वराच्या मागे समाधी घेतली तेव्हा पासून एकादशीला दूर दुरून भाविक स्नाना साठी निर्मळला भेट देउन श्रीमत शंकराचार्यच्या समाधीचे दर्शन घेत असतात . द्वादशीला श्रीमत शंकराचार्याच्या पादुकांची व् विमलेश्वराच्या प्रतिमेची पालखी काढण्यात येते श्रीमंत पेशव्यानी नेमलेले इनामदार या सोहळ्य|त सहभागी होत असतात. पालखी मंदिराच्या पायरी कडील दक्षिण मार्गाने सुलेश्वर मंदिरामागुन ,निर्मळनाका , गणेश मंदिर,हनुमान मंदिराच्या समोरून सकाळी समाधी मंदिरात पोहचते.
समाधी मंदिराच प्रवेशद्वार |
पालखिनंतर येणार्या रविवारी चर्च चा सण व ख्रिश्चनाचा यात्रोत्सव साजरा होतो.
परिसरातील जनजीवनावर यात्रेचा प्रभाव होता काही लोक व्यवहार यात्रेमध्ये पार पडत असत. तेव्हा भांडी मुख्यता पितळेची असत , जुनी भांडी देऊन नविन घेणे, भांडी खरेदी लोणच्या साठी लिंब खरेदी यात्रे मधे होत असे. तसेच महिलाचा बांगड्या भरण्याचा दिवस असे . यात्रा पंधरा पंधरा दिवस चालत असे.
यात्रेच्या निमित्ताने कुटुंब प्रमुख मुलं मुलीना, लेकीसुनाना यात्राखर्च (यात्रेचे पैसे )देत असत.अशी प्रथा या परिसरात पाळली जात असे.
महाविष्णु समोरील गरुड़ मंदिर |
यात्रेमधे बाहुल्याचे खेळ, पाळणे , चकरी, मौतका कुवा , हसरे आरसे , इत्यादि मनोरंजनाचे खेळ असतात. खेळण्याची , मिठाई ची, सुकेळी ,खजुराची दुकाने असतात. सध्या भंडिवाले , बांगडी वाली मंडळी कमी दिसतात, काळा बरोबर ही मंडळी दुसर्या व्यवसायात गेली असावी.
आजही यात्रा दहा दिवस चालते, नालासोपारा , वसई स्टेशन कडील मंडळी यात्रेला येतात त्यामुळे संध्याकाळी सहा ते दहा या वेळेत यात्रेत गर्दी असते
(संदर्भ निर्मळ महात्म्य )
श्रीमत शंकराचार्य स्वामी विध्यारण्य यांची समाधी |