Thursday, 24 January 2013

आत्मविश्वास व प्रेरणा जागृत करणा-या विध्यार्थिनी

 


प्रेमा जयकुमार

  प्रेमा जयकुमार ---- रिक्षाचालकाची मुलगी सीए परीक्षेत देशात पहिली  .
 जिद्द आणि परिश्रमाची तयारी असली तर यशस्वी होणे फार अवघड नसते. कठीण परिस्थितीवरही सहज मात करता येते, याचा प्रत्यय चार्टर्ड अकाउंटट (सीए) या कठीण मानल्या जाणा-या परीक्षेत देशातून पहिल्या आलेल्या प्रेमा जयकुमार या रिक्षाचालकाच्या मुलीने पुन्हा दिला आहे.
घरची परिस्थिती बेताची असूनही प्रेमाने ७५.८८ टक्के गुण मिळवून हा बहुमान मिळवला. मालाड पूर्वेला असलेल्या एस. बी. खान चाळीत एकाच खोलीच्या घरात ती राहते. सीए प्रवेश परीक्षेतही ती पहिलीच आली होती. नोव्हेंबर २०१२मध्ये इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स इन इंडियाने घेतलेल्या या परीक्षेला देशभरातून ५१ हजार ९०६ विद्यार्थी बसले होते. ही परीक्षा देशातील ३४३ परीक्षा केंद्रांवर झाली होती. 

आपण चाळीत राहतोय याची खंत असली तरी त्याकडे मी कधीही लक्ष दिले नाही. मुंबई विद्यापीठातून बी. कॉम आणि पुढे एम. कॉमची पदवी पूर्ण करताना अनेक शिक्षकांनी मोलाचे मार्गदर्शन केले. सीएच्या परीक्षेसाठी महागड्या क्लासेसला जाता आले नसले, तरी सीए व्हायचेच, हा ध्यास मी घेतला होता. अभ्यास आणि वेळेचे नियोजन केल्यामुळे यशाची खात्री होती. पण देशात टॉपर ठरेन असे वाटले नव्हते. या यशात आई-वडील आणि शिक्षकांचे सर्वात मोठे श्रेय आहे. - प्रेमा जयकुमार




धनश्री तोडकर

धनश्री तोडकर     झोपडीत राहणारी कोल्हापूरची झाली सीए  

पाच बहिणी, एक भाऊ,   आई-वडील अन् घरचे दारिद्र्य अशा दुर्धर स्थितीत मुळाक्षरे गिरविणेही कठीण ठरावे. पण 'शिकून मोठं व्हायचय' हे एकच स्वप्न उराशी बाळगलेल्या कोल्हापूरच्या धनश्री विलास तोडकर या विद्यार्थिनीने स्वप्नपूर्ती केली आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत धनश्री चार्टर्ड अकौटंटची कठीणतम परीक्षा उत्तीर्ण झाली आहे.  कोल्हापुरातील कमला कॉलेजच्या बाजूला असलेल्या झोपडपट्टीमध्ये   तिच्या आजीसमवेत वडील ४० वर्षांपूर्वी  राहायला आले. आठवीपर्यंत शिक्षण झालेले वडील आणि सातवीपर्यंत शिकलेली आई यांचा गरिबीत संसार सुरू असताना एका पाठोपाठ एक सहा मुली जन्मल्या. त्यानंतर एक मुलगा. सुरुवातीची २० वर्षे नोकरी आणि पुढची तितकीच वर्षे चहाचा गाडा चालविणाऱ्या विलास तोडकर यांनी मुलींच्या शिक्षणाकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले. दोन मुली शिक्षिका झाल्या. एक दवाखान्यात स्वागतिका अन् दोघी पदवीधर होऊन संसारात रमलेल्या.
धनश्रीने  मात्र  खूप शिकावे ही पालकांची इच्छा. १२ वीच्या वाणिज्य शाखेत शिकत असताना तिने ती पूर्ण केली. २००४ मध्ये गुणवत्ता यादीत ती १७ वी आली. त्याच दिवशी आताचे गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी तिची भेट घेऊन शिक्षणाचा सर्व खर्च पूर्ण करण्याचा शब्द दिला. आज ती सी. ए. झाली असताना त्यांचा शब्दही खरा ठरला. १२ वी नंतर धनश्रीने सी.ए.व्हायचे ठरविले. कोल्हापुरातील आर. बी. भागवत अँड कंपनी या चार्टर्ड अकौटंट कंपनीत ती शिकत होती. तेथे नोकरी असलेली दीपाली गोरे व नीलेश भालकर यांनी शिकण्यासाठी तिला मदत केली. शिकवणीसाठी जाणाऱ्या प्रा. श्रीमती घेवारी यांनी तिचे मनोधैर्य वाढविले. थोरली बहीण उमा जाधव हिने तिच्यात आत्मविश्वास निर्माण केला.
घरच्या गरिबीमुळे अनेकदा तिला शिक्षण थांबवून नोकरी करण्याची इच्छा होत असे.  सी. ए.  करताना अ‍ॅग्रीगेट सादर करताना तो विषय राहिला की तिला खूपच वाईट वाटायचे. एक विषय राहिल्यामुळे सगळ्या विषयांची परीक्षा पुन्हा देताना नव्याने अभ्यासाचे कष्ट उपसावे लागत असे. मुळातच अभ्यासासाठी घरी जागा नसायची. वडिलांचा चहाचा गाडा असलेल्या डॉ. निगडे हॉस्पिटलमध्ये अभ्यासासाठी जागा उपलब्ध झाली. तिचा पुरेपूर वापर करीत ती सी. ए. चा कठीण असणारा अभ्यास तेथे पूर्ण करीत राहिली. अभ्यासातून वेळ काढून धनश्री आईच्या मदतीसाठी उभी राहात असे. येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर मात करीत ती पुढे शिकत राहिली आणि आज सी.ए.होऊन आयुष्याच्या यशाचे गणित सोडविण्यात ती यशस्वी ठरली आहे.
          सीसा, डीसा यासारखे उच्च शिक्षण घेण्याचा धनश्रीचा मानस आहे.


               दोघींना मनापासून शुभेच्छा !!!

Tuesday, 22 January 2013

१२ जानेवारी युवा दिन

१२ जानेवारीला ,स्वामी विवेकानंद ची सार्ध शती (स+ अर्ध + शती = शतक) म्हणजे दीडशेवी  जयंती. 








स्वामीजीची तरुणावर फार श्रद्धा होती.  तरुणच या  देशाला गतवैभव  मीळवून देतील असा विश्वास होता.


तरुण विध्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून संजीवनी तर्फे निर्मळ विद्यालय, निर्मळ   कृष्णा मोरू देशमुख पाटील विद्यालय ,तुळींज  या शाळांना   व निर्मळ  येथील स्वामी श्रद्धानंद हॉस्पिटलला स्वामी विवेकानंद   प्रतिमा भेट देऊन, स्वामीजींचा  संदेश जागवला  





भरतात सर्व संघटित प्रयत्न एका दोषा मुळे असफल होतात तो दोष हा की काम करण्याची काटेकोर व कड़क पध्दती आपण शिकलो नाही. काम म्हणजे काम, मग तेथे मैत्री किंवा भीड़ उपयोगाची नाही. दूसरी गोष्ट म्हणजे अदम्य उत्साह. कोणतेही काम उपासना म्हणून करा.

Wednesday, 2 January 2013

राजस्थान दर्शन








गरीबरथ    बोरीवली ते जयपूर (२२ सकाळी ७ वाजता )

 जयपूर  दर्शन

   लक्ष्मीनारायण मंदिर : मोती डुंगरी च्या पायथ्याशी सफेद संगमरवरी मंदिर. सुबक लक्ष्मीनारायण मूर्ती व सुंदर  नक्षीकाम  हे वैशिष्ट. परिसर व छान  बाग. गुलाबी  रंगाची  बोगनवेल.   १९८८ मध्ये बिर्ला कुटुंबीयांनी बांधले
 जंतरमंतर   जयपूर:  जंतरमंतर, महाराज जयसिंग यांची आकाशाचा वेध घेणारी   अशी, अभूतपूर्व प्रयोगशाळा. सूर्याच्या सावली  वरून  जयपूर शहराची  वेळ पाहण्याचे   यंत्र     आकाशातील ग्रहस्थिती, राशी ठरवण्याचे यंत्र, ध्रुव पट्टी,अशी अनेक यंत्र. अभ्यासाचा विषय आणि आम्हाला कंटाळा



अमेर पॅलेस : जयपूर शहर वसण्याअगोदरची राजधानी आमेर राजवाडा. राजा मानसिग, मिर्झा राजा जयसिंग आणि सवाई जयसिंग अशा तीन पिढ्यांनी दोन शतके हे  बांधकाम केले असे सांगतात. मावठा सरोवरातील शांत पाणी, राजवाडा पाहण्यासाठी कठीण चढाचा रस्ता चढावा लागतो.  येथेच असलेली राजघराण्याची  कुलदेवता प्राणप्रतिष्ठा करून तिची स्थापना करण्यात आली आहे . उद्यान राजवाडा आरसे, जडाव काम महाराणी छत्री, राजांची स्मारके,


सिटी पॅलेस :  हे येथल्या अनेक आकर्षणातील एक. जुन्या शहराच्या मध्यभागी असलेला हा राजवाडा   राजस्थानी  आणि   मुघल शैलीचा उत्तम नमुना आहे. भुर्‍या   पांढर्‍या  संगमरवरी स्तंभावर असलेल्या कोरीव कमानी, सोनेरी रंगीत खड्यांच्या फुलांच्या नक्षीकामाने जविलेल्या आहेत. दि पॅलेस येथील   संग्रहालयात आहेत  राजांचे पेहराव, मुगल व रजपूत राजांची शस्त्रास्त्रे, तलवारी, रत्नजडीत सुंदर  म्याने, कलादालनात आहेत पेंटिग्ज, गालिचे,   राजांच्या वापरातल्या वस्तू, साडेपाच किलोची तलवार

 हवा महाल         हवामहल हे येथील आणखी एक आकर्षण. पाच मजली ही गुलाबी रंगाच्या दगडात बांधली गेलेली वास्तू जाळीच्या वाळूच्या खिडक्यांनी अधिक सुंदर बनली आहे.राजघराण्यातील स्त्रियांना शहरातील चहलपहल, मिरवणुका पाहता याव्यात म्हणून ही वास्तू बांधली गेल्याचे सांगतात.

पिंक सिटी        १८७६ मध्ये तत्कालीन महाराज सवाई मानसिंग यांनी इंग्लंडची राणी एलिझाबेथ आणि प्रिन्स ऑफ वेल्स युवराज अल्बर्ट यांच्या स्वागतासाठी पूर्ण शहर  गुलाबी रंगाने रंगवले होते. तेव्हापासूनच शहराचे नाव गुलाबी शहर म्हणजेच पिंक सिटी असे नाव पडले आहे.


 रणथंबोर :  राजस्थानमधील सवाई माधोपूर जिल्हय़ातील अरवली पर्वत आणि विंध्य पर्वतामध्ये हे राष्ट्रीय उद्यान , व्याघ्र प्रकल्प. बंद असलेली सफारी नुकतीच सुरु  होती.  अधिक  पदरमोड करून  हे   स्थळ आयत्यावेळी घेतले. उघड्या जिप्सी मधून व काही जणांनी उघड्या ट्रव्हलर मधून जंगल दर्शन  घेतले. मोर,इतर पक्षी, हरणं , मोठ्या  मोठ्या  शिंगाची  सांबर, रानगाई ,रानमांजर याचं दर्शन झाले. परंतु ज्याच्या साठी  उत्सुकता होती तो रुसून/  लपून  बसला होता. तो आजूबाजूला  आहे याची  ग्वाही पावलाचे ठसे बघून चालक  देत होता, वेडीवाकडी वळण घेऊन पाठपुरावा चालला होता. मन निराश झालं होतं. इतक्यात दुस-या चालकाचा मेसेज आला.  त्यांना तो दिसला. क्षणार्धात चालकांनी जिप्सी त्या ठिकाणी नेली. तो झाडाच्या  आड स्वस्थ बसला होता. राज्याचाच रुबाब होता. फोटो घ्यायची घाई होती. प्रत्यक्ष दर्शन झाले, प्रतीमा राहून गेली. थोड्यावेळे नंतर स्वारी उठली,मोठी जांभई  देऊन जबडा दाखवला,पुढच्या पायावर ताण देऊन आळस झटकून जंगलाकडे वळला, भेटीची वेळ संपल्याची ती खुण होती. आमच्या सगळ्याच्या चेह-यावर     त्याच्या भेटीचा आनंद दिसत होता. उघड्या वाहनातील  बोचरी हवा आणि थंडी हा एक  अनुभव होता. जंगलातही नियम असतात हे विसरल्यामुळे अतीप्रसंग ओढवणार होता परंतु टळला. 





 जयपूर ते अजमेर  

  अजमेर दर्गा:  अजमेर येथील ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांचा दर्गा हे भारतातील मुस्लिमांचे सर्वांत पवित्र स्थळ आहे. मुस्लिमांशिवाय इतर धर्मातील लोकही या दर्ग्याच्या दर्शनासाठी जात असतात. त्यामुळे एका अर्थी हे स्थळ राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे. हा दर्गा म्हणजे प्रसिद्ध मुस्लिम संत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांची समाधी आहे.  दर्ग्याच्या समोरच मोठी डेंग (भले मोठे पातेले) ठेवले आहे. बादशाह अकबर व जहांगीरने ते दिल्याचे सांगितले जाते. तेव्हापासून आजपर्यंत त्यात काजू, बदाम, इलायची, केशर टाकून खीर  केली जाते व गरीबांना वाटली जाते



 पुष्कर  ब्रह्मदेव मंदिर  राजस्थानातील अजमेर जिल्ह्यात पुष्कर गावात श्री ब्रह्मा चे प्रसिध्द मंदिर आहे. ,पुष्कर तळया च्या काठी बसलेले आहे. एका बाजूला इंद्र (वारीपती) तर दुस-या बाजूला  कुबेर (धनपती)  व्दारपाल आहेत. वेळे चे नियोजन न केल्या मुळे पुष्कर मेळा हुकला.
  ब्रम्ह घाट  - एक दिवस  अगोदरच बाळासाहेब यांच्या अस्थी विसर्जित केल्याचे सागितले.    छानसा जोधपुरी फेटा घेतला





 अजमेर ते बिकानेर                               
 करणीमाता देवूळ :  करणीमाता मंदिर ही नवलाई. बिकानेरहून 30 कि.मी. दूरवर देशनोक गाव.   तिथले करणीदेवीचे मंदिर म्हणजे उंदरांचे  मंदिर. उंदरांना  ‘काबा’  म्हटले जाते. अरे हो उन्दिरात हि भेदभाव आहे. जे मंदिराच्या गाभा-यात आहेत ते  अधिक पुण्यवान व बाहेर आहेत ते कमी पुण्यवान. उंदीराना   दुध मिठाई चा  भोग दिला जातो. मंदिरातील उंदीर बाहेरच्या उंदिराना आत येऊ देत नाहीत.उंदीरा मध्ये सुध्दा आहेरे नाहीरे  चा संघर्ष आहे.





 उंट संशोधन केंद्र   : बिकानेर जिल्ह्यात उंट संशोधन केंद्र  आहे. उंटाच्या  वेगवेगळ्या जाती आहेत. मेवाडी, राजस्थानी , जुनागड(गुजरात ), उंटाचे संग्रहालय , उंटाच्या दुधाचे आईसक्रिम,   दुधाचा चहा विक्री केंद्र  , उंट  सफारी हि आकर्षण. 



  
                                   
बिकानेर          

 जुनागढ (लालगढ )  सन १४८८ मध्ये राव भिकाजी याने वसवलेले हे शहर राजा रायंसंग याने बांधलेला जुनागढ फोर्ट साठी प्रसिद्ध आहे. ३७ बुरूज आणि ९८६ मीटर लांबीची भिंत असलेल्या किल्ल्यातील राजवाडे प्रेक्षणीय. चंद्रमहल, फूलमहाल येथील कांचेवरील नक्षीकाम व आरसे अप्रतिम  
  

  बिकानेर ते जैसलमेर  संपूर्ण दिवस प्रवासात  तंबूत राहण्याची व्यवस्था   (२७)  दुस-या दिवशी पटवारी कि हवेली  गडीसर  तलाव 

 संध्याकाळी थर वाळवंट व सूर्यास्त ,
काही मंडळीनी उंट सवारीचा अनुभव घेतला तर काहींनी  उंटाचा  त्रास वाचविण्यासाठी  उंट गाडीचा आसरा घेतला. वाळवंट छानच पण माणसाच्या गर्दीमुळे  नैसर्गिकता हरवली.   राजस्थानी लोककला कार्यक्रम

      जोधपुर
                       १४५९ मध्ये राव जोधा  यांनी हे शहर वसवले म्हणून  जोधपुर. मेहरान गढ १२५ मीटर उंच पहाडा वर राव जोधा  नि  पाया  भरणी  केली नंतरच्या  मानसिंह , सवाई  जयसिंह    यांनी  वेगवेगळ्या  इमारती बांधल्या. मोती महल ,  सुख महल फुल महल  मेहरान  गढ  (मयूर गढ ) खासगी मालकी   जोधपुर राव जाधोजी वारश्या कडे.
 मेहरान गढ पाहील्या नंतर खरेदीचा  अवघड किल्ला  सर केला. बाधणी ची साडी,ड्रेस मटेरिअल , कॉटन , सिफोन, सिल्क , पल्लू, ब्लौस पीस, किनार ,काठ, पदर  आणि    काय  काय?

 माउंट अबू     सूर्यास्त  Sun Set point







      
                                    नक्कीलेक,    प्रजापती ब्र्हम्कुमारी मंदिर  गुरुशिखर गुरु दत्त मंदिर.



  देलवाडा जैन मंदिर  ११ ते १३ व्या शतकातील  मंदिरं , संगमरवरा  वरील अजोड नक्षीकाम हे विशेष, परिसरात  हर अर्देशवर मंदिर, खरतरसाही पाशवर्नाथ मंदिर आणि  भगवन महावीर स्वामी मंदिर आहेत     ( तीनही  मंदिर छता वरील कोरीव काम लाजबाब.)






 उदयपुर





१ डिसेंबर   हळदीघाट  पाहीला  महाराणा प्रताप यांच्या ऐतिहासिक कामगिरीची आठवण झाली. स्वामी भक्त  चेतक घोडा. 







                           
 उदयपुर चे प्रमुख आकर्षण म्हणजे सिटी पॅलेस आणि लेक पॅलेस.सिटी पॅलेस उदय मिर्झा सिंग ने १५५९ मध्ये पिचोला ह्या सरोवराच्या किनार्‍यावर बांधला. ह्या  महालात हॉटेल, म्युझियम, मंदिर,  आहे  २४ व्या पिढीचे राजे अरविंदसिंह आहेत.





 उदयपुर ते जयपूर (४१८  कि ) संध्याकाळी जयपूरच्या रजई फाक्टोरीत  खरेदी.  खरेदीतील आनंद     दुस-या   कोणत्याच गोष्टीत नसल्याचे जाणवले.



 
 जयपूर  दुपारी २.३०  ते बोरीवली दुस-या दिवशी सकाळी ७.२०.