श्री आनंद मोरे यांचं श्री आर. गोपालक्रिष्णन यांच्या ‘क्रॅश : लेसन्स फ्रॉम द एन्ट्री अॅण्ड एग्झिट ऑफ सीईओज्’ या पुस्तकावरील म्हणजेच अपयशी नेतृत्वाकडून मिळणारे धडे वरच परीक्षण लोकसत्तेत वाचनात आलं.
अनेक कंपन्यांनी व्यावसायिक ‘सीईओ’ नेमले; त्यांपैकी काही जणांना अपयशामुळे पायउतार व्हावे लागले. अशा १५ उदाहरणांचा अभ्यास या पुस्तकांत मांडण्यात आला आहे.
लेखक आर. गोपालक्रिष्णन यांनी पहिल्या भागात जोसेफ जॉन कॅम्पबेल या अमेरिकी पुराण अभ्यासकाच्या १९४९ मधील ‘द हीरो विथ अ थाऊजंड फेसेस’ (हजार चेहऱ्यांचा नायक) या ग्रंथाचा आधार घेतला आहे. अभ्यासानंतर लेखक नित्कर्षा पर्यंत पोहचून एखाद्या सिद्धांत मांडतो कॅम्पबेल यांच्या मते, जगभरातील कुठल्याही पुराणकथेतील नायकाच्या आयुष्यात काही टप्पे कायम दिसून येतात.
‘सुरवातीची स्थिती , जग
साहसाची हाक
द्विधा मन: स्थिती
सल्लागाराचा प्रवेश
उंबरठा ओलांडणे
परीक्षांचा काळ
खडतर आव्हानांची सुरुवात
सत्त्वपरीक्षा
विजय
बक्षीस
पुनस्र्थापना
नायकत्व’
याच टप्प्यांतून जगातील सर्व पौराणिक कथा फिरतात.कथा पुरुषाला अश्या प्रकारच्या आव्हानांना सामोरं जावं लागतं आणि शेवटी प्राप्त होते नायकत्व किंवा देवत्व.मग ती रामायणातील रामाची कथा असो वा महाभारतातील कृष्णार्जुनाची कथा असो किंवा अन्य समाजांतील कोणत्याही पौराणिक नायकाची कथा असो.
लेखक आपली निरीक्षणं मांडतो आणि त्याच बरोबर कारण मीमांसा करतो. बघा !
‘पॉवर टेन्ड्स टु करप्ट अॅण्ड अॅब्सोल्यूट पॉवर करप्ट्स अॅब्सोल्यूटली’ हे लॉर्ड अॅक्टन यांचे विधान नकारात्मक आहे.
‘अधिकारांमुळे मेंदूवर नकारात्मक परिणाम होतो आणि व्यक्तीची अगम्य भविष्याचा वेध घेण्याची क्षमता कमी होऊन अति-आत्मविश्वास वाढतो; परिणामी चहूबाजूंनी येणारे संकेत ओळखण्यास तो कमी पडतो,’
आरशाचे काम करणाऱ्या साहाय्यकांचे महत्त्व सांगताना लेखक म्हणतात "आपल्यातील दोष आपल्याला हळुवारपणे सांगून त्यापासून आपल्याला दूर ठेवणारे सहकारी आपला खरा हितचिंतक असतो"
मोठय़ा अधिकारांबरोबर ‘मला नियम लागू होतच नाहीत असा समज होता. इतरांप्रति तुच्छता स्वभावात येते . तिच्यामुळे -हास होतो. या उलट
"मोठय़ा अधिकारांबरोबर मोठय़ा जबाबदा-या येतात"