|
आदरणीय सायनेकर सर |
झाडं लावणे या उपक्रमातून मी संजीवनी परिवाराशी जोडला गेलो असं श्री सायनेकर सरांनी संजीवानी परिवाराने आयोजित केलेल्या वृक्षांच्या दहाव्या वाढदिवशी सांगितले. एक उपयुक्तवादी दृष्टीकोनातून म्हणजेच पर्यावरण संतुलन साधण्यासाठी झाडं लावतात किंवा सौदर्याच्या दृष्टीकोनातून. " झाडं लावणे व त्याचं संवर्धन करणे" या मध्ये माझी व संजीवानीची एक वेगळी भावना आहे, ती म्हणजे वृक्षा प्रती कृतज्ञतेची भावना. झाडा पासून खूप शिकण्यासारखे आहे. झाडं बहरतात कशी,प्रतिकूल परिस्थितीत वाढतात कशी , झाडावर जो घाव घालतो त्याला ही झाडं सावली देतात , त्यांला फळं देतात हे सगळं त्यांच्या कडून शिकण्यासारखे आहे. आपल्या आईवडिलांचं विशेषता वृद्धापकाळात ज्या प्रेमाने, आदराने संगोपन करणं आपलं कर्तव्य आहे, त्याचप्रमाणे झाडांच्या बाबतीत आपलं कर्तव्य आहे. झाडांची आणि मुलांची एक प्रकारे तुलना करता येईल लहान रोपाची योग्य काळजी घेतल्या नंतर जसं वृक्षात रुपांतर होतं , तसं संस्कारक्षम मुलांची काळजी आईवडील व समाजाने घ्यायला हवी.
या वेळी माई च्या हस्ते दहावी, बारावी च्या विद्यार्थ्याचं कौतुक करण्यात आलं.
सर पुढे म्हणाले , वेगवेगळ्या क्षेत्रा मध्ये शिकणा-या विद्यार्थ्यांनी फार उत्तम रीतीने आपले विचार मांडले त्याचं मी मना पासून कौतुक करतो. बोलणा-या सगळ्या मुलीच होत्या. त्याचं सरांनी विशेष कौतुक केलं व मुलांनी मुली कडून शिकायला हवे असं सांगितलं ,बेटी पढाव अभियान किती यशस्वी झाले आहे हे ह्यावरून दिसून येते असं म्हणाले .
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सर म्हणाले There is no short cut to Success. सचोटी, प्रामाणिकपणा याला कोणत्याही प्रकारचा पर्याय नाही. कष्ट करा , जास्तीत जास्त प्रामाणिक रहा. भरपूर पैसे कमवा पण सन्मार्गानेच कमवा. तुमच्या हृदयात विवेकाचा तानपुरा सतत झंकारत ठेवा. डॉक्टर व्हा , वकील व्हा,इंजिनिअर व्हा पण ते होत असताना जीवनाला एक परिमाण आहे हे विसरू नका. ते परिमाण माणुसकीचे आहे , निसर्गप्रमाचे आहे, ते परिमाण माझे आईवडील, माझं कुटुंब , माझा समाज यांच्या साठी मी काहीतरी सातत्याने करण्याचं आहे हे तुम्ही लक्षात ठेवा शेवट करताना सरांनी उपनिषदातील गुरूचा उपदेश सांगितला, सत्यं वद, वेळ आली तर गप्प बसा परंतु खोटे बोलू नका, धर्म चर , धर्माने चाल , म्हणजे चांगुलपणा , तुम्हाला असलेलं भान सोडू नका. स्वाध्याय करा, तुमच्या क्षेत्रातील ज्ञान अपडेटेड ठेवा. आई, वडील व आचार्यांना देव मानून आदर करणारे तुम्ही व्हा. आम्ह्च्या मध्ये चांगल असेल ते घ्या वाईटाचा त्याग करा. मधमाशी सारखे व्हा सर्व गुण गोळा करा.
दहावी बारावीचा रिझल्ट एक दृष्टीक्षेप
दहावी बारावीचा टक्केवारी प्रमाणे निकाल
Std | 90% above | 80 to 89.99% | 70 to 79.99 % | 60 to 69.99 % | Less 60% | Total |
X | 14 | 34 | 21 | 20 | 14 | 103 |
XII | | 7 | 14 | 33 | 37 | 91 |
दहावीतील प्रथम तीन विद्यार्थी
कुमारी जुई मोहन पाटील बोळींज ९४.२०%
कुमार हेरंब राजाराम नाईक करमाळे ९३.६०%
कुमारी प्रिया मोहन नाईक वटार ९३.४०%
|
जुई मोहन पाटील दहावी ९४.५० % प्रथम क्रमांक |
|
प्रिया मोहन नाईक दहावी ९३.४०% तृतीय क्रमांक |
|
हेरंब राजाराम नाईक ९३.६०% |
बारावीतील प्रथम तीन विद्यार्थी
संपदा सुधीर नाईक वाघोली ८९.६९%
प्रणव पांडुरंग वझे मर्देश ८६.३०%
नेहा कैलाश वझे मर्देश ८६.१५%
|
संपदा सुधीर नाईक ८९.६९% |
|
नेहा कैलाश वझे बारावी ८६.१५% तृतीय क्रमांक
|
सुरवातीला अरविंद पाटील यांनी वृक्ष वाढदिवस व विद्यार्थी स्नेह संमेलन विषयी संजीवानिची भूमिका मांडली. आनंद पाटील यांनी सुत्रसंचलन व आभार प्रकट केले.