रविवार सकाळी निर्मळ येथील विमलतीर्थ या तलावावर फेरफटका मारत होतो, दोन चार पक्षी मित्र आपापले कॅमेरे लावून एकचित्त बसले होते. मी हि मोबईल च्या कॅमेरावरून काही नयनरम्य चित्र घेतली. परंतु पक्षीजगत मझ्या कॅमे-याच्या आवाक्या बाहेरील होते. पक्षांची प्रकाश चित्र वसई पक्षी मित्र पाटील यांची आहेत. फेरफटका मारत असताना वसई रोड येथील एक आजी आजोबा आपल्या लेकी बरोबर आले होते त्यांनी तलावातील कमळ पाहून सागितलं कि अशी कमळ आपल्याकडे कुठं आढळत नाहीत, परंतु त्यांनी मारीशस येथे पाहिल्याचे सांगितले.
निर्मळ - विमलतीर्थ- तलावातील नयनरम्य कमलपुष्प. ही कमळाची विशिष्ट प्रजाती आहे
लक्ष्मीकमळ (शास्रीय नाव Nelumbo nucifera ) याची पाने, कमळपुष्प पाण्यालगत न वाढता हवेत जवळजवळ ३ ते ४ फूट उंच वाढतात
आपल्याला आकर्षित करणारे हे निसर्गसौंदर्य , पक्षांनाही आकर्षित करत आहे, तलाव परिसरावर ते खुश आहेत.
कमळपक्षी (Pheasant Tailed Jacana)
कमळपक्षी हा दलदलीत, तलावात आणि
कमळवेलींच्या तळ्यात
आढळणारा साधारण ३१ सें. मी. आकाराचा पक्षी आहे. कमळपक्षी एकट्याने किंवा थव्याने तलावात, कमळवेलींच्या आसापास दिवसभर पोहतांना दिसतात.
जांभळी पाणकोंबडी (Purple Swamphen) : हा पक्षी पाणकोंबडी प्रकारातील आहे. भारतात विपूल प्रमाणात आढळतो. नदीकाठ, दलदली, तळी ही या पक्ष्याची आवडती वसतीस्थाने आहेत. याच्या जांभळ्या रंगामुळे हा पक्षी चटकन दूरुनही ओळखू येउ शकतो.
धनवर ( Spot-billed Duck ) : भारतात सर्वत्र आढळणारा पक्षी, खुल्या जलाशया पेक्षा कमळांनी वेढलेल्या जलाशयात सापडतात.
घार (Brown Kite ) :घार हा पक्षी आकाराने गिधाडापेक्षा काहीसा लहान असून त्याची लांबी ५० - ६० सेंमी. असते. रंग तपकिरी असतो. डोके बसके, चोच आकडीसारखी आणि काळी असते. चोचीच्या बुडाकडील मांसल भाग पिवळसर; डोळे तपकिरी; पाय आखूड व पिवळे असून त्यांवर तपकिरी पिसे असतात. नख्या तीक्ष्ण व काळ्या, पंख लांब व टोकदार आणि शेपूट लांब व दुभागलेले असते. आकाशात उडताना दुभागलेल्या शेपटीमुळे हा पक्षी इतर पक्ष्यांपासून ओळखता येतो. घार एकटी व चार-पाचच्या गटात भटकत असते
No comments:
Post a Comment