मोठ्या भावाने लहान भावंडाशी केलेले हितगुज
मी दुरून आलो त्यात विशेष काही नाही, कोणालाही चांगल काही देऊ शकलो तर ती निर्सर्गाने आपल्याला दिलेली देणगी आहे असे समजतो. एक विध्यार्थ्याची, पालकाची , शिक्षकाची अंतर्ज्योत पेटवू शकलो तर ते माझं भाग्य. मला खुप आमंत्रण येत असतात ती स्वीकारताना, आतंरिक तळमळ किती आहे हे मी जाणून घेण्याचा माझा प्रयत्न असतो. ग्रामीण भागातील मुलांची कष्ट, अभ्यास करायची तयारी असते त्याना कर असे म्हणणारा भेटायला हवा . त्याच्या मनातील अंतर्ज्योत पेटवली की झालं. दुसरे तपशील, माहिती मिळत जाइल. ही ज्योत न पेटण्याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या हृदयात प्रचंड प्रमाणात असलेले न्यूनगंड. हे माझ्या आवाक्यात नाही ,ये करणे शाक्य नाही , हे माझे काम नाही असे सारखे वाटत रहाणे.मला दहावीला प्रथम आलेला आहे असं सांगणार्य अधिकार्याला माझा प्रश्न होता तुम्ही हे कश्यावरुन सांगता? हा प्रश्न न्यूनगंड तून आला होता. न्यूनगंड आपल्या सगळ्यात असतो त्यावर मात करून स्वत;ला स्वत; सापड़णे खुप आनंददायी असते. पालकाना शिक्षकाना माझी नम्र विनंती आहे की पोरं फार मोठी स्वप्न पाहत असतील तर त्यानां पाहुध्या ते स्वप्ना त्याला उच्च स्तरावर घेउन जात असेल ,काही करायचं बळ देत असेल तर त्याला स्वप्न पाहू देत ना. जशी प्रगल्भता वाढत जाईल तसे त्याना कळत जाईल स्वप्न पहिलीच पाहिजेत. आपण जे काही करतो ते अत्यंत महत्वपूर्ण पणे करायला हवं. अभ्यास करायचा आहे तर प्रचंड मन लावून करायला हवा. कुठलीच वाचलेली , अभ्यासलेली गोष्ट कधीच वाया जात नाही. आपल्या प्रमाणिक प्रयत्नाला पहिल्यांदा विरोध होतो , विरोधाला न जुमानता पुढे जाता तेव्हा उपहास होतो, उपहासाला भीक नाही घातली की कुतूहल होते, कुतूहल नंतर येते कौतुक. अभ्यासाकडे खुप गंभीर पणे पहा. मला ज्ञान मिळाले पाहिजे अशी दृष्टी ठेवा. आपल्या अभ्यासाला ,आपल्या कामाला महत्त्व द्या. आपण जे काम परत परत करतो त्याच एक शास्र होतं. अभ्यासाच एक शास्र झाले पाहिजे. अभ्यासाचे वेळापत्रक, वाचनाचं कौशल्य, लिहण्याची कला , स्मरण करण्याच शास्र, रिविजन कशी करावी अश्या पद्धति आपण विकसित करायला हव्यात. प्रत्येक घरात एक ज्ञान यज्ञ पेटला पाहिजे आपलं घर निम्नं स्तरीय करमणुक केद्र झाली आहेत टिव्ही, वीसीआर , वृत्तपत्रे , ते नको असे नाही परंतू किती? किती घरात अभ्यासाची चर्चा होते. शिक्षण आपल्या जगण्याचा भाग झाला पाहिजे. मसीहा येइल आणि सर्व बदलून जाईल अस नाही आपल्याला आपल्या स्तरावर अवतार व्हावं लागेल प्रत्येकाने मोठं काम केले पाहिजे असे नाही. कोणतीही गोष्ट वाया जात नाही. दृश नाही तर अदृष फळ मिळेलच . आपण स्वत;ला फसवू शकत नाही, स्वताला विचारा खरंच मला ही गोष्ट करायची आहे का ? . निरोगी समाजासाठी काही गोष्टी बिझिनेसच्या बाहेर ठेवावायाला हव्यात.
शिक्षण हा व्यवसाय न होता सर्वाना मुक्त हवे. गुरु रविन्द्रनाथाची कविता आहे.
जिथे मन भीतीमुक्त आहे आणि मान ताठ आहे
जिथे ज्ञानाची कवाडे सर्वांना सदैव खुली आहेत.