जीवन म्हणजे स्व: शोधण्याचा प्रवास !!!. आध्यात्मिक भौतिक सर्व प्रकारच्या प्रगति साठी स्व: ची ओळख पटणे महत्वाचे. आचार्य विनोबा या विषयी म्हणतात.
गर्दित स्वत:ला हरवू नका ! स्वत:चा मार्ग स्वत: च शोधून काढ़ा !! ------- रिक वारेन
आपण अनेक लोकांना भेटतो पण स्वत: ला भेटायला कधी उत्सुक असतो का?
"बहुता दिसं आपुली भेटी जाली" असे कधी होते का?
स्वत: ला भेटणे मोठे कठिन काम आहे, लोक आरशात चेहरा पाहतात
आणि समजतात की स्वत:ची भेट झाली,
स्वत:ची भेट म्हणजे योग!!
स्वत:ला जाणून घेण्याविषयी, जीवन प्रवासात त्याचे असलेले महत्त्व वेगवेगळ्या विचारवंतानी असे मांडले आहे.
स्वत:ला अधिकाधिक जाणा आणि त्याची जबाबदारी स्वीकारा! आपण विचार कसे करतो, चालतो कसे ,बोलतो कसे याचे जागते अवधान ठेवा. जेवढे तुम्ही स्वत:ला जाणल तितके अधिक चांगले ---- लोरेल मेलिन
खरे तर आपण स्वत:ला नीटसे ओळखत नाही आपले अंतरंग,आपल्याला काय हवे आहे आणि आपल्या विचाराची पद्धत जाणून घ्या --- लीन ग्राबहों
स्वत:वर पूर्ण विश्वास ठेवा आणि स्वत:तल्या चैतन्यशक्ति वर श्रद्धा !! -- डॉ नार्मन व्हिंसेंट पिल
आपण समस्येला प्रतिसाद कसा देतो, हे आपल्याला पाहता आले पाहिजे --- रिचर्ड कार्लसन
जो स्वत:ला सर्वोतम रितीने पेश (सादर) करतो असा माणूस कधीच अयशस्वी होत नाही - ओ स्वेट merdan
स्वत:ला जाणणे आणि स्व:ची पूर्ण जबाबदारी स्वीकारणे महत्वाचे. परस्पर सबंधात स्व: चे वर्तन अंतर्मुखतेने तपासा - लेस ब्राउन
स्वत:ला कमी लेखु नका ! न्यूनगंड व् अहगंड या दोहोपासून चार हात दूर रहा -- वेन डायर
प्रथम तुम्ही स्वत:चे अंतरंग जाणून घ्या विश्वातील अनंत रहस्याची उत्तरे तुमच्यातल्या प्रत्येक पेशी वर कोरलेली आहेत, त्याचे सखोल ज्ञान होण्यासाठी प्रयत्न करा ------- डन मीलमन
स्व:ला सर्वस्वी जाणणे आणि स्वत:च स्वत:चे असणे महत्वाचे आपल्याला आपल्या सामर्थ्य , मर्यदाची जाणीव हवी --- डेव्ह पेल्झार
लक्षात ठेवा सगळ्या प्रश्नाची उत्तरे तुमच्या आतच दडलेली असतात फ़क्त ती उत्तरे एकण्या साठी तुमचे मन आतंरिक दृष्टया कमालीचे शांत व् अक्रिय असावे लगते -- डेवी फोर्ड
प्रत्येक दिवस आरशासमोर उभे रहा आणि आपल्याच नजरेला नजर द्या, स्वत:शी संवाद साधा आणि आत्मावलोकन करा ------ मार्क हँसान
गर्दित स्वत:ला हरवू नका ! स्वत:चा मार्ग स्वत: च शोधून काढ़ा !! ------- रिक वारेन
स्वत:ला ओळखणे म्हणजे प्रत्येक विचारांचे वा भावनांचे नेमके भान ठेवणे ------- जिम रोहन.
तुम्ही म्हणजे हे जग आहात तुम्ही स्वत:त प्रथम परिवर्तन घडवून आणा मग या जगात परिवर्तन घडेल ---- डेविड होकीन्स
तुम्ही स्वत:ची मैत्री केलीत तर तुम्हाला कधी एकाकीपणा वाटणार नाही ------ माक्सवेल मंताझ
उध्दरेदात्मनाss त्मानम नात्मानमवसादयेत !
उध्दरेदात्मनाss त्मानम नात्मानमवसादयेत !
आत्मैव ह्या त्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मन: !!
आपणच आपला उध्दार करायला हवा , आपण घात करणारी कृत्ये करू नयेत, आपणच आपले मित्र असतो , आपण आपले शत्रु होऊ शकतो.
पटतंय कुछ कुछ !!!!!
No comments:
Post a Comment