फेसबुक
पाहत होतो. केंद्रीय मंत्री किरण रिजूजीची एक पोस्ट आहे. त्यात धुंध चित्रपटातील संगीतकार रवि , गीतकार साहिर
लुधियानवी यांची “इक धुँद से आना है इक धुँद में जाना है “ ही गजल म्हटली
आहे. (जिंदगिका सफर ए कैसा सफर) याची आठवण करून देणारी.
ही
संपूर्ण ग़ज़ल मानवाच्या अस्तित्वातील अनिश्चितता, क्षणिकता आणि
जीवनाच्या तात्त्विक रहस्यांवर भाष्य करते.
संसार
की हर शय का इतना ही फ़साना है
इक
धुँद से आना है इक धुँद में जाना है
ये राज़ कोई राही समझा है न जाना है
इक पल के झपकने तक हर खेल सुहाना है
या जगातील
प्रत्येक वस्तू, प्रत्येक जीव — याचं इतकंच सार आहे,
अस्पष्ट धूसरतेतून (अज्ञानातून) जन्म घेणं, आणि
परत त्याच धूसरतेत (अनिश्चिततेत) विलीन होणं.
ही वाट नेमकी कुठून सुरू
होते, कुठपर्यन्त संपते,
हे आजवर कोणत्याही प्रवाशाला समजले नाही, कळलेले नाही.
ही
संपूर्ण दुनिया एका क्षणाच्या पापणीवर थांबलेली आहे,
पापणी मिटेपर्यंत या जगातील प्रत्येक खेळ, आनंददायी
आहे.
या
जीवनाच्या वळणांवर कोणावर काय संकट, काय घटना ओढवेल, हे कुणालाही माहीत
नाही.
प्रत्येक वळण एक नवीन बहाणा, एक नवीन चाचणी
घेऊन उभं राहतं.
आपण सारे
फक्त खेळणं आहोत,एका अशा मोठ्या "खेळाडू"च्या हाती (नियती, काळ, परमेश्वर),
ज्याला अजून शतकानुशतके हा खेळ, सृष्टीचा, जीवनाचा
— चालू ठेवायचा आहे.
https://youtu.be/s_5QU8YouSs?si=9AbGL5z6WAvmN31B