परस्पर संबंध मध्ये ७ गोष्टींची अपेक्षा नको.
आपले कुटुंबां बरोबर , कार्यालयात , समाजात , सार्वजनिक ठिकाणी परस्पर संबंध कसे असावे काय पथ्य पाळायला हवीत या लेखाचं केलेलं स्वैर भाषांतर
आपल्या अवास्तव अपेक्षा हे आपल्या दुःख आणि निराशेच मूळ कारण आहे. इतरांच्या संबंधातून व परस्पर संवादातून हे ठळक पणे जाणवते
लोकां कडून रास्त अपेक्षा ठेवल्या तर अनावश्यक दु:ख आणि निराशा टाळून योग्य गोष्टी वर लक्ष केंद्रित करता य़ेते
सहमती ची अपेक्षा ठेवू नका. आपल्या निर्णय क्षमते वर आपला विश्वास असू द्या. म्हणजे दुस-याच्या सहमतीची गरज राहणार नाही. तुम्हाला दुस-याच्या अपेक्षे नुसार जगता येणार नाही तसेच दुस-यांनी आपल्या अपेक्षे नुसार वागावे असे वाटणे हे हि गैर आहे. तुम्ही तुमच्या क्षमते नुसार आनंदी आणि उत्सा ही आयुष्य जगायाला हवे. इतरांच् या मतांचा दुष्परिणाम टाळायला हवा.
.
आपल्या अंतर्मना प्रमाणे वागण्याचं धाडस आपण बाळगलं पाहिजे. स्वत: ची तुलना दुसर-याशी करू नका, त्याच्या प्रगतीचे यशाचे दडपण येणार नाही असे बघा. आपला मार्ग सोडू नका. यश म्हणजे तरी काय? आपल्या मार्गाने आनंदी जीवन जगणे.
दुस-या कडून अवास्तव आदराची अपेक्षा ठेवू नका.: आपण स्वत:चा आदर किती करतो. कसा करतो हे पहा. आपल्या स्वत: वरील विश्वास व श्रद्धाच , आपलं ध्येय गाठण्या साठी पाठबळ देईल. कोणा कडून अवास्तव आदर व प्रेमाची अपेक्षा ठेवू नका
सर्वा बरोबर चांगलं असणे महत्वाचे आहे परंतु स्वत:शी चांगले असणे अतिमहत्वाचे आहे. स्व:ता बद्दलचा आदर, आनंद निर्माण करतं आणि तुम्ही एक चांगले मित्र, कौटुंबिक व्यक्ती बनता.
.
मी सर्वाचा आवडता पाहिजे अशी अपेक्षा ठेवू नका . एखाद्याला तुम्ही नालायक वाटाल, एखाद्याचे ना वडते असू शकाल परंतु त्याच बरो बर दुस-याला तुम्ह्ची योग्यतेचि जाणीव असे ल. आपलं मुल्य विसरू नका आणि मू ल्याची कदर असणा-या बरोबर वेळ व्यतीत करा. तुमच्या वर टीका करणारा कोणीतरी असेलच. दुर्लक् ष करा , हसा आणि पुढे चला.
या विलक्षण जगात तुमची तुलना सतत दुस-याशी होत असते. तुम्ही कसे वागता या वरून तुमची ओळख बनते कधी कधी लोकं नावं ठेवतील परंतु स्व:ताशी प्रतारणा करू नका.
दुस-यांना गृहीत धरू नका. ते जसे असतील तसे स्वीकारणे म्हणजेच ख-या अर्थी त्याचा आदर करणे. अपेक्षा ठेवली नाही तरचं तुम्ही प्रशंसा करू शकाल. आपण लक्षपूर्वक पाहिलं तर कळतं कि आपल्याला समोरच्याची पूर्ण ओळख नसते वरवरची महिती असते. प्रत्येकात काहीतरी विशेषत्व आहे. जाणीव पूर्वक बघितलं तर खरं स्वरूप जाणवेल.
तुमच्या मनात काय आहे हे त्यांना कळलं पाहिजे असे मानू नका. माणसाना दुस-याची मनं वाचता येत नाहीत, तुमच्या मनात काय आहे ते त्यांना सांगा. इतरांशी सतत प्रभावी पणे संवाद साधता आला पाहिजे खुपदा पुढाकार घेऊन तुमचे विचार मांडायला हवेत, सांगायला हवेत
लोकां कडून अचानक बदलाची अपेक्षा करू नका. तुम्हाला वाटत असेल कि त्यांच्यात खरोखर बदल व्हावा, तर प्रामाणिक पणे तुम्हाला काय वाटते ते सांगा आणि कसं महत्वाचे आहे ते पटवून द्या.
तुम्ही जेव्हा त्यांना बदलण्या चा प्रयत्न करता तेव्हा बदल अश् यक्य होत असतो. तुम्ही जग बदलू शकत नाही हे स्वीकारलं पाहिजे. तुम्ही जेव्हा त्यांना स्वातंत्र्य देता व पूरक वातावरण निर्माण करता. तेव्हा बदल अधिक सुंदर होतो
त्याचं बरं आहे असे समजू नका . तुम्हच्या प्रमाणेच प्रत्यकाला काहींनी काही समस्या आहेत. स्मितहास्या आड त्या दडलेल्या आहेत.
लक्षात ठेवा, एखाद्याला स्वीकारणे म्हणजे सर्वस्वी आपलं म्हणणे. उजळ बाजू घेणे आणि गडद बाजू टा ळणे असे नव्हे. आपण असुरक्षितत आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात कशी करतो हे बघितलं जातं. आयुष्यात लोकांना मदत करणे , त्यांच्या समस्या वाटून घेणे, त्यांच्या दु:खात सहभागी होणे यासारखे चांगले काम नाही. सर्वसाधारण पणे आपल्या गरजा, आपले संघर्ष , आपली ध्येय समान आहेत. हे एकदा आपण स्वीकारलं कि तुम्ही सांगू शकता कि माझा जीवन संघर्ष सुरु आहे. आणि इतरजण हि सांगतील कि आमचही तेच सुरु आहे. समर्थांनी म् हटलच आहे जगी सर्व सुखी असा कोण आहे?
चांगल्याची आशा करा परंतु अपेक्षा कमी ठेवा, क्वचितच लोकं तुम्हाला हवं तसे वागतील. तुम्ही कसा विचार करता यावर तुमचा आनंद अवलंबून आहे. परिस्थिती किवा सबंध बिघडले तरी त्यातून नवीन शिकण्याची संधी असतेच.
No comments:
Post a Comment