धर्माचं ढोग हीच अनैतिकता - राजन खान
मी कुठल्याच धर्माचा नाही , देवाचं अस्तित्व नाकारणारा आहे. देव, धर्म आणि जात काल्पनिक आहे. असे प्रतिपादन राजन खान यांनी संजीवनी व्याख्यानमालेत " धर्म आणि नैतिकता" या विषया वर बोलताना केले. ते पुढे म्हणाले, आजपर्यत झालेला सर्व भ्रष्टाचार देव ,धर्म मानणा-या लोकांनीच केला आहे. या देश्यातील 60% लोक गरीब आहेत. सर्व देव मानणारे आहेत तरी देव त्याचं भल्ल का करत नाही? गरीब अधिका अधिक गरीब होत चालले आहेत. भ्रष्टाचारी अधिका अधिक श्रीमंत होत चालले आहेत. आणि देवबाप्पा काहीच करायला तयार नाही . हि या देशाची वाईट अवस्था आहे. या जगात एक हि मुसलमान खरा मुसलमान नाही, एक हि हिंदू खरा हिंदू नाही, एक हि ख्रिश्चन खरा ख्रिश्चन नाही. त्या त्या धर्माचे ढोंग करणारे फार आहेत. गर्वसे कहो म्हणणारे तेवढ्या पुरतेच त्या त्या धर्माचे आहेत. धर्म व त्याचे आचरणाचे नियम इमानदारीने पाळले तर जग बरेचसे शांत होइल. प्रत्येक धर्म मुलभूत पणे एक शिकवण देतो, दुस-या माणसाला माणूस म्हणून वागव, किमंत दे. धर्माचा गर्व मानणारे, सर्वच्या सर्व जण धर्माचे भोत आहेत. खरे धार्मिक नहित. दोन पर्याय आहेत, एक धर्म सोडा व जे जगायचे आहे तसे जगा. किवा विनंती पूर्ण सागणे आहे कि जो धर्म आहे तो तरी निट पाळा , इमानदारीत पाळा. कुठलाच धर्म मरणाला पर्याय देऊ शकत नाही. मारण्या आधी जगणार का हा प्रश्न आहे. मला वाटते बिन धर्माचं नैतिक जगता येते. नैतिकता म्हणजे दुसरं तिसरं काही नसून दुस-या माणसाशी मायेने, आपुलकीने आणि माणसा सारखं वागणे म्हणजे नैतिकता. पाळायचा असेल तर खरोखर धर्म पाळा, नाहीतर धर्म सोडा. धर्माचं ढोग नाही करायचं हेच जास्ती अनैतिक आहे. . आपला धर्म शोधा त्याचा अभ्यास करा व खरोखरचा धर्म पाळा.