निर्मळ सरोवराच्या परिसरातील १२ गावात सामवेदी ब्राह्मण वसलेले आहेत. मंदिरात व् राज दरबारात संगीत नृत्य नाट्य कलाकार म्हणून प्रसिद्ध होते. ते गायक व् नायक होत. राज्यानी ह्या लोकाना शंकराचार्य समाधी मंदिरात संगीत सेवेसाठी नियुक्त केले होते. सनई,चौघडा,मृदंग ,भेरी, वीणा ,इत्यादि वादनात पारंगत होते.मंदिरात आरती भजन सेवा सदर करीत. भुवेनेश्वरी देवी आणि विमला देवी त्यांची कुलदैवत. बुद्ध काळी सामवेदी ओरीसातुन स्थलांतरित झाले इ स पूर्व १८२५ मंध्ये या लोकांच वसईत आगमन झाले असे म्हणतात. परंतू लिखित वा सांस्कृतिक पुरावा उपलब्ध नाही.
या समाजात व्यवसाय सबंधीत आडनावे आहेत ती अशी.
काव्य ,नाट्य लेखन व् नाट्य कलाकार म्हणजे नायक पुढे झाले नाईक.
ब्रास किंवा पितळेची संगीत वाद्या वाजवत ते वर्ताकाह पुढे वर्तक झाले , नाटकातील मुख्य पात्र म्हणजे महापात्र पुढे झाले म्हात्रे
मुख्य संगीत दिग्दर्शक जे इतर संगीत कलाकाराना मार्गदर्शन करत ते जोशिह त्याचे नंतर जोशी झाले.
कार्यक्रमाचे निवेदन करणारे वाच्ये तदन्तर वझे झाले,
पट्टे,कपडे पट ,मुकुट ईत्यादी नायकाचे मेकअप करणारे पट्टेलिक नंतर झाले पाटील, तसेच देशमुख हे आडनाव सामवेदी मधे प्रचलित आहे.
ह्या सर्व मंडळीची गोत्रे खालील प्रमाणे
भारद्वाज , कश्यप , अत्री , कौशिक , वशिष्ठ , अंगिरस
राजा प्रताप बिंबाच्या काळी ह्या लोकानी शेती व्यवसाय स्वीकारला , सामवेदी समाजाची मुख्य गांवं उमराले , बोळीज , गास ,कोफरड, भुइगाव , वाघोली , नवाले , वटार , नाला मर्देश , नंदीग्राम
वेद- पुराणे
वेद व्यासमुनिनी वेदांच्या चार शाखा केल्या ऋग्वेद ,सामवेद, यजुर्वेद , अथर्ववेद. व्यासांनी सरस्वती नदीतीरी शम्याप्रास नावाचा आश्रम स्थापिला. यामध्ये मंत्रांच्या संहिता तयार केल्या. वेदराशीतील विशिष्ट ऋचांची क्रमवारी लावून ऋग्वेद निर्मिला. गायनायोग्य ऋचांना सामवेद हे नाव दिले. यज्ञक्रियेचा तपशील यजुर्वेदातून मांडला. अथर्ववेदात गूढविद्या सांगितली. व्यासांकडून पैलऋषी ऋग्वेद शिकले. यजुर्वेदात व्यासशिष्य वैशंपायन निष्णात झाले. सामवेदात जैमिनी तयार झाले. अथर्ववेद सुमन्तु मुनींनी व्यासांपाशी अभ्यासिला.
सामवेदाच्या हजार शाखा होत्या त्यातील कौथुमी, जैमिनीय व् राणायणीय शाखा आज मिलातात. जैमिनीय शाखा कर्नाटक मध्ये , कौथुमीय गुजरात व् मिथिला मंध्ये आणि राणायणीय महाराष्ट्र मध्ये आहेत.
निर्मळ परिसरातील सामवेदी ब्राह्मण ओरीसातुन स्थलांतरित झाले असे एक मत असून दूसरा मत प्रवाह म्हणतो गुजरात मधून. त्यासाठी सामवेदी बोली भाषा व् गुजराथी भाषेतील साम्यस्थळाचा दाखला देतात.
डॉ. अ.व्यं.सावजी, नागपूर आपल्या ‘चित्पावन ब्राह्मणांचा उगम आणि विकास’ या पुस्तकात म्हणतात सोपारा येथे दहा हजार सामवेदी ब्राह्मण होते ते सर्वच्या सर्व समुद्रमार्गे दाभोळला व तेथून चिपळूणला पोचले व तेथे त्यांनी नव्याने वसाहत केली.
ह्या सगळ्या मतमतांतरचा धुन्डोळा घ्यायला हवा. आपल्याला अलेक्स हले ( Alex Haley) सारख्या संशोधक लेखकाची गरज आहे. जो आपले कुळ अणि मूळ शोधेल.
(सामवेब - वेबवर सामवेदी वर उपलब्ध माहिती )
Dhanyavad kamalrji for Kamalahhe blog! Vicharana chalana thenara va apple kul/mul shodhnyacha chanlagch ptrayatna kela aahe.
ReplyDelete