Saturday, 3 August 2024

विचार शक्ती

 




 जेम्स ॲलन हे ब्रिटीश तत्वज्ञानी लेखक होते. त्यांच्या प्रेरणादायी पुस्तकांसाठी आणि कवितांसाठी आणि स्वयं-मदत चळवळीचे प्रणेते म्हणून ओळखले जातात. 1902 मध्ये प्रकाशित झाल्यापासून त्यांचे सर्वोत्कृष्ट पुस्तक  As a Man Thinketh, मोठ्या प्रमाणावर वाचले गेले. ते प्रेरक आणि स्वयं-मदत स्त्रोत आहे. त्यात ते म्हणतात, आपले विचार आपले चारित्र्य आणि कर्तृत्व घडवतात.   

या पुस्तकामधील काही मुद्दे. वाचा पटतात का?  






१. विचारांची शक्ती:  सकारात्मक आणि रचनात्मक विचार केल्याने सकारात्मक परिणाम होतात, तर नकारात्मक विचारांमुळे नकारात्मक परिणाम होतात. आपले विचार बदलून आपण आपले जीवन बदलू शकतो.  

2. मन आणि चारित्र्य: आपले विचार,  आपली मतं , वृत्ती आणि सवयी बनतात. त्यातून आपले चारित्र्य घडते.  शुद्ध आणि सकारात्मक विचारांमुळे एक उदात्त  चारित्र्य निर्माण होते, तर  नकारात्मक किंवा अनैतिक विचारांमुळे सदोष चारित्र्य.

३. परिस्थितीवर विचारांचा प्रभाव:  आपली बाह्य परिस्थिती ही आपल्या अंतर्गत स्थितीचे प्रतिबिंब आहे. आपली मानसिकता बदलून आपण आपल्या जीवनातील परिस्थिती आणि परिस्थितींवर प्रभाव टाकू शकतो. वैयक्तिक वाढ आणि खास करून आत्म-सुधारणा आपल्या विचारांवर प्रभुत्व मिळवण्यापासून सुरू होते.

४. विचार आणि उद्देश: उद्देशपूर्ण विचार हे ध्येय साध्य करण्यासाठी महत्त्वाचे आहे. जीवनात स्पष्ट आणि निश्चित उद्देश असणे  महत्त्वाचे. उद्दिष्टाचा ध्यास आपल्याला अडथळ्यांवर मात करण्यास आणि यश मिळविण्यास सक्षम करतात.

५. विचार आणि उपलब्धी: यश हा शाश्वत, लक्षकेंद्रित विचारांचा थेट परिणाम आहे. यशासाठी विचारातील निष्ठा, सातत्याबरोवर सतत सुधारणा करण्याच्या वृती व चिकाटी आवश्यक. आपल्या विचाराने,आपणच स्वत:ला मर्यादा घालत असतो.

६. दृष्टी आणि आदर्श:  जीवनासाठी उच्च आदर्श आणि स्पष्ट दृष्टी  जोपासावयाला हवी. आपले आदर्श आपल्या कृतींवर प्रभाव पाडतात आणि शेवटी आपल्या वास्तविकतेला आकार देतात. निश्चित दृष्टी दिशादर्शन करते, आणि उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करण्यास, सर्वोच्च क्षमता प्राप्त करण्यास प्रवृत्त करते.

७. शांतता आणि आत्म-नियंत्रण: खरी शांतता आत्म-नियंत्रण आणि स्वतःच्या विचार आणि भावनांवर ताबा मिळवून येते. मन शांत ठेवून, जीवनातील आव्हानांचा हसतमुख आणि शांततेने सामना करू शकतो.

८. जबाबदारी आणि सशक्तीकरण:   जाणीवपूर्वक विचार करून आणि जाणीवपूर्वक कृती करून त्यांचे जीवन बदलण्याची शक्ती व्यक्तींमध्ये असते. हे स्पष्ट सांगतात की जीवनाचे नियंत्रण स्वतःच्या हातात असते.

९. आकर्षणाचा नियम: सकारात्मक विचार सकारात्मक परिणामांना आकर्षित करतात आणि नकारात्मक विचार नकारात्मक विचारांना आकर्षित करतात.

१०. नैतिक सचोटी आणि यश: लेखकाचा असा विश्वास आहे की प्रामाणिकपणा, करुणा आणि चांगले कार्य करण्याची वचनबद्धता पाळणारे जीवन चिरस्थायी पूर्णता आणि समृद्धीकडे नेत आहे.




Tuesday, 30 July 2024

बोलण्याचं तारतम्य

 

"ज्याचा तोंडावर आणि जि‍भेवर ताबा आहे, तो  आपल्या आत्म्याला संकटांपासून वाचवतो"

कधी बोलावं कधी शांत राहावं, 

बघा काही ठोकताळे, इंग्रजी मेसेज चं स्वैर भाषांतर !

.   रागाच्या भरात शांत रहा,  
.   जेव्हा तुमाला वास्तव माहित नसते तेव्हा शांत रहा.
.   जेव्हा एखाद्या गोष्टीची खात्री नसेल तेव्हा शांत रहा.
 .   जर तुमचे शब्द दुबळ्या माणसाला  दुखावणार असतील  तर शांत रहा.
.    ऐकताना   शांत रहा.
६.   गंभीर चर्चेत विनोद करण्याचा मोह होईल तेव्हा शांत रहा.
.   वाईट गोष्टीवर विनोद करून गांभीर्य घालवण्याचा मोह होईल तेव्हा शांत रहा.
 .  शब्दांबद्दल लाज वाटणार असेल तर शांत रहा.
.   तुमचे शब्द चुकीचं मत प्रस्तापित करणार असतील तर शांत रहा.
१०. तुम्हाला देणं घेणं नसेल तेव्हा शांत रहा,
११. असत्य बोलण्याचा मोह होतो तेव्हा शांत रहा.
१२  तुमच्या शब्दांने दुस-याचा प्रतिष्ठेला धक्का पोहोचणार असेल तर शांत रहा.  
१३.  तुमच्या बोलण्याने मैत्रीत वितुष्ठ येणार असेल तर शांत रहा.
१४.   जेव्हा  बोलणं छिद्राद्वेषी असेल तेव्हा शांत रहा. 
१५.   तुम्ही शांतपणे  बोलू शकत नसाल तर शांत रहा.
१६.  आपल्या शब्दांनी , मित्र, परिवार  यांच्या प्रतिमेला धक्का पोहचणार असेल तर शांत रहा.
१७.  जर आपलेच शब्द गिळावे लागणार असतील तर शांत रहा
१८.  तेच तेच परत सांगण्यापेक्षा शांत रहा.
१९.  खोट्याची भलामण करण्याचा मोह होईल तेव्हा शांत रहा.
२०.   जेव्हा तुम्ही काम करणे अपेक्षित आहे तेव्हा काम करा, शांत रहा.

Friday, 12 July 2024

झाडांच्या अबोल विश्वाचं बोलकं दर्शन!

 

The Hidden Life of Trees, Peter Whohlleben,  अनुवाद –झाडांच्या अबोल विश्वाचं बोलकं दर्शन. गुरुदास  नूलकर. 


झाडाचं अद्भुत जीवन आणि आश्चर्यकारक विश्वाचं दर्शन घ्यायचं असेल, कुतूहल असेल तर जागतिक खपाच वरील पुस्तकं तुम्हाला वाचायला हवं. लेखक जर्मनीतील वनरक्षक, वनव्यवस्थापक. आपल्या रोजच्या अनुभवातून विज्ञान आणि झाडांच्या जीवनातील गूढ गोष्टी, त्यांनी सोप्या भाषेत मांडल्या आहेत.  शास्रज्ञ जगदीश चंद्र बोस यांनी खूप वर्ष आधी वनस्पती सजीव असल्याचं जगाला दाखवून दिलं होतं. विज्ञानातील प्रगती आणि मानवाच्या जिज्ञासेमुळे  झाडांच्या विश्वातील वेगवेगळ्या गुपितांचे  आकलन आपल्याला होतं आहे.   मानवी जीवनाशी साधर्म्य दाखवणा-या काही आश्चर्यकारक वस्तुस्थिती आपल्याला दाखवते.


झाडे समाजशील असतात. एकमेकांना मदत करून त्याचं जीवन सुरळीत सुरु असते. जंगलातील झाडे एकमेकांची काळजी घेतात. झाड एकमेकांना जोडून घेण्यासठी वूड वाईड वेब चा वापर करतात, हे जमिनितील्या बुरशीच्या जाळ्या मुळे शक्य होते. झाडे एकमेकांना अन्न पुरवतात, एकमेकांशी संवाद साधतात कारण त्यांना एकमेकांच्या अस्तित्वाची गरज असते.  झाडांच्या सामाजिक गरजा असतात. अबाधित असलेल्या वातावरणात त्यांना वाढू देणे, आपल्याजवळचं ज्ञान आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवता येणं ह्या त्यांच्या सामाजिक गरजा आहेत. आपण जशी मुलांची काळजी घेतो तसचं नाही का? आणि हो आपल्या www वर्ल्ड  वायीड वेब सारखंच वूड वाईड वेब

झाडांची शाळा असं एक  प्रकरण पुस्तकात आहे. पाण्याशिवाय झाड अन्न निर्माण करू शकत नाही. पाण्याचा वापर कसा करायचा हे झाड शिकत असतं, हिवाळ्यात पाण्याचा कमी वापर करते आणि मुळाभोवती पाण्याचा साठा करून ठेवते.  स्वत:च स्वत:ला आधार द्यायला कसं शिकायचं? हा  महत्वाचा धडा झाडांच्या शाळेत शिकवला जातो. झाडं शिकतात, आठवण ठेवतात  हे  लाजळू वरील प्रयोगातून लक्षात आलंय.

झाडांना भावना असतात, त्यांना यातना होतात. आपल्या प्रजातीच्या सदस्याबरोबर ते संभाषण साधतात. स्वत:च्या पाल्यांना ते आधार देतात. गंधाच्या वापरातून संभाषण,मुळाशी असलेल्या बुरशीच्या जाळ्यातून रासायनिक आणि विद्युत लहारीने संदेश पाठवतात. तहान लागली तर हाका देतात, ध्वनी लहारीने हे पाहण्यात आलं आहे.

झाडांना विचार करता येतो का ? त्यांना बुद्धिमत्ता असते का ?   संशोधकांच्या मते, मुळाच्या टोकांशी मेंदू सारखे अवयव असतात. हे संदेश पोहचवण्यात कार्यरत असतात, मुळाच्या वाढीत काही अडथळे आले तर, मुळं झाडाला संदेश पाठवतात अश्या परिस्थितीत मुळाचे टोक वाढीची दिशा बदलते अशा वागणुकीतून झाडाची बुद्धिमत्ता,स्मरणशक्ती दिसून येते अशी चर्चा  शास्रज्ञात चालू आहे.

जंगल म्हणजे पाण्याचा पंप असं म्हटलं जातं. किनारपट्टी जसं आपण आत जातो तसा पाऊस कमी होत जातो. किनारपट्टी पासून अखंड जंगल असेल तर पाऊस होत राहतो. पावसाचा काही भाग झाडांकडून घेतला जातो आणि तो पुन्हा बाष्पीभवन होऊन हवेत सोडला जातो. या वाफेने नवीन ढग बनतात. पाऊस पडतो. या चक्राकार प्रक्रियेतून पाऊस पोचतो. असा पाण्याचा पंप कार्यरत असतो.  .

वृक्षांकडून हवामानाचं नियंत्रण होतं. वनरक्षक म्हणतात जंगल आपल्याला हवा तसा अधिवास तयार करतात. वा-याला शांत करणे जंगलाला  जमतं. पाण्याचं  नियोजन करतात. पावसाळ्यात मुळाभोवती पाणी साठविले जाते. कोरड्या परिस्थितीत त्याचा उपयोग होतो.

झाडांचा जीवनचक्राचा कालावधी आपल्या पेक्षा वेगळा असतो. जगातले सर्वात वयस्कर झाड स्वीडनमध्ये असलेला एक स्प्रूस, हा नऊ हजार पाचशे वर्ष जुना आहे. एवढा मोठा कालखंड त्यांनी पाहिलेला असतो.

आपल्याला पूरक असलेलं, जीवन समृद्ध करणारं समांतर असं वृक्षांच विश्व उभं आहे. ते विश्व अधिक जाणून घेऊ या ! एकमेकांना परस्पर पूरक होऊन जग अधिक सुजलाम सुफलाम करू या!

Friday, 14 June 2024

नेपाळ सहल

 

नेपाळ सहल २१ मे  ते २९ मे  २०२४

२१ मेला मुंबई ते लखनौ  संध्याकाळी लखनौ दर्शन.

लखनौ  नबाबाची  नगरी बडा इमामवाडा अवध प्रांताचे चौथे नवाब, नवाब असफ-उद-दौला यांनी बांधला. यातील भूलभुलैया प्रसिद्ध आहे.


 


           

 

 

 

 

 

अयोध्या नगरी: २२ जानेवारीला भव्य राममंदिरात रामलल्ला विराजमान झाले. २२ मे ला रामलल्ला चे दर्शन घेण्याचा योग आला. दर्शन छान झालं परंतु समाधान नाही झालं. मंदिराचं काम सुरु आहे. पूर्ण होण्यासाठी अजून बराच काळ द्यावा लागणार आहे. आता फक्त बाळ रामराजाचेज दर्शन झाले.  हनुमानगढी , शरयू तीर धावतं दर्शन.  श्री राम दरबार , प्रभू रामचंद्राचे दर्शन घेण्यासाठी परत येण्याचं ठरवून नेपाळ कडे निघालो.

 


  


रामललाची ही मूर्ती 5 वर्षाच्या मुलाच्या रूपात बनवण्यात आली आहे, ज्यामध्ये रामललाचे बालस्वरूप दगडाच्या कमळावर उभे  दाखवण्यात आले आहे. विष्णूचे 10 अवतार, ओम, स्वस्तिक, शंख-चक्र देखील मूर्तीवर आहेत. भगवान श्री राम हे भगवान विष्णूचे अवतार होते. त्यामुळे भगवान विष्णूशी संबंधित या चिन्हांचा समावेश करण्यात आला आहे, ज्यामुळे भगवान श्रीरामाची मूर्ती अधिक भव्य होत आहे. श्री रामाच्या मूर्तीच्या मस्तकावर सूर्य कोरण्यात आला आहे, श्री राम हे सूर्यवंशी होते आणि त्यांचा जन्म दुपारी 12 वाजता झाला, जेव्हा सूर्याची तीव्रता शिखरावर असते. एकाच काळ्या पाषाणापासून बनलेली ही 51 इंचांची  मूर्ती दिव्य आणि अलौकिक आहे. म्हैसूरचे शिल्पकार अरुण योगीराज यांनी ती  तयार केली आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

लुंबिनी : अयोध्या ते लुंबिनी चार पाच तासाचा प्रवास. सुनौली,नेपाळ सीमेवर तपासणी, वाहनाची अदलाबदल, लुंबिनी हॉटेलवर विश्रांती .दुस-या दिवशी २३ मेला बौध्द पोर्णिमा. या पवित्र दिवशी बौध्द जन्मभूमीला भेट देणाच्या विलक्षण योगायोग.

                  


     बौद्धजन्मभूमी,  वृक्षाखाली आनापान क्रिया,  स्वत:शी, बुद्धी शी, बुद्धाशी जोडण्याचा प्रयास.  


        

मायादेवी मंदिरा शेजारीची अशोक स्तंभ आहे. परिसरात बोध्दिसत्वा पुतळा , अखंड ज्योत परिसर , बोटिंग सुविधा. इतर बुद्धिस्त स्तूप जसे जापनीज,चायनीज स्तूप. थायलंड मोनार्ची  इत्यादी सुंदर प्रेक्षणीय स्थळं.

 

बोध्दिसत्वा



             

चायना स्तूप



थायलंड सरकार ने बांधलेली बौद्ध मोनार्ची. नागा पध्दतीचे  बांधकाम.


 

चितवन :  लुंबिनीहून चितवन ला प्रस्थान. रात्री ८.३० ला थारू सांस्कृतिक केंद्रात थारू संस्कृती वर आधारित  कार्यक्रम पहिला आपल्याकडील आदिवासी तारपा नृत्याची आठवण झाली.                 


थारू समाज, एक  मत प्रवाह, उदग्म राजस्थान, चितोडगडच्या लढाई नंतर एक समाज नेपाळ ला आले तो थारू , कही लोकांना हा मतप्रवाह योग्य वाटत नाही. सांस्कृतिक केंद्र. 

 

हत्ती प्रजनन आणि प्रशिक्षण  केंद्र, खोरसोर, चितवन.

पाळीव हत्तीणी, काही पिल्लं आहेत

फक्त हत्तीण पाळली जातात. जंगली हत्ती , हत्तीणी कडे आकर्षित होतात. त्याचं मिलन घडतं,प्रजानन होतं. वाटेतील नदीवरील झुलता  पुल आकर्षण आहे



      

 

              


                            

पोखरा – चितवन वरून पोखरा . संध्याकाळी तालाबारही देवीचं दर्शन, सात एकराच्या तलावाच्या काठी मंदिर. बोटीतून जाऊन दर्शन घेतलं.

                

                                                               बोटीला पायडलिंग करताना सुभाष.

पोखरा सूर्योदय , अल्हादायक , प्रसन्न वातावरण, नुकताच हलका पाऊस येऊन गेलेला, आकाश ढगाळलेलं. तांबडफुटी दिसली. स्पष्ट सूर्यदर्शन झालं नाही. परंतु प्रत्येकाच्या  मनपटलावर सूर्योदय झाला होता.



 


             







शालेय दिवसात सूर्योदयाचा देखावा असाच काही चितारत होतो ना!


विध्यंवासिनी मन्दिर ,पोखरा,गडकी .   भगवती कालीचा अवतार. परीसरात   लक्ष्मीनारायण, सरस्वती, शिव, हनुमान, गणेशाचे  मंदिरे आहेत. विशेष् म्हणजे नवग्रह  आणि अष्टचिरंजिव मंदीर.

 



            

                     

   

       

 

पुम्दिकोत शिव मूर्ती   ५७ फुट स्तुपावर ५१ फुट उंच शिव मूर्ती स्थापित, नेपाळ मधील दुसरी उंच शिव मूर्ती.


             

                               
      

गुप्तेश्वर महादेव गुफा  आणि डेव्हिस धबधबा :  गुफे मध्ये महादेवाचं मंदिर आणि धबधबा आहे. पवित्र वातावरण.

      


             

 

 

 

 



पोखरा ते काठमांडू  मार्गात मनकामना मंदिर, नेपाळ मधील गंडकी प्रांतात ,गोरखा जिल्ह्यातील मनकामना गावात देवी भगवतीचे मंदिर आहे.समुद्रसपाटीपासून 4265  फुट उंचीवर आहे. रोप वे ची सोय उपलब्ध आहे.रोप वे चं बेस स्टेशन 915 फुटावर आहे. इथे बळी देण्याची प्रथा आहे. प्रत्येक अष्टमीला बळी दिला जातो. रोपवेचं बक-याचं भाडे 275 रू इतकं आहे

 

  









काठमांडू :

पशुपतिनाथ मंदिर हे एक नेपाळ देशातील काठमांडू मधील बागमती नदीच्या काठावर वसलेले शिव मंदिर आहे. या मंदिर संकुलाचा इ.स. १९७९ मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला. या दुमजली मंदिराभोवती आणखी अनेक मंदिरे उभारली गेली आहेत. राम मंदिरासह वैष्णव मंदिर परिसर आणि गुह्येश्वरी मंदिराचा समावेश आहे.

पवित्र गर्भगृह, किंवा मुख्य मूर्ती हे चांदीच्या सर्पाने बांधलेले चांदीची योनी आधार असलेले दगडी मुखलिंग आहे. हे शिवलिंग एक मीटर उंच असून त्याला चार दिशांना चार तोंडे आहेत.

धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनण्यापूर्वी नेपाळ हे एक हिंदू राष्ट्र होते. त्याकाळी पशुपति ही नेपाळची राष्ट्रीय देवता तथा आराध्य दैवत होते.


   



 



                                                                                             





दोन्ही फोटो वेब वरून साभार.


बागमती घाट ,                                                      स्मशान घाट


     


 

 







पशुपतीनाथ मंदिर परिसर


 

पशुपतीनाथ दर्शनानंतर बुढा नीलकंठ चे दर्शन घेतलं नीलकंठ नावाच्या शेतक-याचा शेतात  स्वयंभू मूर्ती सापडली त्यावरून बुढा नीलकंठ. शेषशय्या वर विष्णू  पहुडला  आहे. इकडे पुजारी कुमार असतात अशी प्रथाच आहे.


           

मंदिर विष्णूचं नाव बुढा नीलकंठ                                                                          मंदिर परिसरातील  जुने जाणती मंडळी.

बुध्द स्तूप


     

 









स्वयंभूनाथ महाचैतान्य स्तूप.


  


 

 

भक्तपूर दरबार चौक.


डोलेश्वर महादेव मंदिर , केदारनाथाची प्रतिनिधित्व करणारं मंदिर.


 

 

नेपाळ:  नागरी दर्शन.