कोकणात पाउसाचे प्रमाण सर्वसाधारणपणे चांगले राहिले आहे पावसाळ्यात होणा-या भरपूर पावसाचे पाणि वाहून जाऊ नये म्हणून आपल्या परिसरात खुप तलाव, तळीं ,बाव्खाले होती. याचाच अर्थ पाणि अडवा पाणि जीरवा हे तंत्र आपल्या कड़े वापरात होते. हळूहळू वाढत्या लोकसंख्येने गावात असलेल्या तळीं बाव्खालाचा बळी घेतला. तळीं, बाव्खाले आक्रसत चालली आहेत वेळीच जागृत होण्याची गरज आहे.
वॉटर मॅनेजमेंट अर्थात जलव्यवस्थापन हे आजचे परवलीचे शब्द.
समर्थनी पाण्याचे महत्व फार पुर्वीच सांगितले आहे
सकळ जिवा चैतन्य। सकळिका समान। त्रेलोक्याचे महिमान। उदकापाशी।।
नदीचे उदक वाहत गेले। तो निरर्थक चालिलें। जरी बांधोनि काढले। नाना तीरीं कालवे।।
उदकाचे देह केवळ । उदकाचेंचि भूमंडळ । चंद्रमंडळ सूर्यमंडळ । उदकाकरितां ॥
नाना मुक्तफळांचें पाणी । नाना रत्नी तळपें पाणी । नाना शस्त्रामधें पाणी । नाना गुणाचें ॥
जे जे बीजीं मिश्रीत जालें । तो तो स्वाद घेऊन उठिलें । उसामधें गोडीस आलें । परम सुंदर ॥
उदक तारक उदक मारक । उदक नाना सौख्यदायेक । पाहातं उदकाचा विवेक । अलोलिक आहे ॥
वसई परिसर परशुरामाची भूमि म्हणून प्रसिद्ध असलेल्या शुर्पारक नगरीचा भाग होता. शुर्पाराकाची भौगोलिक रचना पूर्वेला पर्वतरांगा, पच्शिमेला अरबी समुद्र , उतरेला वैतरणा नदी, दक्षिणेला उल्हास नदी. आपल्या धर्मात तिर्थक्षेत्राला फार महत्त्व आहे. त्यातून तीर्थे (तलाव,सरोवर,कुंडे ) अधिक महत्वाची. शुर्पारक नगरीत एकशेआठ तीर्थे प्रसिद्ध होती.
पूरी पिठाचे पाचवे शंकराचार्य स्वामी विद्यारण्य व् सातवे स्वामी पध्मनाभ यांची समाधी स्थान असलेले निर्मळ
येथील विमल सरोवर व् निर्मल सरोवर तीर्थ.
सोपारा उमराळा येथील चक्रतीर्थ म्हणजे चक्रेश्वर तलाव
बुरुड राज्याचा कोट येथील तलाव
देवकुंड , देव तलाव
दोनतलाव वटार
स्थानिक , या तलावाना सासु सुनेची तळीं (हाउ ओची तळीं) म्हणतात
शंकराचार्य मंदिरा कडून तलावाचे विहंगम दृश्य ,समोर सुलेश्वर मंदिर व् घाट
आजुबाजुची मंडळी आपला कचरा सांडपाणी तलावात सोडत आहेत. तलाव घाण पाण्याची डबकी बनत आहेत.
पुर्वज्यानी धार्मिक दृष्टीकोन स्वीकारुन तलावाना तीर्थ मानून त्यांच पावित्र्य जपले.
आता वैन्ज्ञानिक युगात पर्यावरण पोषक जीवन शैलीने आपले जलसाठे, परिसर प्रदुषण मुक्त ठेवण्याची नितांत गरज आहे.
No comments:
Post a Comment