(जगतगुरू शंकराचार्य ७८८-८२० कालडी - केदारनाथ ) |
श्रीमत शंकराचार्य एके ठिकाणी म्हटलंय हे जग नंदनवन आहे .म्हणजेच जग आनंदी,सुखकारक आहे. आपण सर्व आनंद, सुख, समाधान इत्यादीचे शोधक आहोत, परंतु आचार्यांच्या आणि आपल्या दृष्टिकोनातील फारकामुळे आपल्याला जग विपरीत वाटते. आचार्यांच्या पद्धतीने आपले माईडसेट करायला हवेत.
दुर्लभं त्रयमेवैत्तत देवानुग्रह हेतुकम
मनुष्यत्वं मुमुक्षतव महापुरुष संश्रय:
शंकराचार्य सांगतात खूप भाग्याने आपणाला मनुष्यत्व , मुमुक्षत्व (मुक्तीची इच्छा ) व महापुरुषाचा / सज्जनांचा ससंग लाभतो.
आनंदरूपं आत्मानं अज्ञात्वैव पृथगजन:
बहि:-सुखाय यतते न तु कश्चिद विदन बुध:
आत्म्याचे आनंद रूप न जाणताच आपण बाह्य सुखासाठी प्रयत्न करतो आणि सगळ्या बाह्य गोष्टी मिळवून कष्टी होत असतो.
शंकराचार्यांनी, आपल्या भारत भ्रमणात , जेथे कुठे गुणवान लोक भेटतील तिथे चर्चा करून परिवर्तन घडवून आणले त्या साठी हृदय परिवर्तनाची एक प्रक्रिया आचार्यांनी शोधून काढली, मनाला नव्हे तर बुद्धीला आवाहन केले. ते म्हणतात "शास्त्रं ज्ञापक , न तू कारकम' आपल्याला केवळ समजावून सांगण्याचा अधिकार आहे, काही करवून घेण्याचा नाही. आमचे काम आहे लोकांना विचार देणे आणि मग त्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे काम करण्याची मोकळीक देणे. होऊ द्या त्यांच्या डोक्यात कुरुक्षेत्राचे युध्द! लोक विचार करू लागतील. ते मंथन त्यांना स्वस्थ बसू देणार नाही. या मंथनाचा सामना त्यांनी स्वत: करावा, आपण मध्ये पडू नये, हि आहे शांकर-प्रक्रिया.
कबीराचा एक सुंदर दोहा आहे.
तेरा साई तुझमे है तू जाग सके तो जाग
ह्या सगळ्या विचारांनी आपापला साई शोधण्यास मदत होवो, शोधायचा तर आपणच आहे.
(श्री सायनेकर सरांचा अभ्यासवर्ग २४ ते २६ ऑगस्ट २०१२ - आधार गुरुबोध सार-विनोबा )
No comments:
Post a Comment