"स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर
सावरकर" हे खऱ्या अर्थाने बहुआयामी व्यक्तिमत्व. प्रखर
देशभक्त, क्रांतिकारक, स्वातंत्र्य सैनिक, राजकारणी, थोर मराठी साहित्यिक, हिंदुत्ववादी , भाषाशुद्धी आणि लिपी शुद्धी चळवळींचे प्रणेते एक ना अनेक
असे कितीतरी पैलू त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आहेत.. शतपैलू सावरकर.
स्वातंत्र्याचा पुजारी,
विज्ञाननिष्ठ विचारधारा, जे जे उत्कृष्ट ,उद्दात याचा स्वीकार करणारे. वकिली
शिक्षणामुळे ब्रिटिशा विरुद्ध त्यांनी दिलेल्या सवलतीच्या आधारेच त्यांच्याशी लढणारे सावरकर.
आजच्या वैचारिक विरोधकांना कळलेच नाहीत. अपुऱ्या अभ्यासावर,
सत्याचा शोध न घेता. सावरकरांना वेगवेगळी
दुषणे दिली गेली. इंग्रज दरबारी माफी मागणारे, भत्त्या साठी विनंत्या अर्ज करणारे.
रणदीप हुडा यांनी तीन तासाच्या चरित्रपटात बहुसंख्य
आक्षेपांना सडेतोड उत्तरं दिली आहेत. सावरकरांचं जीवन म्हणजे धगधगते यज्ञकुंडचं.
वीर सावरकरांनी कुमारवयातच घरातल्या अष्टभुजादेवीसमोर "देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी मी मारीता मारीता मरतो झुंजेन " अशी घेतलेली शपथ शिवाजी महाराजाच्या रोहिडेश्वराच्या शपथेची आठवण करून देते. आणि त्यांच्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रचंड प्रभावाची साक्ष देते.
फर्ग्युसन कॉलेज पासूनच संघटन कौशल्य दिसून
येते. विदेशी कपड्याची होळी , लोकमान्य टिळकांचा आशीर्वाद ,अभिनव भारत ची स्थापना,
क्रांतिकारकांचे सक्रीय जाळे. योग्य वेळी निर्णय घेण्याची क्षमता दिसून येतात.
वेगाने सरकणा-या चित्रपटात सावरकरांच्या जीवनातील
बहुसंख्य घटना, व्यक्तिमत्त्वातील खुबी परिणामकारक रित्या दाखवण्यात आल्या आहेत.
इतिहासकार, कवी, जात पात न मानणारा समाजसुधारक, संस्कृती आणि सभ्यता यातील फरक
समजावून सांगणारा, हिदुत्त्वाची व्याख्या करणारा द्रष्टा. अनेक गोष्टी छोट्या
छोट्या प्रसंगांनी दाखवल्या आहेत.
महात्मा गांधी आणि सावरकर मधील वैचारिक भिन्नता स्पष्टपणे
चित्रित केली आहे. रत्नागिरीतील गांधी भेट सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वातील प्रखरता
दाखवते. गांधीजी निरोप घेताना युमुनाबाईना
सांगतात , तुम्ही आयुष्यभर यांच्या बरोबर काढले आहे. मला अर्धातास काढता आला नाही. तुम्हाला
नमस्कार.
त्याच प्रमाणे नेताजीची भेट , शहीद भगतसिंग
यांच्याशी गळाभेट. १८५७ च्या स्वातंत्र्य लढा या पुस्तकाचे भगतसिंग यांनी केलेले
इंग्रजी भाषांतर याचा उलेख.
"ने मजसी ने परत मातृभूमीला.."हे
सावरकरांचे अतिशय गाजलेले गीत.. खूप परिणाम साधून जाते. तळमळ खरोखर जाणवते.
सावरकरांची त्रिखंडात गाजलेली मार्शलिस बंदरातील
ऐतिहासिक उडी, पुढे युरोपातील देशांमध्ये त्या घटनेचे उठलेले
पडसाद.. इत्यादी घटना ठळक पणे मांडण्यात
आल्या आहेत.
प्लेगच्या साथीतील ब्रीटीशांचे अनन्वित
अत्याचार, अंगावर काटा आणणारी अंदमानातील
स्थिती. अंदमानात काळ्या पाण्याच्या शिक्षेदरम्यान अहोरात्र कोलू ओढणं, दंडबेडी , अत्यंत निकृष्ट अन्न, प्रसंगी शौचालयासाठी सुद्धा कोठडीचे दरवाजे न उघडणे.. एखाद्याने मरण यातना
तरी किती भोगाव्या .. डोळ्यात पाणी येतं.
रणदीप हुड्डा ने खूप अभ्यास करून सावरकरांचं
व्यक्तिमत्व खरोखर जगल्याची जाणीव देहयष्टीत केलेले बदल, दातातील फरक ठळक पणे
जाणवतात.
अश्या विपरीत स्थितीत महाकाव्य लिहिणारे सावरकर
आपल्याला दिसतात. प्रसंगी मोठ्या इंग्रज अधिका-यांना आपली बाजू कशी न्यायाची आहे
हे पटवून निरुत्तर करणारे बाणेदार
बुद्धिमान सावरकर पाहायला मिळतात.
होणाऱ्या
पत्नीला आपल्या आयुष्याचे ध्येय सांगून, तिची मान्यता
मिळाल्यावरच विवाहाला होकार देणे.. हा
प्रसंग सावरकरा विषयी आदर द्विगुणीत करतं.
ध्येय गाठण्याचा दृढ निश्चय आणि भूमिका स्पष्टपणे मांडून सहमती मिळवून
सहभागी करणे.
रणदीप हुड्डा यांचे मनपूर्वक अभिनंदन , खूप खूप
आभार.
एका वाक्यात काय सांगता येईल तर प्रत्यक्ष
चित्रपट अनुभवा. आनंद देईल.