

जमले अश्यासाठी म्हणतो कि प्रत्येकाला या कामात आपला सहभाग असायला पाहिजे असे मना पासून वाटत होते, उत्साह हि भरपूर होता. पण आपण जाणतो कि काही वर्षा अगोदर आपण सर्व अंगमेहनतीची कामे करीत होतो, आता हे सर्व मागे पडल्याने शारीरिक थकवा पटकन जाणवतो,

ऑलेक पदमसी चे एक पुस्तक आहे " अ डबल लाइफ " हे पुस्तक म्हणजे त्यांच्या दुहेरी करिअरचा आलेख आहे. इंग्रजी रंगभूमीवर पन्नास नाटकांची निर्मिती , दिग्दर्शन आणि सर्फ, लिरील, एम आर एफ टायर्स, रिन, डालडा, कामसूत्र, सनलाईट या उत्पादनांच्या गाजलेल्या व कलात्मक जाहिराती तयार करणारे ऑलेक पदमसी आपल्या पुस्तकात एके ठिकाणी म्हणतात " आपण ज्या समाजात राहतो, त्याच्या सबंधीच कर्तव्य फक्त देणग्या देण नव्हे, आपला वेळ , शक्ती, आणि कौशल्य हि द्यायाला हवे. एखाद्या सेवाभावी संस्थेत जाऊन काम करणं, शहर स्वच्छ ठेवायला मदत करणं, नागरिकांनी मिळून मिसळून परस्पर सहकार्यांनी हे केले पाहिजे. सार्वजनिक सेवा हे खाजगी समाधान असतं ."