प्रयागराज महाकुंभची
चर्चा जोर शोर मध्ये सुरू होती. भारतीय संस्कृतीत, अध्यात्मात कुंभ,
कुंभमेळा हि परंपरा काय आहे, इतिहास काय आहे.
भारतीय
संस्कृतीत कुंभ/ कलश ला पवित्र मानतात.
कुंभ चा एक संदर्भ “अमृतकुंभ”. सूर- असुर,
देव- दानव यांच्यात समुद्र मंथन झालं त्यात चौदा रत्न प्राप्त झाली. त्यातील एक
रत्न “अमृत”. अमृताविषयी एक धारणा अशी की अमृत प्राशन केल्याने अमर होतो. अमृत जर
दानवाच्या हाती लागलं तर दानव,असुर अमर होतील म्हणून देवांनी अमृतकुंभ पळवला.
दानवांनी पाठलाग केला. त्या दरम्यान भरतखंडात चार ठिकाणी अमृत थेंब पडले. प्रयाग, हरिद्वार, उज्जैन, नाशिक- त्र्यंबकेश्वर.
नदी, पाणी म्हणजे जीवन.
या चार नगरातील
प्रयाग – गंगा, यमुना व अदृष्य स्वरुपात असलेल्या सरस्वती या नदयांचा त्रिवेणी संगम.
हरिद्वार – गंगा तीरी
उज्जैन – क्षिप्रा
तीरावर
नाशिक – त्र्यंबकेश्वर गोदावरी
नदीकाठी.
नदीच्या किनारी
संस्कृती फुलली बहरली. विशिष्ट अक्षांशावर नद्यांच्या संगमावर स्नान करण्याचं
शास्त्र विकसित झालं.
शाही स्नान म्हणजे एकाद्या विशिष्ट मुहूर्तावर
तीर्थक्षेत्र स्थानी जाऊन तेथील नदीमध्ये स्नान करणे, सूर्याला अर्घ्य देणे, नदीची
पूजा करणे जीवन आणि आपल्या भोवतालाच्या शक्ती कश्या
कार्य करतात आणि आपण त्याचा कसा उपयोग करू शकतो याच्या निरीक्षणातून,
खगोलशास्त्रीय अभ्यासातून नक्षत्र,सूर्य , चंद्र, गुरु ग्रहस्थिती वर मुहूर्त ठरले गेले.
कुंभमेळे
विशिष्ट
ग्रहस्थितीला अनुसरून भरत असतात. खगोलशास्त्रीय दृष्ट्या अवकाशात भ्रमण करणारे
ग्रहतारे यांची विशिष्ट युती होत असते.
वेंदा मध्ये सुर्याला आत्मारुपी अथवा जिवनदायी मानले जाते चंद्रला मनाचा राजा
मानले आहे. गुरु/बहस्पती ग्रहाला देवांचा गुरु मानले जाते. अवकाशात भ्रमण करण्याचा
प्रत्येक ग्रहाचा ठराविक काळ लागतो. गुरु
ग्रहाला बारा राशीमध्ये भ्रमण करण्यासाठी 12 वर्ष लागतात.
कुंभमेळा गुरु ग्रहाच्या विविध राशीमधील
प्रवेशा नुसार चार ठिकाणी दर 12 वर्षांनी संपन्न होतो.
प्रयाग
कुंभ
जेव्हा
गुरु मेष वर्तुळात असतो आणि सूर्य आणि चंद्र मकर राशीत असतात तेव्हा प्रयाग येथे
चंद्र संयोगाच्या दिवशी (अमावस्या) कुंभमेळा भरतो.
हरिद्वार
कुंभ
चैत्र
(मार्च-एप्रिल) महिन्यात जेव्हा गुरु कुंभ राशीत असतो आणि सूर्य मेष राशीत असतो
तेव्हा हरिद्वार येथे कुंभमेळा साजरा केला जातो.
उज्जैन
कुंभ
जेव्हा
बृहस्पति (गुरू) सिंह राशीत असतो आणि सूर्य वृश्चिक (वृश्चिक राशीत) असतो किंवा
तिन्ही वैशाख (एप्रिल-मे) महिन्यात तूळ राशीत असतो तेव्हा उज्जैन येथे कुंभमेळा
साजरा केला जातो.
नाशिक
कुंभ
भाद्रपद
(ऑगस्ट-सप्टेंबर) महिन्यात जेव्हा गुरु (गुरु) आणि सूर्य सिंह राशीत असतात तेव्हा
त्र्यंबकेश्वर, नाशिक येथे कुंभमेळा साजरा केला जातो.
कुंभमेळा
नेमका कधी सुरू झाला हे सांगणे कठीण आहे. कृतयुगात जेव्हा दुधाच्या सागराचे मंथन
झाले तेव्हा कुंभमेळा सुरू झाला असे मानले जाते.
काही
विद्वानांच्या मते, मेळा ईसापूर्व ३४६४ मध्ये सुरू झाला, म्हणजे हडप्पा आणि मोहेंजो-दारो संस्कृतीच्या १०००
वर्षांपूर्वीची ही परंपरा आहे.
काहीच्या
मते 2382 ईसापूर्व, विश्वामित्र (दुसरे) यांनी 'माघ पौर्णिमेला' पवित्र स्नान करण्याचे महत्त्व सांगितले. तर इ.स.पूर्व
१३०२ मध्ये, महर्षी ज्योतिषांनी 'माघ
पौर्णिमेला' पवित्र स्नानाचे महत्त्व लोकांवर बिंबवले.
डी.
चिनी प्रवासी ह्युएन त्सांग यांनीही आपल्या पुस्तकात 'कुंभ-मेळ्या'चे
वर्णन केले आहे. इ.स.पूर्व ६२९ मध्ये त्यांनी काढलेल्या प्रवासाचे वर्णन 'भारतयात्रा' असे त्यांच्या पुस्तकात आहे, ज्यामध्ये सम्राट
हर्षवर्धनच्या राज्यात प्रयाग येथे हिंदूंच्या जत्रेचा उल्लेख आहे.
कुंभमेळा प्रकार |
||
मेळा |
कधी |
स्थळ |
माघ मेळा |
दर वर्षी |
प्रयागराज |
अर्ध कुंभमेळा |
सहा वर्षात एकदा |
हरिद्वार , प्रयागराज |
कुंभमेळा |
बारा वर्षात |
हरिद्वार , प्रयागराज, नाशिक, उज्जैन |
महाकुंभ मेळा |
१४४ वर्षानंतर |
प्रयागराज |
या वेळेचा फक्त कुंभ नव्हता तर महाकुंभ होता. १४४ वर्षानंतर
येणारा कुंभ. “पौष अमावस्या” चं शाही स्नान संपन्न झालं. महाकुंभ मधील विशेष
महत्त्वाचं शाही स्नान. या दिवसापासून साधक मंडळी मौन धारण करून कुंभाच्या अखेर
पर्यंत म्हणजे महाशिवरात्री पर्यंत साधना
करतात. म्हणून मौनी अमावस्या म्हणतात. भाविकांचा महासागर अमावस्येचा मुहूर्त
साधण्यासाठी त्रिवेणी संगमावर लोटला होता. सर्वांना संगमाच्या मुख्य घाटावर स्नान
करायचे होतं अप्रिय घटना घडली, सतर्कतेमुळे
मोठी दुर्घटना टळली. या सर्व धांदलीत कुंभ स्नानाची संधी हुकते कि काय अशी
स्थिती. शेवटी माघ पौर्णिमेचा मुहूर्त साधायाचं ठरलं. रविवारी ९ फेब्रुवारी
सकाळी साडेसातला वाघोली येथून प्रस्थान
केलं. पौर्णिमा बारा तारखेला परंतु स्थानिक व्यवस्थापनानी दहा तारखेलाच पोहचायला सांगीतलं.
प्रवास
खुपचं लांबचा, वसई ते प्रयागराज १५००
किलोमीटर अंतर, वेळेत पोहोचायचं उद्दिष्ट ठेवून इगतपुरी- समृद्धी महामार्गावरून
नागपूर- जबलपूर -रीवा – प्रयागराज (सरस्वती
हायटेक सिटी पार्किंग ) असे टप्पे पार करत सोमवारी संध्याकाळी ६ वाजता
मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो. श्रद्धेचं स्नान, आस्था कि डुबकी लावायची तीव्र
इच्छा यामुळेच सलग ३०-३२ तासाचा प्रवास करून ही समान ठेवून लगेचच घाटावर स्नानासाठी
गेलो.
मंगळवारी
सकाळीच सरस्वती घाटावर पोहचलो. कमी गर्दी पाहून अंघोळी केल्या. लोकल भाषेत आस्थाकी
डुबकी लेह ली. एकंदरीत परिसरातील नियोजन आणि व्यवस्था चांगली
होती. पाणी स्वच्छ रोमांचकारी आणि स्पर्श
चैतन्यदायी होता. घाटावर मनाला प्रसन्न करणारं वातावरण होतं. तीन पिढ्याचं तर्पण
करायचं अशी मान्यता आहे. तीन पिढ्याच्या आठवणीने मन सद्गतीत झालं, त्यांच्या आठवणी
मनाला स्पर्शून गेल्या. कृतज्ञता दाटून आली.
एकाच मेळ्यात तीन मेळ्याचा योग साधला गेला.
माघ मेळा: दर वर्षी माघ पोर्णिमेस प्रयागराज येथे मेळा भरतो.
कुंभमेळा: दर बारा वर्षानी गुरू
मेष राशीत, सुर्य,चंद्र मकर राशीत असतात तेव्हा प्रयागराज, त्रिवेणी संगम येथे
कुंभ. या वेळी ही दशा पौष पोर्णिमा ते महाशिवरात्र. (13जानेवरी ते 26 फेब्रुवारी
2025 पर्यंत)
महाकुंभ: जेव्हा 12 वर्षाच्या कुंभमेळ्याचे चक्र 12 वेळा येते
तेव्हा 12 व्या कुंभमेळ्याला महाकुंभ म्हणतात. या वर्षी हा योग आहे.
असे हे तीन योग साधले गेले.
त्रिवेणी संगम-
त्रिवेणी योग.
महाकुंभ स्नान, सुफळ संपूर्ण.
पवित्र,पूजनीय गंगा मैया,जमुना मैया और सरस्वती
मैया की जय हो.
परतीच्या प्रवासात जबलपूर येथील ग्वरीघाट येथे नर्मदामैयाच्या आरतीत सहभागी होता आले.
नर्मदे हर हर!
खुप छान माहितीपुर्ण लेख.
ReplyDeleteज्यामध्ये सुरुवातीपासूनचे प्रवासवर्णन आहे. मला आनंद आहे की, मीसुद्धा या अमृतस्नानात सहभागी होतो.