गत सातवर्षे, जुलैच्या पहिल्या आठवड्यात संजीवनी वृक्षांचा वाढदिवस साजरा करते आहे. प्रतिकूल परिस्थितीत झाडं आपला वर्धिष्णू गुण जोपासत आहेत. झाडांची उपयुक्तता या दृष्टीने त्यांच्या कडे न पाहता, झाडं आपले खरेखुरे मित्र, मार्गदर्शक आहेत या दृष्टीकोनातून संजीवनी परिवार झाडांचा वाढदिवस साजरा करते, आणि यामुळेच या कार्यक्रमात सहभागी होतो असे प्रतीपातन श्री सायनेकर सरांनी केले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून पर्यावरण शास्रज्ञ श्री प्रकाश जोशी उपस्थित होते. त्यांनी अंटार्टिक मोहिमेतील व समुद्र किनारा सफरीतील अनुभव कथन केले. त्यांतील विद्वान आणि खेडूत यांचा किस्सा दाद घेऊन गेला.विद्वता आणि आंतरिक शहाणपणा याच हा किस्सा . परीभ्रमणात असताना एकदा रेल्वे प्रवासात एक विद्वान गृहस्थ भेटले. त्यांच्या बोलण्यातून, वागण्यातून विद्वता दिसून येत होती, ते पर्यावरण , निसर्ग , वातावरण इत्यादी विषया वर बोलत होते. पुढच्या स्टेशनात एक खेडूत गाडीत चढले. इठ्ठल इठ्ठल म्हणत एका ठिकाणी बसकण मारली. विद्वान गृहस्थ त्याला म्हणाले इकडे बसा आणि इठ्ठल इठ्ठल काय लावलं आहे. विठ्ठल म्हणा.खेडूत म्हणाला मी कुठे काय बोलतोय, तो बोलवून घेतो. विद्वानांनी विचारले काय उधोगधंदा करताय, खेडूत म्हणाला मी कुठे काय करतोय, तो माझ्याकडून शेती करवून घेतो. थोड्या वेळानी विद्वानांनी सिगारेट शिलगावली, झुरके घेत घेत थोटूक टाकण्यासाठी दरवाज्याकडे जाऊ लागले इतक्यात खेडूताने त्याच्या कडे थोटूक मागितले. विद्वान म्हटले थोटूक कश्याला मी सिगारेट देतो कि, खेडूत म्हटला आम्ही माळकरी विडी, सिगारेट ओढत नाही. त्यांनी थोटूक घेतले विझवून टाकले. खाली गवत , माळरान आहेती , जीव जंतू आहेत त्याची काळजी घ्यायला हवी , इठ्ठल इठ्ठल.
|
औदुंबर |
|
औदुंबर |
काही झाडांची वाढ चांगली आहे. मंदिरा समोरील औदुंबरच्या रोपाचे रुपांतर वृक्षात झाले आहे. बालकवींच्या शब्दात बदल करून म्हणता येईल
"देवळाच्या द्वारी उभा असला औदुंबर."
|
आश्रमा समोर खडा पहारा देणारी बकुळफुलाची झाडे
|
|
वीस फुट उंच देवदार व गुलमोहर |
|
गुणकारी कडूनिंब |
|
सिल्वर ओक |
No comments:
Post a Comment