Friday, 8 July 2011

वृक्षांचा वाढदिवस



शंकराचार्य मंदिर परिसर, निर्मळ 
 
रविवार दिनांक ३/७/२०११ रोजी संजीवनी परिवारा तर्फे वृक्षांचा सहावा वाढदिवस साजरा करण्यात आला.
हो वृक्षांचा वाढदिवस
ह्या कार्यक्रमासाठी प्रसिध्द लेखिका सौ.  वीणाताई  गवाणकर  व् प्रो  मुरलीधर सायनेकरसर उपस्थित होते
वृक्षरोपण व् संवर्धन प्रकल्पाची सुरुवात   ३/७/२००५ साली श्री सायनेकर  सरांच्या प्रेरणेनी झाली. वसईतील निर्मळ येथील श्रीमत शंकराचार्य मंदिर परिसरात १०५ झाडे लावण्यात आली. कदम्ब ,बकुल ,कडुलिंब ,देवदार ,करू , सप्तपर्णी , सोनचाफा , कांचन , बहावा, पारिजात ,गुलमोहर,औदुंबर (उंबर)   इत्यादी  झाडांचा अंतर्भाव आहे.

Ghost Tree

जवळच्या हिरा डोंगरी वरून करू (Ghost tree) ची तीन रोप आणली होती. त्यामधील दोन रोप चांगल्या प्रकारे वाढली आहेत. या दोन रोपामधील एक जीव धरेल की नाही अशी शंका होती. संजीवनी टीम ने ठरवले, ही  झाडे रुजल्यास सर्वाना टी पार्टी. पहिल्या पवासानंतर हे रोपटे तरारून वाढले आणि ठरल्या प्रमाणे टी पार्टी झाली. हीच वाढदिवस साजरा करण्याची सुरुवात.
 जुलाई चा पहिला रविवार म्हणजे आपले मित्र  ,फिलोसोफर  व् गाईड असलेल्या वृक्षांचा वाढदिवस

No comments:

Post a Comment