चित्रकार कवी श्री नितीन दादरावाला याचं विदेशातील पंचवीस छायाचित्रकरांचा परिचय करून दे णारं पुस्तक म्हणजे "प्रतिमा प्रचीती" . छायाचित्र कले विषयी साहित्यिक वसंत आबाजी डहाके प्रस्तावनेत म्हणतात " छायाचित्रकला ही आधुनिक कला आहे. कॅमेरा या यंत्राच्या सहाय्याने या कलाकृती जन्माला येतात. कॅमेरा हे साधन आहे. छाया-प्रकाश हे माध्यम आहे. छायाचित्रा मध्ये एक क्षण गोठवलेला असतो. तो विशिष्ट क्षण ती स्थिती पकडणारा डोळा आणि हात कलावंताचा असतो छायाचित्रात वस्तुस्थिती असते आणि वास्तवाभासही असतो. छायाचित्र देखील जग समजून घ्येण्याचे, जगाचा अर्थ लावण्याचे एक माध्यम आहे. ते सौदर्याचा प्रत्यय घडवते तसेच ते उग्रप्रखर वास्तवाचा साक्षात्कारही घडवते.
दादरावालानी पंचवीस छायाचित्रकरांच्या कामाचा आणि जीवनाचा वेध या पुस्तकात घेतले ला आहे. त्यात आल्फ्रेड स्तिग्लिटस हा अमेरिकन छायाचित्र कलेचा पाया घडवणारा छायाचित्रकार आहे तसेच छायाचित्रामध्य सूक्ष्म सौदर्य पकडणारे मिचेल विसिली आहेत.
अरुण कोलटकराच्या भिजकी वही या कविता संग्रहात किम म्हणून कविता आहे.
जगप्रसिद्ध कलावंताच्या भारता सबंधित कलाकृती
photograph that Margaret Bourke-White took of Gandhi in 1946 |
दादरावालानी पंचवीस छायाचित्रकरांच्या कामाचा आणि
काही छायाचित्र वास्तवाचे प्रखर भान आणणारे तसेच माणुसकीला आवाहन करणारे आहेत. केविन कार्टर याचं "गिधाड आणि मुलगी" हे सुदान येथील दुष्काळ आणि युद्धाची भयानकता दाखविणारे चित्र आहे. हे चित्रं घेतल्या नंतर केविन म्हणतो " हे देवा मी माझ्या ताटात वाढलेलं अन्न कधीही वाया घालवणार नाही मग त्याची चव कशीही असो."
व्हिएतनाम युद्धाच्या पार्श्वभूमी वर निक उट (Nick Ut) यांनी काढलेले "नापाम गर्ल" हे चित्र. या चित्रामुळे अमिरेकन जनमत युद्धविरोधी झाले. नापाम नावाचा बॉम्ब किम फुक या नऊ वर्षाच्या मुलीच्या घराजवळ टाकण्यात आला होता. ती ७५% भाजली होती, तिची कातडी सोलून निघाली होती. तिने कपडे काढून टाकले होते.
अरुण कोलटकराच्या भिजकी वही या कविता संग्रहात किम म्हणून कविता आहे.
किम
नऊ वर्षाची पोर एक
चिमुरडी
नापामानं पेटलेला झगा
केव्हाच फेकून दिला होता तू
अंगावरचा ओरबाडून काढून
त्या खाईतून धावत बाहेर येताना
आणि जीवाच्या आकांतानं
नुसती धावत सुटलेली होतीस तू
महामार्गावरून
एका कॅमे-याचं भक्ष्य होण्यासाठी
कारण तशी तू धावत असताना
जिवंत गिळली तुला
कारण तशी तू धावत असताना
जिवंत गिळली तुला
निक युटच्या कॅमे-याने
जिभली चाटत
विद्युतजिव्ह सरड्यानं चटकन
एकादी माशी गिळावी तशी.
जगप्रसिद्ध कलावंताच्या भारता सबंधित कलाकृती
चर्चगेट स्टेशन १९९५ - सेबास्टीओ सालगडो (Sebastiao Salgado)
लाईफ मासिका साठी मार्गारेट बर्क-व्हाईट ह्यांनी काढलेली छायाचित्रं
फाळणी १९४७ - पंजाब |
Indira Gandhi
by Yousuf Karsh, 1956 |
No comments:
Post a Comment