Tuesday, 31 March 2020

कोरोनाव्हायरस नंतरचे जग - युवल नोहा हरारी


 

हे वादळ निघून जाईल., आपण  निवडलेल्या पर्यायामुळे  आयुष्य  बदलेल !

 आज मानवजातीला जागतिक संकटाचा सामना करावा लागत आहे. कदाचित आपल्या पिढीपुढील सर्वात मोठे संकट. या परिस्थितीत लोक आणि सरकार घेत असलेले निर्णय कदाचित पुढच्या काही वर्षांसाठी जगाला वेगळा आकार देतील. ते केवळ आपल्या आरोग्य व्यवस्थाच नव्हे तर आपली अर्थव्यवस्था, राजकारण आणि संस्कृतीत देखील बदल घडवून आणतील . आपण जलद आणि निर्णायक पद्धतीने कार्य केले पाहिजे अशी आजची निकड आहे परंतु हे करताना निर्णयाच्या दीर्घकालीन परिणामाचा देखील विचार केला पाहिजे. उपलब्ध पर्यायांमधील पर्याय निवडताना धोक्यावर फक्त मात करायची नाही तर वादळ संपल्यानंतर आपण कोणत्या प्रकारचे जग निर्माण करणार आहोत ह्याचा विचार केला पाहिजे. होय, वादळ संपुष्टात येईल, मानवजातीचे अस्तित्व टिकेल, परंतु आपण एका वेगळ्या जगात राहू.

आपत्काला साठी योजलेले उपाय जीवनाचे एक भाग होऊन जातात. सामान्य काळात विचार-विमर्श करून घेतले जाणारे निर्णय आणीबाणीत काही तासांत घेतले जातात. अपरिपक्व आणि अगदी धोकादायक तंत्रज्ञान सुद्धा सेवेमध्ये आणले जाते. इतर वेळी शैक्षणिक मंडळ व्यवसाय यांनी घरून काम करण्यास परवानगी दिली नसती या स्थितीत वर्क फ्रॉम होम पटकन स्वीकारलं गेलं या संकटाच्या वेळी आपल्यासमोर दोन महत्वाचे पर्याय आहेत. पहिला सरकारची निरंकुश पाळत स्वीकारणे किंवा नागरिक सबलीकरणा चा आग्रह धरणे. दुसरा प्रखर राष्ट्रवाद किंवा वैश्विक ऐक्य. या संकटातून वाचण्यासाठी संपूर्ण मानवजातीने काही मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे आवश्यक आहे. हे साध्य करण्याचे दोन मुख्य मार्ग आहेत. लोकांची देखरेख करणे आणि नियम मोडणा-्यांना शिक्षा देणे ही सरकारची एक पद्धत आहे. आज, मानवी इतिहासामध्ये प्रथमच तंत्रज्ञानामुळे सर्वांचे निरीक्षण करणे शक्य होते.

कोरोनव्हायरस साथीच्या विरूद्धच्या लढाईत अनेक सरकारांनी नवीन पाळत ठेवण्याची साधने यापूर्वीच तैनात केली आहेत. सर्वात उल्लेखनीय प्रकरण चीनचे आहे. लोकांच्या स्मार्टफोनचे बारकाईने निरीक्षण करून, कोट्यावधी चेहरा-ओळखणारे कॅमेरे वापरणे आणि लोकांना त्यांचे शरीराचे तापमान आणि वैद्यकीय स्थिती तपासून अहवाल देण्यास प्रवूत्त करण्यात आले आहे. , चीनी अधिकारी केवळ संशयित कोरोनाव्हायरस चे वाहकच त्वरीत ओळखून थांबत नाहीत तर त्यांच्या हालचालींचा मागोवा घेतात.

 अलीकडच्या काळात दोन्ही, सरकारे आणि कॉर्पोरेशन्स लोकांचा मागोवा घेण्यासाठी, देखरेखीसाठी आणि हाताळण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरत करत आहेत. जर आपण सावधगिरी बाळगली नाही, तर आपल्याला कळणार ही नाही की आपल्यावर पाळत ठेवली जात आहे.

 एका काल्पनिक सरकारचा विचार करा ज्याने अशी मागणी केली की प्रत्येक नागरिकाने दिवसाचे 24 तास शरीराचे तपमान आणि हृदय गती नियंत्रित करणारे बायोमेट्रिक ब्रेसलेट घालावे. सरकारी अल्गोरिदमद्वारे काढलेला डेटा एकत्रित केला जाईल आणि त्याचे विश्लेषण केले जाईल आपल्याला समजण्यापूर्वीच आपण आजारी असल्याचा नित्कर्ष काढला जाईल. आपण कोठे होता आणि कोणास भेटलात हे देखील त्यांना समजेल. साथीची लागण थांबवू शकू. नकारात्मक बाजू ही आहे की ही एक भयानक नवीन पाळत ठेवण्याच्या प्रणालीला कायदेशीरपणा येईल, जर कॉर्पोरेशन आणि सरकारांनी आमचा बायोमेट्रिक डेटा काढणे सुरू केले तर ते या माहितीच्या आधारे ते आपल्या आवडी निवडी अधिक चांगल्या प्रकारे ओळखू शकतील आणि मग ते आपल्या भावनांचा अंदाज लावतीलच त्याचबरोबर आपल्या भाव भावनां मध्ये बदल घडवून आणू शकतील , प्रभाव पडू शकतील

 

आपत्कालीन परिस्थितीत तात्पुरता उपाय म्हणून बायोमेट्रिक पाळत आपण स्वीकारू. आणीबाणी संपली की ती निघून जाईल. परंतु  तात्पुरत्या उपाययोजनां निघून जात नाहीत हा अनुभव आहे आपल्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी आणि कोरोनाव्हायरस महामारी थांबविण्या साठी , निरंकुश पाळत ठेवण्याची यंत्रणा स्वीकारू नये तर नागरिकांना सक्षम बनवायला हवे. लोकांना वैज्ञानिक तथ्ये सांगितले पाहिजे . सरकार अधिकारीवर्ग यांनी लोकांना विश्वासात घेऊन काही निर्णय घेतले  तर लोक स्वखुशीने निर्णय पाळतील.

अनुपालन आणि सहकार्यासाठी विश्वास आवश्यक आहे. लोकांना विज्ञानावर विश्वास ठेवण्याची, सार्वजनिक अधिका -यांवर विश्वास ठेवण्याची आणि माध्यमांवर विश्वास ठेवण्याची आवश्यकता आहे. गेल्या काही वर्षांमध्ये बेजबाबदार राजकारण्यांनी, विज्ञानावर, सार्वजनिक प्राधिकरणांवर आणि माध्यमांवर चा   विश्वास जाणीवपूर्वक कमी केला आहे. आता हेच बेजबाबदार राजकारणी हुकूमशाही आणतील .  आपण नवीन तंत्रज्ञानाचा नक्कीच उपयोग केला पाहिजे, परंतु या तंत्रज्ञानाने नागरिकांना  सक्षम बनविले पाहिजे. आम्हाला जागतिक योजनेची आवश्यकता आहे. आपण निवडलेला दुसरा महत्त्वाचा पर्याय म्हणजे प्रखर राष्ट्रवाद किंवा वैश्विक ऐक्य . साथीची रोग आणि परिणामी आर्थिक संकट दोन्ही जागतिक समस्या आहेत..  केवळ जागतिक सहकार्याने त्यांचे प्रभावीपणे निराकरण केले जाऊ शकते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्हायरसचा पराभव करण्यासाठी  जागतिक स्तरावर माहिती सामायिक करणे आवश्यक आहे. चीनमधील कोरोनाव्हायरस आणि अमेरिकेतील कोरोनाव्हायरस ची लक्षणं सारखी आहेत . परंतु चीन, अमेरिकेला कोरोनाव्हायरस आणि साथीला  सामोरे           कसे  जावे याबद्दल मौल्यवान माहिती देऊ शकते. एका इटालियन डॉक्टरला पहाटे मिलानमध्ये काय सापडले ते कदाचित संध्याकाळपर्यंत तेहरानमध्ये जीव वाचवू शकेल. परंतु हे होण्यासाठी, जागतिक सहकार्याची आणि विश्वासाच्या भावनेची गरज आहे.

देशांनी  माहिती सामायिक करण्यास आणि नम्रपणे सल्ला स्वीकारण्यास तयार असले पाहिजे आणि त्यांनी प्राप्त केलेल्या डेटा आणि अनुभवावर विश्वास ठेवला पाहिजे. वैद्यकीय उपकरणे तयार करण्यासाठी आणि वितरणासाठी जागतिक प्रयत्नांची देखील आवश्यकता आहे.  युद्धाच्या वेळी प्रमुख उद्योगांचे राष्ट्रीयकरण करतात, त्याचप्रमाणे कोरोनाव्हायरस विरूद्ध  युद्धासाठी आपल्याला महत्त्वपूर्ण उत्पादनं मानवीय करण्याची आवश्यकता असू शकते.  श्रीमंत देशाने गरीब देशाला मौल्यवान उपकरणे पाठविण्यास तयार असले पाहिजे, आर्थिक आघाडीवरही जागतिक सहकार्याची नितांत आवश्यकता आहे.

जागतिक विमान प्रवासा संबधी करार होणे आवश्यक आहे. सर्व आंतरराष्ट्रीय प्रवास महिन्यांपासून थांबविणे प्रचंड नुकसानीचे आहे  आणि कोरोनाव्हायरस  विरूद्ध युद्धाला अडथळा आणेल. देशांनी गरज असलेल्या वैज्ञानिक, डॉक्टर, पत्रकार, राजकारणी, व्यावसायिक. यांना त्यांच्या मूळ देशाद्वारे पूर्व-तपासणीची अट घालून प्रवासाची सुविधा द्यायला हवी.

प्रत्येक संकट ही एक संधी आहे. आपण आशा बाळगली पाहिजे की सध्याच्या साथीच्या रोगामुळे मानवजातीस जागतिक मतभेदांमुळे उद्भवणार्‍या तीव्र धोक्याची जाणीव होईल. आपण मतभेद निवडल्यास, हे संकट फक्त   लांबणीवर पडणार नाहीतर भविष्यात कदाचित आणखी वाईट आपत्तींना सामोरे जावे लागेल .जर वैश्विक सदभाव निवडला तर ते केवळ कोरोनाव्हायरसच नव्हे तर भविष्यातील सर्व साथीच्या आणि 21 व्या शतकातील मानवजातीला त्रास देणार्‍या सर्व संकटांविरुद्धही विजय ठरेल.




(युवान नोहा हरारी यांच्या लेखाचा स्वैर भाषांतर, त्रुटी अर्थातच माझी )

No comments:

Post a Comment