व्यक्ती , कुटुंब , संघटना, संस्था , देश यांच्या उज्ज्वल भविष्यसाठी तसेच जीवनातील प्रत्येक क्षेत्रांतील प्रगतीसाठी ,एक गोष्ट अत्यावश्यक आहे, ती मूलभूत गोष्ट म्हणजे "विश्वसनीयता " (Trust ). आजचं जग बदलत आहे. जगात टिकून राहण्यासाठी आकारमान महत्त्वाचे नसून वेग महत्त्वाचा ठरत आहे. तुम्ही जर वेगवान नसाल तर कालबाह्य व्हाल. हवा असलेला वेग विश्वसनीयते मुळे प्राप्त होतो. कुटुंबातील एकमेका विषयीचा विश्वास , व्यक्ती ,व्यक्ती मधील विश्वास टीम मधील विश्वास संस्था मधील विश्वास कामाचा वेग वाढवत असतात त्याच बरोबर श्रम ही कमी करतात , वातावरण आनंदी राहतं आणि जीवनाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जातं.
या उलट विश्वासाच्या अभावामुळे दिरंगाई ,दुरावलेले सबंध,कार्यालयीन/ कौटूंबीक राजकारण , भांडणं, आतंकवाद इत्यादी प्रश्न उद्धभवतात.
कुटुंबात, कार्यालयात, संस्थेत, समाजात, सह्का-या मध्ये एकाच वेळी अनेकांशी विश्वासाचे बंध बांधु शकतो. आपल्या वागण्याने गमावलेला विश्वास सुद्धा प्राप्त करू शकतो.
"विश्वसनीयता " परस्परावलंबी आहे. अंतकरणात प्रकाशते, वागण्यात परावर्तीत होते. विश्वासाचं वातावरण प्रस्थापित करण्यासाठी साठी पाच पातळीवर काम करणं आवश्यक, त्या पाच पाय-या आहेत १) स्वत:ची विश्वसनीयता. २) परस्परातील विश्वसनीयता. ३) कुटुंबाची / संस्थेची विश्वसनीयता. ४) बाजारपेठेतील विश्वसनीयता. ५) सामाजिक विश्वसनीयता.
"स्वतःची विश्वसनीयता" आपण स्वतः ला काही प्रश्न विचारून तपासू शकतो, मी लोकांच्या विश्वासास पात्र आहे का? लोक माझ्यावर विश्वास ठेवतात का? इत्यादी .. आपली विश्वासार्हता आपण वाढवत नेऊ शकतो. विश्वसनीयते चे मुख्यतः चार घटक आहेत. जसजसे हे चार घटक आपण विकसित करू. त्या बरोबर आपली व्यक्तीगत विश्वसनीयता हि वाढेल. स्वतःची विश्वसनीयता ही यशाची पहिली पायरी आहे. यातील पहिले दोन घटक स्वभाव, चारित्र्याशी निगडित आहेत तर उर्वरित दोन कौश्यल्यावर आधारित आहेत.
सचोटी (Integrity) : सचोटी म्हणजे प्रामाणिकता असं अनेकांना वाटते परंतु ही त्यापेक्षा मोठी आहे. प्रामाणिकते बरोबरच विचारा प्रमाणे आचार असणे ,आत बाहेर एक असणं, आपली मूल्य आणि श्रद्धा जपण्याचं साहस असणं, ह्या गोष्टीच्या अभावा मुळेच बहुतेक वेळी विश्वसनीयतेला तडे जातात.
विश्वसनीयता अधिक दृढ करण्यासाठी स्वतः ला काही प्रश्न विचारायला हवे. इतरांबरोबर माझे संबंध प्रामाणिक आहेत ना? मी बोलल्या प्रमाणे आचरण करतो का? मूल्याची जाणीव व त्याची जपवणूक करतो का? स्वतः शी ठरवलेल्या गोष्टी मी करतो का?
हेतू : म्हणजे उद्देश ,कार्यपद्धत आणि आचरण. उद्देश प्रांजळ आणि परस्परांना पूरक असेल, काही छुपछुपी नसेल, त्याच प्रमाणे आचरण असलं तर काम सोप्प होतं.
एखाद्याच वाईट केलं तर कायद्याने गुन्हा ठरतो परंतु मनात जर दुस-याचा वाईटाचा विचार आला तरी नैतिक दृष्ट्या गुन्हा होय, त्यासाठी हेतू शुद्ध हवा.
कार्यकुशलता : म्हणजे विषयाचं ज्ञान ,हुशारी , कामाचा दृष्टिकोन, कौश्यल्य , काम करण्याची शैली आणि निभावून नेण्याची क्षमता.
कार्यक्षमता आम्हाला प्रेरित करते असं सामवेदात म्हटलं आहे. आपल्या सामर्थ्याचा उद्दिष्टपूर्ती साठी उपयोग करा, नवीन गोष्टी शिका, अपडेटेड रहा.
निष्पत्ती : कामगिरी वर निष्पत्ती अवलंबून असते . अपेक्षित परिणाम (Result ) मिळाले नाहीत तर विश्वासार्हतेला धक्का बसतो.
परिणामाची जबाबदारी घ्या! , अपेक्षित कामगिरी करा, शेवट गोड करा.
आम्ही सर्वोत्तम कामगिरी करत आहोत हे सांगून काही उपयोग नाही. यशस्वी होण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते ते करायला हवं
परस्परातील विश्वसनीयता :लोकं तुम्ही बोलतां ते ऐकत नसतात तर त्याचं लक्ष तुमच्या वागण्याकडे असते.- अनामिकतुमचं वागणं, आचरण फार महत्त्वाचं आहे , त्याने माणसं जोडली जातात. शब्दाला अर्थ कृतीने प्राप्त होतो.चांगल्या शब्दाला एक महत्त्व आहे, ते उद्दिष्ट स्पष्ट करतात ,त्यामुळे आशादायी वातावरण तयार होतं,शब्दाप्रमाणे वागण्याचं प्रत्यंतर,विश्वसनीयता वाढवतं . आपल्या बोलण्या चालण्याने इतरांचा विश्वास संपादन करता येतो. काहीचं म्हणणं आहे की आपण वागणं बदलू शकत नाही. परंतु पुराव्यानी सिद्ध झालं आहे लोक आपलं वागणं बदलतात आणि प्रगती साधतात.आपण आपलं वागणं बदलू शकतो आणि खाली दिलेल्या मार्गानी इतरांशी चांगले संबंध व परस्परात विश्वसनियता निर्माण करू शकतो.स्पष्ट साधं सरळ बोला : साधं सरळ आणि सोप्प्या भाषेत बोला.पूर्ण माहिती द्या. खोटं बोलू नका. फेड्रिक नित्शे नी एका ठिकाणी म्हटलंय " तुमच्या खोट्या बोलण्याचं मला वाईट वाटत नाही परंतु या पुढे मी तुमच्यावर विश्वास ठेवू शकणार नाही याचं वाईट वाटतं" स्पष्ट बोलणं म्हणजे फटकळ पणा नव्हे. दुस-याची निंदा नव्हे. आपण स्वतः ला काही प्रश्न विचारून स्पष्ट बोलण्याचा सराव करू शकतो. मी खरं तेच बोलत आहे कि शब्दाशी खेळतोय ? मी नेमकं बोलतोय कि फाफटपसारा करतोय? मी स्पष्ट बोलण्यास घाबरतो का? कसली भीती वाटते ,परिणामाची, दुःखाची, चूक होईल याची, दुस-याच्या भावना दुखावतील याची , कि आपण अप्रिय होऊ याची .. इत्यादी.स्पष्ट बोलणं म्हणजे , खरं , साधं , सोप्प बोलणं. अर्धसत्य, शब्दांचा खेळ, चुकीची माहिती टाळा.आदर व्यक्त करा : ज्यापासून फायदा किंवा तोटा नाही अश्या बरोबर माणूस कसा वागतो यावरून त्याची पारख होते. दोन प्रकारे आदर व्यक्त होतो. सर्वांप्रती आदर व त्यांची विचारपूस व काळजी घेणं. खरोखर काळजी घ्या ढोंग करू नका , प्रत्येक वक्तीचा योग्य तो आदर करा. छोट्याछोट्या गोष्टीची दखल घ्या, बढेजाव दाखवू नका.पारदर्शकता ठेवा : खुलं वातावरण, वास्तव आणि सत्य जाणून घेता येईल अशी स्थिती. कधीमधी स्वतःला विचारा मी काही दडवून तर ठेवत नाही ना ? छुपं उद्दिष्ट ठेवू नका. खुलं सत्त्य मांडायोग्य , अयोग्य चं भान : योग्य काय आहे ते माहिती असूनही तसं न वागणं म्हणजे भ्याडपणा होय. जेव्हा तुमच्या हातून चूक घडते तेव्हा तुम्ही दुर्लक्ष करता का ? चूक झाकायचा प्रयत्न करता का ? चुकीचे समर्थन करता का ? कि चूक मान्य करून चुकीची भरपाई करता ? चुकीची दुरुस्ती करा , तुरंत माफी मांगा चुकीची भरपाई करा. नम्रता दाखवा,अहंकार आड येऊ देऊ नका.निष्ठा दाखवा : मान्यता , कृतज्ञता , आणि प्रामाणिकपणा या वर निष्ठा आधिरीत आहे. दुस-याचा सन्मान करा , इतरांना श्रेय द्या.श्रेय कुणाला मिळतंय याचा तुम्ही विचार नाही केला तर जीवनात तुम्ही काहीही साध्य करू शकाल. हेन्री ट्रूमन. मुक्तपणे श्रेय द्या , इतरांच्या योगदानाची पोच द्या, इतरांच्या पाठीमागे बोलू नका , इतरांची गुपितं उघडी करू नकापरिणाम/ निष्पत्ती : आपण हे करू शकतो,ते करू शकतो असं वाटतं. हे वाटणं म्हणजेच आपण , परंतु लोक आपली पारख आपण आत्तापर्यंत काय केलं आहे यावरून करतात. नक्की काय अपेक्षित आहे हे जाणून घ्या. तुम्ही जे दिलं आहे तेच अपेक्षित होतं असं समजू नका. मोठी आश्वासने देऊ नका तुमच्याकडे दुर्लक्ष करतील. छोटी आश्वासने द्या वेळेच्या आत पूर्ण करा. कामं होतील या कडे लक्ष द्या. कामात विलंब टाळा, सबबी देऊ नका. जेवढं अपेक्षित आहे तेवढं कराअधिक चांगलं करा : शिकून नवीन बदल आत्मसात करून सतत सुधारणा करा. चुकां पासून शिका आणि चूक सुधारा. औपचारिक आणि अनौपचारिक अभिप्राय प्रणाली विकसित करा. आजचं ज्ञान व कौशल्य पुढील आव्हानासाठी पुरेसं आहे असं समजू नका. कौशल्य वाढवा. सतत शिकत रहा.वास्तवाला धैर्याने सामोरे जा : कठीण कामं अंगावर घ्या ,चांगल्या वाईटाचा स्वीकार करा. न उच्चारलेल्या गोष्टी कडे ही लक्ष ठेवा. प्रश्न टांगते ठेवू नका. करकोचा प्रमाणे वाळूत तोंड खुपसू नका, सामना कराअपेक्षा जाणून घ्या : अपेक्षा भंगामुळे खूपसे संघर्ष निर्माण होतात. स्पष्टता ही संवादाची खरी शक्ती आहे. अपेक्षेच्या स्पष्टतेने सामान ध्येय ठरवता येतं ते कसं गाठावं या विषयी सहमती ही होते. अपेक्षा उघडपणे प्रकट करा , चर्चा करा, अपेक्षा भंग होऊन देऊ नका. अपेक्षांची पूर्ण कल्पना आहे असं गृहीत धरू नका.गरज असेल तर पुन्हा बोलून नक्की करा.उत्तरदायीत्व स्वीकारा : जबाबदारीची दोन परिमाणे एक स्वतः ला जबाबदार धरा आणि दुस-यांना जबाबदारी द्या. एखादी चूक झाली तर स्वतःचे विचार व भाषा तपासा. स्वतःला दोष देऊ नका तसेच इतरांवर आरोप करू नका. जबाबदारी टाळू नका , जबाबदारी नक्की करा, अधांतरी ठेवू नका. जबाबदारी घ्या आणि निभावा.
प्रथम ऐका : यथार्थपणे दुस-या व्यक्तीचे विचार, भावना, अनुभव आणि दृष्टिकोन समजून घ्या. स्वतःला विचारा, मला बरोबर समजलं आहे का? नंतरच निदान करा , उत्तर सुचवा. बोलण्या अगोदर ऐका. सर्व प्रश्नाची उत्तरं आपणाकडे आहेत असं समजू नका . आपल्या कानांनी, डोळ्यांनी मन:पूर्वक लक्ष द्या,कसं वागलं तर आपल्या सह्का-याना आवडेल जे जाणून घ्या.शब्द पाळा : दिलेलं वचन पाळा. तुम्ही एखादा शब्द देता तेव्हा आशा जागवता, शब्द पूर्ण करता तेव्हा विश्वास निर्माण करता.
मोहंमद पैगंबर ने दांभिकतेची तीन लक्षण सांगितली आहेत १) खोटं बोलणं ,२) वचन न पाळणे ३) विश्वासघात करणे.काळजी पूर्वक वचन द्या आणि पूर्णत्वास न्या. विश्वासास धक्का लावू नका. एखादं काम वेळेत पूर्ण करू शकलो नाही तर दुर्लक्ष करू नका ,चर्चा करून वेळ मागून घ्या. न पाळलेल्या वचनाचं समर्थन करू नका.विश्वासाची व्याप्ती वाढवा : इतरांवर विश्वास दाखवणे हि नैसर्गिक प्रवृत्ती आहे असं ठसवा. बहुतेक जण विश्वासास पात्र असतात त्याच्यावर विश्वास ठेवा. विश्वासास पात्र ठरलेल्यांना मोठी जबाबदारी द्या. जोखीम आहे म्हणून विश्वास ठेवायचा नाही असं करू नका. स्थिती नुसार विश्वास ठेवायला शिका.
विश्वासार्हतेची तिसरी पायरी संस्था वरील विश्वास , विश्वसनीय संस्था मध्ये काम करण्यातील उत्साह व सकारात्मक ऊर्जा जाणवते. माहितीचे आदान प्रदान मोकळेपणे केले जाते. चुका म्हणजे शिकण्याचा एक मार्ग असा दृष्टिकोन असतो. संस्थेतील मंडळी स्पष्ट बोलणारी व वास्तवाचं भान ठेवणारी असतात. पारदर्शकता पाळली जाते आणि मीटिंगानंतरच्या मिटींग्स होत नाहीत. कामाची जबाबदारी घेतली जाते आणि उत्तरदायित्व निभावले जाते. संवाद आणि सहकार्य संस्थेचा आत्मा असतो. अशा संस्थे मधे योजना आखून , अंतर्गत सर्व घटकांना सामावून घेऊन योजना पूर्णत्वास नेण्याचं कसब विकसित करण्यावर भर दिला जातो
बाजारपेठीतील विश्वास शेवटी, आपल्या कडे काय असतं तर , आपली प्रतिष्ठा ! म्हणजेच संस्था , संस्थेतील सर्व घटक ,व्यक्ती याच्या परस्परातील वागण्याने , व्यक्तिगत प्रतिष्ठेतून बाजारपेठेतील विश्वसनीयता वाढू शकते. वर सांगितलेली वर्तणूक व्यवहारात आणली तर विश्वसनीयतेचा आलेख उंचावेल.विश्वासार्हतेची अंतिम पायरी सामाजिक विश्वसनीयता : सर्व जग विश्वासावर चालतं. फ्रेंच भाषेत एक म्हण आहे " Fish discover water last" म्हणजेच मासे आणि पाणी इतकं एकरूप झालेले असतात कि त्यांना वेगळं करता येत नाही. मानवजातीचं तसंच आहे विश्वसनीयते पासून त्याना वेगळं करता येणार नाही, समाजासाठी "वैयक्तिक योगदान" हाच सामाजिक विश्वसनीयतेच पाया आहे' "एकमेका साह्य करू ."
("The Speed of Trust" a book by Stephen M.R Covey वर आधारित जसं उमगलं तसं उमटलं, न्यून माझं )