"ज्याचा तोंडावर आणि जिभेवर ताबा आहे, तो
आपल्या आत्म्याला संकटांपासून
वाचवतो"
कधी बोलावं कधी शांत राहावं,
बघा काही
ठोकताळे, इंग्रजी मेसेज चं स्वैर भाषांतर !
१.
रागाच्या भरात शांत रहा,
२.
जेव्हा तुमाला वास्तव माहित नसते तेव्हा शांत रहा.
३.
जेव्हा एखाद्या गोष्टीची खात्री नसेल तेव्हा
शांत रहा.
४. जर
तुमचे शब्द दुबळ्या माणसाला दुखावणार
असतील तर शांत रहा.
५.
ऐकताना शांत रहा.
६. गंभीर
चर्चेत विनोद करण्याचा मोह होईल तेव्हा शांत रहा.
७.
वाईट गोष्टीवर विनोद करून गांभीर्य घालवण्याचा
मोह होईल तेव्हा शांत रहा.
८. शब्दांबद्दल लाज वाटणार असेल तर शांत रहा.
९.
तुमचे शब्द चुकीचं मत प्रस्तापित करणार असतील तर
शांत रहा.
१०.
तुम्हाला देणं घेणं नसेल तेव्हा शांत रहा,
११.
असत्य बोलण्याचा मोह होतो तेव्हा शांत रहा.
१२ तुमच्या शब्दांने दुस-याचा प्रतिष्ठेला धक्का
पोहोचणार असेल तर शांत रहा.
१३.
तुमच्या
बोलण्याने मैत्रीत वितुष्ठ येणार असेल तर शांत रहा.
१४.
जेव्हा बोलणं छिद्राद्वेषी असेल तेव्हा शांत रहा.
१५.
तुम्ही शांतपणे बोलू शकत नसाल तर शांत रहा.
१६.
आपल्या शब्दांनी ,
मित्र,
परिवार यांच्या प्रतिमेला धक्का पोहचणार
असेल तर शांत रहा.
१७.
जर आपलेच
शब्द गिळावे लागणार असतील तर शांत रहा
१८.
तेच तेच
परत सांगण्यापेक्षा शांत रहा.
१९.
खोट्याची भलामण करण्याचा मोह होईल तेव्हा शांत रहा.
२०.
जेव्हा तुम्ही काम करणे अपेक्षित आहे तेव्हा काम
करा, शांत रहा.
No comments:
Post a Comment