Tuesday, 30 July 2024

बोलण्याचं तारतम्य

 

"ज्याचा तोंडावर आणि जि‍भेवर ताबा आहे, तो  आपल्या आत्म्याला संकटांपासून वाचवतो"

कधी बोलावं कधी शांत राहावं, 

बघा काही ठोकताळे, इंग्रजी मेसेज चं स्वैर भाषांतर !

.   रागाच्या भरात शांत रहा,  
.   जेव्हा तुमाला वास्तव माहित नसते तेव्हा शांत रहा.
.   जेव्हा एखाद्या गोष्टीची खात्री नसेल तेव्हा शांत रहा.
 .   जर तुमचे शब्द दुबळ्या माणसाला  दुखावणार असतील  तर शांत रहा.
.    ऐकताना   शांत रहा.
६.   गंभीर चर्चेत विनोद करण्याचा मोह होईल तेव्हा शांत रहा.
.   वाईट गोष्टीवर विनोद करून गांभीर्य घालवण्याचा मोह होईल तेव्हा शांत रहा.
 .  शब्दांबद्दल लाज वाटणार असेल तर शांत रहा.
.   तुमचे शब्द चुकीचं मत प्रस्तापित करणार असतील तर शांत रहा.
१०. तुम्हाला देणं घेणं नसेल तेव्हा शांत रहा,
११. असत्य बोलण्याचा मोह होतो तेव्हा शांत रहा.
१२  तुमच्या शब्दांने दुस-याचा प्रतिष्ठेला धक्का पोहोचणार असेल तर शांत रहा.  
१३.  तुमच्या बोलण्याने मैत्रीत वितुष्ठ येणार असेल तर शांत रहा.
१४.   जेव्हा  बोलणं छिद्राद्वेषी असेल तेव्हा शांत रहा. 
१५.   तुम्ही शांतपणे  बोलू शकत नसाल तर शांत रहा.
१६.  आपल्या शब्दांनी , मित्र, परिवार  यांच्या प्रतिमेला धक्का पोहचणार असेल तर शांत रहा.
१७.  जर आपलेच शब्द गिळावे लागणार असतील तर शांत रहा
१८.  तेच तेच परत सांगण्यापेक्षा शांत रहा.
१९.  खोट्याची भलामण करण्याचा मोह होईल तेव्हा शांत रहा.
२०.   जेव्हा तुम्ही काम करणे अपेक्षित आहे तेव्हा काम करा, शांत रहा.

Friday, 12 July 2024

झाडांच्या अबोल विश्वाचं बोलकं दर्शन!

 

The Hidden Life of Trees, Peter Whohlleben,  अनुवाद –झाडांच्या अबोल विश्वाचं बोलकं दर्शन. गुरुदास  नूलकर. 


झाडाचं अद्भुत जीवन आणि आश्चर्यकारक विश्वाचं दर्शन घ्यायचं असेल, कुतूहल असेल तर जागतिक खपाच वरील पुस्तकं तुम्हाला वाचायला हवं. लेखक जर्मनीतील वनरक्षक, वनव्यवस्थापक. आपल्या रोजच्या अनुभवातून विज्ञान आणि झाडांच्या जीवनातील गूढ गोष्टी, त्यांनी सोप्या भाषेत मांडल्या आहेत.  शास्रज्ञ जगदीश चंद्र बोस यांनी खूप वर्ष आधी वनस्पती सजीव असल्याचं जगाला दाखवून दिलं होतं. विज्ञानातील प्रगती आणि मानवाच्या जिज्ञासेमुळे  झाडांच्या विश्वातील वेगवेगळ्या गुपितांचे  आकलन आपल्याला होतं आहे.   मानवी जीवनाशी साधर्म्य दाखवणा-या काही आश्चर्यकारक वस्तुस्थिती आपल्याला दाखवते.


झाडे समाजशील असतात. एकमेकांना मदत करून त्याचं जीवन सुरळीत सुरु असते. जंगलातील झाडे एकमेकांची काळजी घेतात. झाड एकमेकांना जोडून घेण्यासठी वूड वाईड वेब चा वापर करतात, हे जमिनितील्या बुरशीच्या जाळ्या मुळे शक्य होते. झाडे एकमेकांना अन्न पुरवतात, एकमेकांशी संवाद साधतात कारण त्यांना एकमेकांच्या अस्तित्वाची गरज असते.  झाडांच्या सामाजिक गरजा असतात. अबाधित असलेल्या वातावरणात त्यांना वाढू देणे, आपल्याजवळचं ज्ञान आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवता येणं ह्या त्यांच्या सामाजिक गरजा आहेत. आपण जशी मुलांची काळजी घेतो तसचं नाही का? आणि हो आपल्या www वर्ल्ड  वायीड वेब सारखंच वूड वाईड वेब

झाडांची शाळा असं एक  प्रकरण पुस्तकात आहे. पाण्याशिवाय झाड अन्न निर्माण करू शकत नाही. पाण्याचा वापर कसा करायचा हे झाड शिकत असतं, हिवाळ्यात पाण्याचा कमी वापर करते आणि मुळाभोवती पाण्याचा साठा करून ठेवते.  स्वत:च स्वत:ला आधार द्यायला कसं शिकायचं? हा  महत्वाचा धडा झाडांच्या शाळेत शिकवला जातो. झाडं शिकतात, आठवण ठेवतात  हे  लाजळू वरील प्रयोगातून लक्षात आलंय.

झाडांना भावना असतात, त्यांना यातना होतात. आपल्या प्रजातीच्या सदस्याबरोबर ते संभाषण साधतात. स्वत:च्या पाल्यांना ते आधार देतात. गंधाच्या वापरातून संभाषण,मुळाशी असलेल्या बुरशीच्या जाळ्यातून रासायनिक आणि विद्युत लहारीने संदेश पाठवतात. तहान लागली तर हाका देतात, ध्वनी लहारीने हे पाहण्यात आलं आहे.

झाडांना विचार करता येतो का ? त्यांना बुद्धिमत्ता असते का ?   संशोधकांच्या मते, मुळाच्या टोकांशी मेंदू सारखे अवयव असतात. हे संदेश पोहचवण्यात कार्यरत असतात, मुळाच्या वाढीत काही अडथळे आले तर, मुळं झाडाला संदेश पाठवतात अश्या परिस्थितीत मुळाचे टोक वाढीची दिशा बदलते अशा वागणुकीतून झाडाची बुद्धिमत्ता,स्मरणशक्ती दिसून येते अशी चर्चा  शास्रज्ञात चालू आहे.

जंगल म्हणजे पाण्याचा पंप असं म्हटलं जातं. किनारपट्टी जसं आपण आत जातो तसा पाऊस कमी होत जातो. किनारपट्टी पासून अखंड जंगल असेल तर पाऊस होत राहतो. पावसाचा काही भाग झाडांकडून घेतला जातो आणि तो पुन्हा बाष्पीभवन होऊन हवेत सोडला जातो. या वाफेने नवीन ढग बनतात. पाऊस पडतो. या चक्राकार प्रक्रियेतून पाऊस पोचतो. असा पाण्याचा पंप कार्यरत असतो.  .

वृक्षांकडून हवामानाचं नियंत्रण होतं. वनरक्षक म्हणतात जंगल आपल्याला हवा तसा अधिवास तयार करतात. वा-याला शांत करणे जंगलाला  जमतं. पाण्याचं  नियोजन करतात. पावसाळ्यात मुळाभोवती पाणी साठविले जाते. कोरड्या परिस्थितीत त्याचा उपयोग होतो.

झाडांचा जीवनचक्राचा कालावधी आपल्या पेक्षा वेगळा असतो. जगातले सर्वात वयस्कर झाड स्वीडनमध्ये असलेला एक स्प्रूस, हा नऊ हजार पाचशे वर्ष जुना आहे. एवढा मोठा कालखंड त्यांनी पाहिलेला असतो.

आपल्याला पूरक असलेलं, जीवन समृद्ध करणारं समांतर असं वृक्षांच विश्व उभं आहे. ते विश्व अधिक जाणून घेऊ या ! एकमेकांना परस्पर पूरक होऊन जग अधिक सुजलाम सुफलाम करू या!