Tuesday, 31 March 2015

आधुनिक शिक्षणाच्या नव्या वाटा


संजीवनी कट्ट्यावर " आधुनिक शिक्षणाच्या नव्या वाटा"  या विषयावर चर्चेचं आयोजन करण्यात आलं होतं. या अंतर्गत आपल्या  परिसरातील शिक्षणात वेगळ्या वाट चोखळनारे कुमार विनीत परेरा व कुमार  अमेय नाईक यांना विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. सुरवातीला दोघांच स्वागत करण्यात आलं व आनंद पाटील यांनी दोघांची ओळख करून दिली. विनीत परेरा यांनी Indian Army चं OTA हे एक वर्षाचं पूर्ण केलं व  त्याची आर्मी मध्ये लेफ्टनंट म्हणून निवड झाली आहे 
विनीत ने सरदार वल्लभभाई पटेल इंजिनिअरीग कॉलेज मधून Dimplo in electronics and Communication पूर्ण केलं त्यानंतर वर्तक कॉलेज वसई येथून BE Electronics & Communication पुढे सेंट आग्नेल मधून ME Eectronics केलं. त्यानंतर आर्मीची Selection service board ची 45 SSC Tech (short Service Commission)साठी अर्ज केला व OTA साठी पात्र ठरला. अकरा महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण करून लेफ्टनंट  झाला. 


कु अमेय नाईक यांनी IIT & IIS च्या मास्तर डिग्री व डॉक्टरेट साठी घेण्यात आलेल्या JAM 2015 ( Joint
Admission test for M.Sc. for Admission in M.Sc. & Ph.D)  AIR ८५ Rank  मिळवली. यावर्षी त्याने सेंट झेविअर मधून B.Sc Geology ची परीक्षा दिली आहे. १२ वीच्या परीक्षेत त्याला एकूण ८३% गुण मिळाले होते व भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागातर्फे देण्यात येणारी INSPIRE हि शिष्यवृत्ती प्राप्त. 

विनीत नी बोलताना SSB ची माहिती दिली 45 SSC Tech साठी कश्या पद्धतीने अर्ज केला व परीक्षेची महिती दिली. SSB च्या निवड प्रक्रियेत पाच दिवसाची परीक्षा व मुलाखत घेतली जाते देशात हि तीन ठिकाणी घेतली जाते अलाहाबाद , भोपाल , व बँगलोर.हि परीक्षा दोन स्टेज मध्ये होते.

stage I : पहिल्या दिवशी बैद्धिक चाचणी , चित्र निरीक्षण व बोध चर्चा. (Picture perception and Disccusion , Test)  ह्यात अनुत्तीर्ण झाले तर पहिल्याच दिवशी परत पाठवतात. 
Stage II : दुस-या तिस-या व चैथ्या दिवशी  I plycologytest ii) Group Test I & II आणि शेवटच्या दिवशी मुलाखत होते . 
नंतर मेडिकल टेस्ट घेतली जाते. प्रशिक्षणातील आठवणी सांगताना पुढे म्हणाला , 
 OTA च्या प्रशिक्षणातून पळून जावं असे वाटत होते. पहिला महिना फार कठीण होता. पुढे त्याचा सराव झाला. या शिबिरात अठरा महिन्याचं प्रशिक्षण अकरा महिन्यात पूर्ण केलं जातं पहाटे  चार वाजता सुरु झालेला दिवस उशिरा पर्यत संपत असतो. प्रशिक्षण खडतर असत तुम्हाला ते मानसिक व शारीरिक रित्या मजबूत बनवतं 
त्यांनी आर्मीतील कामची पद्धत प्रमोशन , पोस्टिंग इत्यादी माहिती दिली तसेच NDA व SSB  मधून झालेल्या नियुक्ती मध्ये काय फरक असतो हे समजून सांगितले. 

अमेयनी JAM परीक्षेची तयारी कशी केली व कश्या प्रकारे परीक्षा दिली व  . Geology विषयी आवड कशी निमार्ण झाली हे सविस्तर सागितले. आवडणा-या विषयात सहज यश मिळतं असे तो पुढे म्हणाला. 


राजू नाईक यांनी संजीवनी कट्ट्या मागील भूमिका विशद केली. शिक्षणाच्या नव्या वाटा च्या  अनुसंगाने    खालील मुद्द्यावर  साधक बाधक चर्चा झाली. 
  •  आठवी पुढील विद्यार्थ्या वर विशेष लक्ष केंद्रित करायला हवे.
  •  Aptitude Test चं महत्व मुलांना व पालकांना पटवून ध्यायला हवे.
  • Carrier Guidanace चं आयोजन करायला पाहिजे.
 

Friday, 20 March 2015

आत्मविश्वास आणि प्रेरणा अभियान


अंतरीचा दिवा हे श्री संदीपकुमार साळुंखे याचे पुस्तक वाचनात आले. पुस्तक आवडल्याचं सागण्यासाठी फोन केला असता, जळगाव येथील दीपस्तंभ फौंडेशननी राबवलेल्या आत्मविश्वास आणि प्रेरणा या अभियानाचा  विषय निघाला. जळगावातील विध्यार्थ्यांना झालेल्या फायद्याचा उलेख केला आणि संजीवनीला विध्यार्थ्यासाठी अभियान घेण्याचे सुचविले. पुस्तकातील  दोन प्रकरणाची एक पुस्तिका  बनवून  संजीवनी टीमला वाचयला दिली.  टीमने  चर्चा  केली व  आत्मविश्वास आणि प्रेरणा अभियान  आपल्या  विध्यार्थ्यासाठी  घ्यायचे ठरविले.  दरम्यानच्या काळात दीपस्तंभ च्या  श्री युजुवेंद्र महाजन सरांशी  बोलून  अभियान विषयी माहिती घेतली. अभियान कसं घ्यायला पाहिजे  या विषयी सरांनी मार्गदर्शन केलं. 
संजीवनी टीमने अभियानाचे  स्वरूप व नियोजनाचा आराखडा तयार केला. विध्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी व स्पर्धा परीक्षेची मानसिकता तयार व्हावी या साठी एक लेखी परीक्षा घ्यावयाची त्या अंतर्गत विध्यार्थ्यानी दोन पुस्तके वाचायची
 १) संदीपकुमार साळुंखे याचं धडपडणा-या तरुणाईसाठी
 २) राजेश पाटील याचं ताई मी कलेक्टर व्हयनू!.
 विध्यार्थ्याचे दोन गट करण्यात आले पहिला गट  ८वी  ते ११वी   दुसरा गट १२ वी  पुढील विद्यार्थी. या गटा
साठी   २० मार्कचे चालू घडामोडीवर प्रश्न. परीक्षेचं क्षेत्र संजीवनीला नवीन असल्याकारणाने  शिक्षकांचं सहकार्य  घ्यायचे  ठरविण्यात आले.
अभियानातील तीन मुख्य घटक म्हणजे विद्यार्थी,पालक व शिक्षक वर्ग. विध्यार्थ्यांना दोन महिने पुस्तकं वाचण्यासाठी देण्याचे ठरले व परीक्षा  दिनांक २१ डिसेंबर  २०१४ रोजी ठेरली. पालकांना व शिक्षकांना सहभागी करून घेण्यासाठी  पालक शिक्षक  मेळावा   दिनांक २३ नोव्हेबर २०१४ रोजी वाघोली शनिमंदिर येथे घेण्यात  आला.  
 पालकांना  व  शिक्षकांना  अभियानात  त्यांच्या कडून काय अपेक्षित आहे व या कसे सहभागी होता येईल याविषयी माहिती देण्यात आली. प्रतिसाद उत्तम होता.
 शिक्षकांनी प्रश्नपत्रिका सेट करण्यापासून निकालपत्र तयार करण्याची जबाबदारी घेतली. व सर्वानाच दिलासा दिला कि अभियान आपण चांगल्या पैकी यशस्वी करू.
टीम संजीवानिनी गाव निहाय जबाबदारी वाटून घेतली व संध्याकाळी ७ नंतर गावोगावी भेटी  देऊन  विध्यार्थाना   अभियानाची माहिती व नावं नोंदवून घेण्यासाठी  भेटीचे वेळा पत्रक ठरवून  अमलबजावणी  केली.
विद्यार्थी वर्गांनी छान प्रतिसाद दिला. 
 
आत्मविश्वास आणि प्रेरणा अभियान २०१४
गट  क्र. १गट क्र. २  एकूण
नाव नोंदणी 307305612
दिनांक २१ डिसेंबर २०१४ रोजी वेळापत्रका प्रमाणे परीक्षा घेण्यात आली.  परीक्षेत प्रत्येक्षाला  २५३ विद्यार्थी बसले. 
     

आत्मविश्वास आणि प्रेरणा अभियान २०१४
गट  क्र. १गट क्र. २  एकूण
परीक्षेला बसले132121253
    
परीक्षा घेण्याची व निकाल पत्र तयार करण्याची शिक्षक मंडळीने कौश्यल्यपूर्ण रीतीने पूर्ण केली. दुपारी २ वाजता  आलेली मंडळीनी विध्यार्थ्यांना ची वर्गात बसण्याची व्यवस्था करणे, प्रश्नपत्रिका,उत्तरपत्रिका वाटणे, पर्यवेक्षका चे काम करणे, परीक्षा संपल्या नंतर उत्तरपत्रिका तपासणे, निकालपत्र तयार करणे इत्यादी कामं लीलया केली. ही सर्व कामगिरी संपल्या नंतरच घरी गेली. कामाचा थकवा नव्हे  तर प्रसन्नता आली अशी सर्व शिक्षक मंडळीची प्रतिक्रिया होती. त्यांना सलाम.
परीक्षेचा ग्रेड प्रमाणे निकाल खालील प्रमाणे
आत्मविश्वास आणि प्रेरणा अभियान २०१४
गट  क्र. १गट क्र. २  एकूण
परीक्षेला बसले132121253
ग्रेड प्रमाणे उत्तीर्ण विध्यार्थी 
A+617
A1129
B+2833
3022
C+3012
278
 एकूण132121
अभियान २०१४ चा सांगता समारभ :सांगता, गौरव समारंभात श्री सायनेकर सर व श्री संदीपकुमार साळुंखे सरांनी यावे म्हणून विशेष प्रयत्न होते.दोन्ही सरांनी मान्य हि केलं होतं परंतु साळुंखे सरांना कामाच्या व्यग्रते मुळे येणे शक्य झाले नाही. परंतु त्यांनी संजीवनी च्या या उपक्रमा साठी विडीओ बनवून पाठवला .   माननीय  सायनेकर सर सांगता समारंभाला उपस्थित होते. त्यांच्या हस्ते दोन्ही गटातील पहिल्या तीन विध्यार्थ्याचा गौरव करण्यात आला. विध्यार्थ्यासाठी श्री साळुंखे सरांनी पाठवलेला मार्गदर्शक  विडीओ व्याख्यान दाखवण्यात आलं




विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सायनेकर  सरांनी स्व: ओळखण्यासाठी SWOT अनालिसिस चा कसा उपयोग  होतो हे विशद केले  व शेवट उपनिषदातील गुरुकुलात विध्यार्थाना केलेल्या उपदेशाने केला सत्यं  वद , धर्म चर ,स्वाध्यायान्मा प्रमद:  म्हणजेच नेहमी खरे बोलावे,धर्माने म्हणजेच नियमाने आचरण करावे आणि स्वाध्याय करण्यास चुकू नका, कंटाळा करू नका. 

गौरव करण्यात आलेले विद्यार्थी
गट क्रमांक १ 
 प्रथम क्रमांकरुचितामहेशजोशी भुईगाव 
तन्वी नितीनपाटीलनवाळे 
व्दितीय क्रमांक पूर्णिमासुभाषनाईकभुईगाव 
तृतीय क्रमांक ऋतुजाप्रशांतवझेमर्देस
चैतालीअविनाशम्हात्रेवाघोली 

चैताली म्हात्रे सरांच्या हस्ते बक्षीस स्विकारताना

ऋतुजा वझे  सरांच्या हस्ते बक्षीस स्विकारताना



पूर्णिमा नाईक सरांच्या हस्ते बक्षीस स्विकारताना



तन्वी पाटील सरांच्या हस्ते बक्षीस स्विकारताना

रुचिता जोशी सरांच्या हस्ते बक्षीस स्विकारताना






गट क्रमांक  २ 
प्रथम क्रमांकहिमांशूअनिलनाईकउमराळे 
व्दितीय क्रमांक मृगेषाकिशोरनाईकवाघोली  
निखिलभालचंद्रवझे मर्देस
तृतीय क्रमांक शर्वरीअरुणनाईकउमराळे 


कु. शर्वरी नाईक हिचं कौतुक करताना सर


निखिलची बहिण बक्षीस घेताना

मृगेषाची बहिण बक्षीस घेताना















 

हिमांशू नाईक प्रथम पारितोषक स्विकारताना
 

 विद्यार्थी कौतुका बरोबरच प्राध्यापक श्री नरेश नाईक  यांना मुंबई विद्यापीठ मधून सामवेदी बोलीभाषा या प्रबंधाला डॉक्टरेट  पदवी मिळाल्याबद्दल श्री सायनेकर सर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. 


प्राध्यापक श्री नरेश नाईक 


Monday, 9 March 2015

परस्पर संबंध


 परस्पर संबंध  मध्ये ७ गोष्टींची  अपेक्षा  नको.  
 
आपले  कुटुंबां बरोबर , कार्यालयात , समाजात , सार्वजनिक ठिकाणी परस्पर संबंध कसे असावे काय पथ्य पाळायला हवीत या लेखाचं  केलेलं स्वैर भाषांतर  
 
 
आपल्या अवास्तव अपेक्षा हे आपल्या दुःख आणि निराशेच मूळ कारण आहे.   इतरांच्या संबंधातून व परस्पर संवादातून हे ठळक पणे जाणवते   
 
लोकां  कडून रास्त अपेक्षा ठेवल्या तर अनावश्यक दु:ख आणि निराशा टाळून योग्य गोष्टी वर  लक्ष केंद्रित करता य़ेते 
 
 
सहमती ची अपेक्षा ठेवू नका.   आपल्या निर्णय क्षमते वर आपला विश्वास असू द्या.  म्हणजे दुस-याच्या सहमतीची  गरज राहणार  नाही.   तुम्हाला  दुस-याच्या  अपेक्षे  नुसार जगता येणार नाही तसेच        दुस-यांनी  आपल्या अपेक्षे नुसार वागावे  असे वाटणे हे हि गैर आहे. तुम्ही तुमच्या  क्षमते नुसार आनंदी आणि उत्साही आयुष्य जगायाला हवे. इतरांच्या मतांचा दुष्परिणाम टाळायला हवा.  
 .
 
आपल्या अंतर्मना प्रमाणे वागण्याचं धाडस आपण बाळगलं पाहिजे. स्वत: ची तुलना दुसर-याशी करू नका,  त्याच्या प्रगतीचे  यशाचे  दडपण येणार नाही असे बघा. आपला मार्ग सोडू नका.  यश म्हणजे  तरी काय? आपल्या मार्गाने आनंदी जीवन जगणे. 
 
 
दुस-या कडून अवास्तव आदराची अपेक्षा ठेवू नका.: आपण स्वत:चा आदर किती करतो. कसा करतो हे पहा.  आपल्या स्वत: वरील विश्वास व श्रद्धाच , आपलं ध्येय गाठण्या साठी पाठबळ देईल.  कोणा कडून   अवास्तव आदर व प्रेमाची अपेक्षा ठेवू नका 
  
सर्वा बरोबर चांगलं  असणे महत्वाचे आहे परंतु स्वत:शी  चांगले असणे अतिमहत्वाचे आहे. स्व:ता बद्दलचा आदर,   आनंद निर्माण करतं आणि तुम्ही एक चांगले मित्र, कौटुंबिक व्यक्ती बनता.
  .
 
 मी  सर्वाचा  आवडता पाहिजे अशी अपेक्षा ठेवू नका . एखाद्याला तुम्ही नालायक वाटाल, एखाद्याचे  नावडते असू शकाल  परंतु  त्याच बरोबर   दुस-याला  तुम्ह्ची योग्यतेचि जाणीव असेल. आपलं मुल्य विसरू नका आणि मूल्याची कदर असणा-या बरोबर  वेळ व्यतीत करा.  तुमच्या वर टीका  करणारा कोणीतरी असेलच. दुर्लक्ष करा , हसा आणि पुढे चला.  
       
या विलक्षण जगात तुमची तुलना सतत दुस-याशी होत असते. तुम्ही कसे वागता या वरून तुमची ओळख बनते कधी कधी लोकं नावं ठेवतील परंतु स्व:ताशी प्रतारणा करू नका.
 
 
 दुस-यांना   गृहीत धरू नका. ते जसे असतील तसे स्वीकारणे म्हणजेच ख-या अर्थी त्याचा  आदर करणे.   अपेक्षा  ठेवली नाही तरचं तुम्ही   प्रशंसा करू शकाल. आपण लक्षपूर्वक पाहिलं तर कळतं कि आपल्याला समोरच्याची पूर्ण ओळख नसते वरवरची महिती असते. प्रत्येकात काहीतरी विशेषत्व आहे.  जाणीव पूर्वक बघितलं तर खरं स्वरूप जाणवेल.

 
तुमच्या मनात काय आहे हे त्यांना कळलं पाहिजे असे मानू नका.  माणसाना दुस-याची मनं वाचता येत नाहीत, तुमच्या मनात काय आहे ते त्यांना सांगा. इतरांशी सतत प्रभावी पणे संवाद साधता आला पाहिजे  खुपदा पुढाकार घेऊन तुमचे विचार मांडायला हवेत, सांगायला हवेत
 
 
लोकां कडून अचानक बदलाची अपेक्षा करू नका. तुम्हाला वाटत असेल कि त्यांच्यात खरोखर बदल व्हावा, तर प्रामाणिक पणे  तुम्हाला काय वाटते ते सांगा आणि कसं महत्वाचे आहे ते पटवून द्या.
 
तुम्ही जेव्हा त्यांना बदलण्याचा प्रयत्न करता तेव्हा बदल अश्यक्य होत असतो.   तुम्ही जग बदलू शकत नाही हे स्वीकारलं पाहिजे. तुम्ही जेव्हा त्यांना स्वातंत्र्य देता व पूरक वातावरण निर्माण करता. तेव्हा बदल अधिक सुंदर होतो
 
त्याचं बरं आहे असे समजू नका . तुम्हच्या प्रमाणेच प्रत्यकाला काहींनी काही समस्या आहेत. स्मितहास्या  आड  त्या  दडलेल्या  आहेत.  
 
लक्षात ठेवा, एखाद्याला स्वीकारणे म्हणजे सर्वस्वी आपलं म्हणणे.   उजळ बाजू घेणे आणि गडद बाजू टाळणे असे नव्हे. आपण असुरक्षितत आणि प्रतिकूल  परिस्थितीवर  मात कशी करतो हे बघितलं जातं. आयुष्यात लोकांना मदत करणे , त्यांच्या समस्या वाटून घेणे, त्यांच्या दु:खात सहभागी होणे यासारखे  चांगले  काम नाही. सर्वसाधारण पणे  आपल्या गरजा, आपले संघर्ष , आपली ध्येय  समान आहेत. हे एकदा आपण  स्वीकारलं  कि  तुम्ही  सांगू  शकता कि माझा जीवन संघर्ष सुरु आहे.  आणि  इतरजण  हि सांगतील  कि आमचही  तेच सुरु आहे. समर्थांनी म्हटलच आहे  जगी सर्व सुखी असा कोण आहे? 
 
 
चांगल्याची आशा करा परंतु अपेक्षा कमी ठेवा, क्वचितच लोकं तुम्हाला हवं तसे वागतील. तुम्ही कसा विचार करता यावर तुमचा आनंद अवलंबून आहे. परिस्थिती किवा सबंध बिघडले  तरी   त्यातून  नवीन शिकण्याची संधी असतेच.