Tuesday, 23 April 2013

संजीवनी व्याख्यानमाला 2013

आपल्याला नवा भारत घडवायचा आहे ----- स्वामी विवेकानंद
स्वामी विवेकानंद म्हणतात आपल्याला नवा भारत घडवायचा आहे. आपले देव आता जुने झाले आहेत.  आपल्याला नवा देव ,नवे वेद आणि नवा धर्म  हवा आहे. असे  प्रतिपादन  डॉ दत्तप्रसाद दाभोलकर  यांनी  संजीवनी व्याख्यानमालेत पाहिलं पुष्प गुंफताताना केले. पुढे  म्हणाले  वयाच्या तिसाव्या वर्षी  स्वामी  विवेकानंद सांगतात कि माझा देश व त्याला झालेला रोग व त्यावरील  औषध   मला समजलेले  आहे. त्यासाठी नव्या रचनाचा स्वीकार करायला हवा. बुद्धदेव पासून राजा राममोहन राय पर्यंत सर्व समाज सुधारकांचे प्रयत्न फसले कारण त्यांनी धर्मावर आघात केला. आपल्याला धर्माचा आधार घेऊन धर्मातील अपप्रवृत्तीवर आघात करावा लागेल.





 माणसाने आयुष्यात यश कसं मिळवावे हे विवेकानंदाचं  आयुष्य आपणास सागते. सगळ्या प्रतिकूल परिस्थितून मार्ग काढून स्वामीजी सर्व धर्म परिषदेत विजय पताका फडकावतात. यश मिळवण्यासाठी  आयुष्यात चार गोष्टी येतात. तुम्ही नशीब मानत नाही परंतु नियती मानता म्हणजे Theory of Probability किंवा भगवत गीता ज्याला "दैवम चैवात्र पंचमम' म्हणते.  म्हणजेच   प्रयत्न, निष्ठा, निश्चय आणि भक्तीच्या सहाय्याने ध्येयप्राप्तीकडे मार्गक्रमणा करणे. दुसरी गोष्ट प्रचंड कष्ट करावे लागतात.  कष्टाला पर्याय नसतो. तिसरी गोष्ट तुमच्या विषयावर तुम्ह्ची विलक्षण पक्कड असावी लागते. चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा स्व:ता वर प्रचंड विश्वास असावा लागतो, मी हे करीनच.
 

No comments:

Post a Comment