देव्हारे माजलेत, देव
आहे, देव नाही अश्या मतमतांतरा च्या गलबलात कधीतरी गीत - गदिमा ,
स्वर-संगीत सुधीर फडके यांच “देव देव्हार्यात नाही” हे गीत ऐकण्यात आलं
आणि मनाला खूप भावलं. गदिमा नी फार सुरेख शब्दात, देवाच्या अस्तित्वाच्या खुणा, ठिकाणं दाखवली आहेत.
कुठे शोधायला पाहिजेत हे ही दर्शवलं आहे. बाबुजींच्या स्वर सुरांनी तर कमाल
केली आहे. असं हे देवाचं ठाव घेणारे गीत राहुल देशपांडेनी अलीकडेच गायलं आहे. ते
युट्यूब उपलब्ध आहे. आपल्या गायकीतून, आलापातून, शब्दातून एक वेगळीच अनुभूती देतात.
नक्कीच आनंद घ्या!
https://www.youtube.com/watch?v=FMyUEXLIPqQ
देव देव्हाऱ्यात नाही
देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी
देव चोरुन नेईल, अशी कोणाची पुण्याई
देव अंतरात नांदे, देव दाही दिशी कोंदे
देव आभाळी सागरी, देव आहे चराचरी
देव शोधूनिया पाही, देव सर्वाभूतां ठायी
देव मूर्तीत ना मावे, तीर्थक्षेत्रात ना दावे
देव आपणात आहे, शीर झुकवोनिया पाहे
तुझ्या-माझ्या जड देही देव भरूनिया राही
देव स्वये जगन्नाथ, देव अगाध अनंत
देव सगुण, निर्गूण, देव विश्वाचे कारण
काळ येई, काळ जाई, देव आहे तैसा राही
गीत - ग. दि.
माडगूळकर संगीत - सुधीर
फडके स्वर - सुधीर फडके चित्रपट - झाला
महार पंढरीनाथ.