आनंदी असणे , आनंदी राहणे आपल्या सर्वांना हवे हवेसे वाटते. आनंदी एक वृत्ती आहे ती आपल्याला मनोवृतीने साध्य आहे.
आनंद आपणा सर्वांना, अवघ्या विश्वाला एकत्र आणते. आनंद मिळवण्यासाठी आपल्या प्रत्येकाची धडपड सुरु असते. परंतु आजूबाजूच्या आनंदी मंडळी कडे पहिल्या नंतर लक्षात येते कि त्यांनी आनंदी राहण्याचे ठरवले आहे
आनंद हा आपणावर व आपल्या मानसिकतेवर अवलंबून असतो हे हि मंडळी जाणते, आणि अश्या मानसिकते चा स्वीकार आपल्याला आनंदी होण्यास मदत करू शकेल.
हे हि दिवस जातील.
जेव्हा निराशा दाटून आली असेल ,तुमचं जीवन कठीण परिस्थितीतून जात असेल, हृदय विदीर्ण झालं असेल, स्वाभिमान दुखावला असेल , अशी गोंधळाची स्थिती असेल तर तुमच्या मनाला एकच विचार उभारी देईल तो म्हणजे हे हि दिवस जातील, चांगले दिवस येतील.
हे हि दिवस जातील
हा विचार, परिस्थिती क्षणभंगुर आहे त्यात बदल होणार आहे असे सांगतो ,आशावाद जागृत करतो , शहाणं करून सागतो कि जीवन एक सतत वाहणारा प्रवाह आहे. चिरस्थायी असे काही नाही.आणि हे दु:ख आणि सुख या दोघांना लागू आहे.आपण एकटे नाही आहोत
हे सगळे माझ्याच वाट्याला का? असं आपल्या पैकी प्रत्येकाला दु:खाच्या प्रसंगी, कठीण परिस्थितीत वाटत असते,. म्हणून मनात विचार करा तुम्ही एकटे नाहीत. कितीही अंधार दाटून आला तरी काळरात्र संपणार आहे, उष:काल होणार आहे.
चांगुलपणावर विश्वास ठेवा.
लोक वाईट आहेत असा विचार करणे सोपं आहे.आपलच मन नकारात्मक विचारचक्रात गुंतून जाते. इतरांच्या चांगुलपणा वर विश्वास असू द्या.आपापसात सौदार्ह जपा.
चांगली बाजू बघा.
आपला दृष्टीकोन बदलला तर आपले जग हि बदलू शकते. कसं जगायचे ? हसत, हसत कि रडत,कुथत.
दृष्टीकोन बदला, चांगली बाजू तिथेच आहे.
नकारात्मक विचारांचा त्याग करा. आनंद तुमच्याच ठायी आहे. त्याला मोकळी वाट करून द्या.
हसा थोडं आता ! हसणे छान असते.
श्वासोश्वास संथ ठेवा.
एकाच वेळी एका गोष्टी वर लक्ष ठेवण्याचं व प्रत्येक क्षण तन्मयतेने जगण्याचं सतत स्मरण ठेवले पाहिजे. जाणीव पूर्वक श्वास वर लक्ष ठेवण्याने चिंता व गडबडीला दूर ठेवू शकाल.व दिवस ध्यान मग्न होईल.
( एका छोट्या लेखाचं भाषातर त्रुटी माझ्या )