श्रीमद् शंकराचार्य यांच्या विवेकचूडामणी ग्रंथात तिसरा श्लोक म्हणतो.
दुर्लभं त्रयमेवैतत् देवानुग्रहहेतुकम्।
मनुष्यत्वं मुमुक्षुत्वं महापुरुषसंश्रयः॥These three are difficult to obtain in this world and depend on the mercy of the gods, – the human birth, the desire for salvation, and the company of the great-souled ones.
आचार्य म्हणतात माणसाचा जन्म , मोक्षप्राप्तीची इच्छा , आणि महा पुरुषाचा सहवास दुर्मिळ आहे . ज्यांना हे लाभते त्यावर देवाची कृपा समजावी.
प्राणीमात्रात मनुष्य श्रेष्ठ आहे हे आपण जाणतोच , तो नराचा नारायण किंवा वानर बनू शकतो. ते त्याच्या हाती आहे. मोक्षप्राप्तीची इच्छा, मोक्ष म्हणजे मृत्यूनंतर मुक्ती असा नसून छोट्या छोट्या गोष्टी पासून मुक्त होणे , राग , लोभ , हव्यास या गोष्टीवर संयम मिळवणे म्हणजे मुक्त होणे. एखादी सवय प्रयत्नपूर्वक सोडणे म्हणजे त्या सवयी पासून मुक्ती. होय ना !! आपल्या अवती भोवती मोठी मोठी माणसं असतात. त्याचे मोठे पण गुणांवर अवलंबून असते. अश्या माणसाच्या सहवासाने अनेक गोष्टी आपल्या जीवनात उतरत असतात. आपल्या आईवडिला कडून , शिक्षकांकडून , मित्रांकडून काही गोष्टी आपण शिकत असतो त्याचा प्रभाव आयुष्यभर राहत असतो. हे सर्व जमून येणे म्हणजेच ईश्वरी कृपा.