आयुर्वेदानुसार स्वस्थ असणे म्हणजे काय?
समदोषः समाग्निश्च समधातु-मलक्रियः । प्रसन्नात्मेन्द्रिय-मनः
स्वस्थ इत्यभिधीयते ॥ सुश्रुतसंहिता (सूत्रस्थान 15.41)
ज्याच्या त्रीदोष, अग्नि,
धातू आणि मलक्रिया संतुलित आहेत, तसेच ज्याचे
आत्मा-इंद्रिये-मन प्रसन्न आहेत, तो मनुष्य “स्वस्थ” मानला
जातो.
समदोषता (Homeostasis): वात-पित्त-कफ
यांचे संतुलन म्हणजे शारीरिक कार्यांची सुसूत्रता.
समाग्नि (Metabolic balance): पचन व रूपांतरण-क्रिया योग्य; अति/मंद अग्नि नसणे. (जठराग्नि, भूताग्नि व धात्वाग्नि-पचन, पंचभुताचे
अंशीकरण, सप्तधातूचे पोषण रूपांतरंण )
समधातु (Tissue integrity): धातूंचे (सप्तधातू -रस, रक्त,
मांस, मेद, अस्थि,
मज्जा, शुक्र) पोषण, निर्माण व क्षय - प्रक्रिया
संतुलित.
मलक्रिया-सम्यकता
(Elimination): मल ((पुरीष, मूत्र, स्वेद) निर्मिती व उत्सर्जन नियमानुसार.
मानसिक-आध्यात्मिक
प्रसन्नता: केवळ रोगाभाव नव्हे; शरीर + मन + आत्म यांचे सम्यक स्वास्थ्य.
दिनचर्या, ऋतुचर्या,
आहारचर्या दिनचर्या कशी असावी आणि ऋतु प्रमाणे आपला आहार कसा
असावा या विषयी मार्गदर्शक तत्त्वे.
ब्रह्ममुहूर्ते उत्तिष्ठेत् स्वस्थो रक्षार्थमायुषः। दन्तधावनं तु
कर्तव्यं कषायकटुतिक्तकैः।
अभ्यङ्गं आचरेन्नित्यं स जराश्रमवातहः। अर्धशक्त्या
तु व्यायामः।
आयुष्याचे रक्षण करण्यासाठी निरोगी मनुष्याने ब्रह्ममुहूर्ताला
उठावे. कडू-तिखट-कषाय द्रव्यांनी दात स्वच्छ करावेत. दररोज तेलाने अभ्यंग करावा;
तो वार्धक्य, थकवा व वात कमी करतो. आपल्या
शक्तीच्या अर्ध्या मर्यादेपर्यंत व्यायाम करावा.
हेमन्तशिशिरौ
शीतौ, वसन्तो ग्रीष्म एव च।
सहा ऋतू — हेमंत, शिशिर, वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद.
“तत्रानुसारतः
कुर्यात् आहारविहारविनियमम्।”
प्रत्येक
ऋतूनुसार आहार-विहार बदलावा.
ऋतु प्रमाणे काय खावे याचे संक्षिप्त
नियम “निसर्ग जसा बदलतो,
तसा आहार-विहार बदला.”
उष्णतेत शीतलता, थंडीत उष्णता, दमटपणात हलकेपणा, कोरडेपणात स्निग्धता. विरुद्धगुणांनी दोष संतुलित करणे हेच ऋतुचर्येचे तत्त्व.
( ऋतु , मराठी,इंग्रजी महीने , शरीरात होणारे
दोष , आहाराची घ्यायची काळजी .)
वसंत: चैत्र–वैशाख, Mar–May - कफ प्रकोप → लघु, रुक्ष, कडू-तिक्त-कषाय; उद्वर्तन, व्यायाम वाढवा.
ग्रीष्म: ज्येष्ठ–आषाढ, May–Jul अग्नि मंद, वात संचय → शीतल, द्रव, मधुर; श्रम कमी, दिवा-निद्रा अल्प.
वर्षा: श्रावण–भाद्रपद , Jul–Sep अग्नि दुर्बल → लघु, उष्ण, आंबट-लवण; उकळलेले पाणी, स्वच्छता.
शरद: आश्विन–कार्तिक, Sep–Nov पित्त प्रकोप → तिक्त, मधुर, शीतल; सूर्यताप टाळा.
शीत
ऋतु हेमंत:
मार्गशीर्ष–पौष, Nov–Jan
अग्नि तीव्र → गुरु, स्निग्ध, उष्ण आहार; अभ्यंग, व्यायाम.
शीत
ऋतु शिशिर: माघ–फाल्गुन, Jan–Mar
अग्नि तीव्र → गुरु, स्निग्ध, उष्ण आहार; अभ्यंग, व्यायाम.
आहाराविषयी आयुर्वेद काय म्हणतो आहे. इकडे
मात्रा म्हणजे प्रमाण.
मात्राशी स्यात्। उष्णं स्निग्धं
मात्रावद् जीर्णे वीर्याविरुद्धम्। अजीर्णे भोजनं विषम्।
योग्य प्रमाणात आहार घ्यावा. मात्रा-नियमन: अर्धपेट
अन्न, चतुर्थांश जल, चतुर्थांश रिक्त.
उष्ण, स्निग्ध, योग्य प्रमाणात,
आधीचे अन्न पचल्यावर व विरुद्ध गुण नसलेले अन्न घ्यावे.
अपचनावर
भोजन करणे म्हणजे विषासमान.