Tuesday, 12 July 2016

स्वप्नपूर्ती - तीन आवश्यक गोष्टी


आपल्याला चटकन उत्तर हवं असतं आपल्या पैकी किती जण वेळ घेणा-या कामाची निवड करतील. काम केल्या शिवाय यश मिळत नाही. आपल्यात काही  बदल करणे अपरिहार्य  होऊन जातं ते आव्हानात्मक व अस्वस्थ करणारं असतं. परंतु तुम्ही जेव्हा मोठ्या चित्रावर लक्ष केंद्रित करता म्हणजेच  तुमच्या जीवन स्वप्ना वर, जीवन ध्येया  काम करता तेव्हा त्याचे श्रम, थकवा जाणवत नाही.
एकदा ध्येय नक्की झालं की खालील तीन गोष्टीवर विशेष लक्ष द्यायला हवं.   
 .
स्व: जाणीव 
आपण कसे आहोत हे माहीत आहे का? आपली शक्तिस्थानं काय आहेत, आपल्यात काय उणिवा आहेत, आपल्या सवयी काय आहेत.कोणतीही गोष्ट साध्य करण्याची गुरुकिल्ली म्हणजे स्व:ता विषयीच्या जाणिवा. तुमच्या जीवनाचे तुम्हीच शिल्पकार आहात. 
स्व: ची  जाणीव म्हणजे चुका होणार नाहीत असं नाही , परंतु चुकां पासून शिकण्याची व दुरुस्त करण्याची क्षमता.  -डॅनियल चियक
 
  मानसिकता आणि श्रद्धा
स्व:ताला  समजून घ्या. खूपदा आपण स्व:ताला कमी लेखतो. प्रयत्न करण्या अगोदरच हार मानतो. आपला जीवनाविषयक दृष्टिकोन भव्य असू शकेल, परंतु तुमचा स्व:तावर  विश्वास नसेल तर काहीही प्रगती करू शकणार नाही.   मानसिकता सर्व काही आहे  तुमाला  निराशा व पीछेहाटीत प्रगतीपथा वर ठेवते. यशस्वीतेसाठी मन सिद्ध करा आणि आपण त्यासाठी पात्र आहोत अशी  अत:करणात श्रद्धा बाळगा. 
आपण अपरिपूर्ण आहोत याची भीती नाही, खरी भीती आहे आपण एका मर्यादे पलीकडे प्रभावी आहोत याची . अंधार नाही तर प्रकाश आपल्याया भिववीतो - मारियाना विल्यमसन 

कृती 
जेव्हा एखादी कल्पना किंवा उद्दिष्ट तुमच्या उराशी असेल तेव्हा   विनाविलंब सुरवात  करा. कृती मुळेच प्रगती होते आणि कामाला गती मिळते. दररोज केलेली कृती समाधान देईल.घेतलेल्या प्रत्येक छोट्या छोट्या कृतीतील आनंद घ्या. योग्य दिशेने पडलेल्या छोट्या पाऊलाला कमी लेखू नका. चालढकल आणि सूक्ष्म नियोजना  मध्ये अडकू नका. पुढचं पाऊल कसं टाकायचं यावर लक्ष केंद्रित करा.    
आजच्या करणी वर उद्याचं भविष्य अवलंबून आहे.  महात्मा गांधी 

आपण काय करतोय याचं एक स्पष्ट चित्र तयार करा.  उद्दिष्ट निश्चित करा. आपल्या कुवती वर विश्वास ठेवा.  उद्दिष्ट आपल्या  जीवनात उतरावा ,प्रत्येक निर्णय आणि कृती त्या दिशेने होऊ द्या. 

 
 ( इंग्रजी लेखाचं स्वैर भाषांतर )

No comments:

Post a Comment