ज्ञातातले अज्ञात ठिकठिकाणी आहे.
आणि केवळ अज्ञात.... आहेच .
आपण ज्ञातातील अज्ञात शोधण्यात गुंग आहोत. केवळ अज्ञातातले शोधणे लक्षातच घेत नाही.
अज्ञात आहे खूप आहे ... हे समजून घेण्याचे धैर्य मला हवंय.
अज्ञात
आजचा दिवस कसा जाईल?
आयुष्यात पुढे काय होईल? ज्योतिषी भविष्य सांगतो , ढोबळ , तपशील अज्ञात.
माझी तब्येत आयुष्यभर चांगली राहील? अज्ञात .
नवे रोग निर्माण होतात आधी अज्ञात.
माणसांत षडरिपू आहेत. त्या मागे निसर्गतत्त्व काय?
माणसांत सुष्ट दुष्ट आहेत या मागे निसर्गतत्त्व काय?
माणसांत परिवर्तन करायचंय . असे असे किंवा तसे तसे परिपूर्ण पद्धत अज्ञात आहे.
बुद्धी , प्रज्ञा सर्वांना सारखी नसते यामागे निसर्गतत्त्व काय?
वेड लागणे ... वेडाला सृष्टीत स्थान काय? निसर्गतत्त्व काय?
घाबरणे .. घाबरवणे छळणे , छळवले जाणे या मागे निसर्गतत्त्व काय?
अहंकार असण्यात निसर्गतत्त्व काय? स्वाभिमान , गर्व, अस्मिता... निसर्गतत्त्व? ..
अहंकार पूर्णपणे जातो?
पावित्र्य म्हणजे काय? एखादी वस्तू,प्राणी , एखादे स्थान पवित्र कसं? इतर वस्तू, प्राणी इतर स्थान अपवित्र ..या मागे निसर्गतत्त्व काय?
सृष्टीत सौंदर्य आहे , कुरूपता आहे , बीभत्सता आहे, निर्मिती आहे, विनाश आहे.... यामागे निसर्गतत्त्व काय?
सर्वाभूती प्रेम , प्रेम उडणे द्वेष करणे हिंसा करणे या सर्वामागे निसर्गतत्त्व काय?
मृत्यू
सर्व कळत नाही खूप अज्ञात आहे. तरी माणूस जीवन जगतोय या मागे निसर्गतत्त्व काय?
एकूण अस्तित्व का?जीवनाचा अर्थ काय? खूप अज्ञात आहे.
घाबरणारे असतात आणि घबरावणारे असतात
काय करायचं भयाचे?
अज्ञातातले शोधणे ही गोष्ट पक्की रुजलीय.. पुढची गोष्ट ........ अंतर्मुख ....
No comments:
Post a Comment