जनहित विवरी !!जनहित विवरी..!! कल्याण करी रामराया ..
तळमळ तळमळ होतची आहे ...
तुझा तूच सावरी ..दयाळा ...!! कल्याण करी रामराया ..
अपराधी जन चुकतची गेले ..
हे जन हाती धरी ..दयाळा ..!! कल्याण करी रामराया ..
कठीण त्यावरी कठीणचि जाले..
आता न दिसे उरी दयाळा.....कल्याण करी रामराया !!
कोठे जावे काय करावे ;
आरंभिली बोहरी ;दयाळा ....कल्याण करी रामराया !!
दास म्हणे आम्ही केले पावलो ..
दयेस नाही सरि...दयाळा ...कल्याण करी रामराया !!
या नमनानी कीर्तनाला सुरवात होत असे. राष्ट्रीय , आंतरराष्ट्रीय राजकारण , राष्ट्रीय प्रश्न या मुद्या वर पूर्वरंग रंगत असे दरम्यान नामस्मरण , नंतर पुर्वारंगला अनुसरून आख्यान. देवाकडे मागणे व आरती असा क्रम पाळला जात असे.
एकाच वेळी दोन दोन आख्यान घेण्याची कल्याणीबुवांची खासियत होती. आक्रमकता , निर्भयपणा हा बुवांचा स्थायीभाव होता. कीर्तन हे लोकशिक्षण , जनजागृतीचे प्रभावी माध्यम. पुढील पिढी वर चांगले संस्कार करण्यासाठी संतसाहित्य , अभंग, भारुड ,कविता , फटके याचं गायन कीर्तनात होत असे. कल्याणीबुवांच पाठांतर अफाट होते. कवी आनंद फंदी चा फटका त्यांच्या खूप आवडीचा होता. कित्येक कीर्तनातून ते गायचे. कसे वागावे ? ,काय पथ्य पाळावी?काय करावे ? काय करू नये? याच वर्णन या काव्यात आहे.
बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको
संसारामधि ऐस आपला, उगाच भटकत फिरू नको
चल सालसपण धरुनि निखालस, खोट्या बोला बोलु नको
अंगि नम्रता सदा असावी, राग कुणावर धरु नको
नास्तिकपणात शिरुन जनांचा बोल आपणा घेउ नको
भलीभलाई कर काही पण अधर्म मार्गी शिरू नको
मायबापावर रुसू नको
तू एकला बसू नको
व्यवहारामधे फसू नको
कधी रिकामा असू नको
परी उलाढली भलत्यासलत्या पोटासाठी करू नको
संसारामधि ऐस आपला, उगाच भटकत फिरू नको
वर्म काढुनी शरमायाला उणे कुणाला बोलु नको
बुडवाया दुसऱ्याचा ठेवा, करुनी हेवा; झटु नको
मी मोठा शहाणा जगामधि गर्वभार हा वाहु नको
एकाहुनि एक चढि जगामधि थोरपणाला मिरवु नको
हिमायतीच्या बळे गरिबगुरिबाला तू गुरकावु नको
दो दिवसांची जाईल सत्ता, अपयश माथा घेउ नको
बहुत कर्जबाजारी होउनी ओज आपुला दवडू नको
स्नेह्यासाठी पदरमोड कर परंतु जामिन राहु नको
विडा पैजंचा उचलु नको
उणि तराजू तोलु नको
गहाण कुणाचे बुडवु नको
असल्यावर भिक मागू नको
नसल्यावर सांगणं कशाला, गाव तुझा; भिड धरु नको
कष्टाची बरि भाजिभाकरी तूपसाखरेची चोरी नको
दिली स्थिती देवानं तीतच मानी सुख, कधि विटु नको
आल्या अतिथ्या मुठभर द्याया मागं पुढती पाहु नको
उगिच निंदा स्तुती कुणाची स्वहितासाठी करू नको
बरी खुशामत शाहण्याचि ही, मूर्खाची ती मैत्रि नको
आता तुज ही गोष्ट सांगतो, सत्कर्मा ओसरू नको
असल्या गाठी धनसंचय कर, सत्कार्यी व्यय हटु नको
सुविचारा कातरु नको
सत्संगत अंतरू नको
द्वैताला अनुसरू नको
हरिभजनविण मरू नको
गावयास अनंत फंदीचे फटके मागे करू नको
सत्किर्तीनं मतीचा डंका वाजे मग शंकाच नको

तरुणांना नियमित सूर्यनमस्कार, दंडबैठका घालण्याचा बुवांचा आग्रह असे. कीर्तनाच्या दरम्यान श्रोत्यांना बोला महाराज असे आव्हान देत व दाद मागत. . देवाकडे मागणे मागताना ते अखंड भारताची कास धरत व कीर्तनाचा उद्देश सांगताना पाकिस्तान नाशार्थम नि शेवट करीत.
No comments:
Post a Comment