Monday, 28 April 2014

संजीवनी व्याख्यानमा​ला २०१४ - पुष्प दुसरे

कलाक्षेत्र आणि सर्वसामान्य नागरिक या मधील रसिकपणाचा, आस्वादाचा धागा जोडला गेला  पाहिजे - वासुदेव कामत


पहिल्यादा चित्रं पाहणं सुरु करावं आणि मग वाचणं सुरु करावं. चित्र पाहण्यासाठी थोडा वेळ दिला पाहिजे. आपल्या आत रसिकता असते ती
समजून  घ्यायला हवी.  असे  चित्रकार वासुदेव कामत यांनी मुलाखतकार विनायक परब यांच्या प्रश्नाला उत्तर देताना, संजीवनी व्याख्यानमालेत  सागितले. ते पुढे म्हणाले कि सूर्यास्ताची वेळ आहे , आकाशात ढग आहेत , ढगावर पडलेल्या  प्रकाशा मुळे  आकाशाच्या अवकाशात झालेली  रचना  आपण पाहत असतो. पावसाळ्याचे दिवस आहेत, पाऊस थांबलाय , रस्त्यावरील खड्यात साचलेल्या  पाण्यावरती पेट्रोलचे   , डिझेलचे  थेंब  पडले आहेत त्यानं इंद्रधनुष्य  सारखे वेगवेगळे आकार आणि  रंग आपण पाहत असतो.  कधी समोरच्या दृश्याला  प्रश्न करत नाही कि  याचा अर्थ काय? आपण या सर्वाचा आस्वाद,आनंद  घेत असतो. अश्या प्रकारे चित्राचा आनंद घ्यायला शिकायला पाहिजे.
 





कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री विलास नाईक होते. प्रास्ताविक व पाहुण्याची ओळख आनंद पाटील यांनी करून दिली. सुत्रसंचलन कु. पल्लवी नाईक  नी केले तर सौ तेजल पाटील  नी  ईशस्तवन सादर केले. 

संजीवनी व्याख्यानमा​ला २०१४


अर्थविषयक जाणीवा प्रगल्भ करण्याशिवाय पर्याय नाही  -   गिरीश कुबेर 
 
आपल्यला जर प्रगती करावयाची असेल तर अर्थविषयक जाणीवा प्रगल्भ करण्याशिवाय पर्याय नाही  राजकारण दुय्यम आहे प्रत्येक  जागतिक घडामोडीत , राजकारणाला  एक महत्वाचा पदर असतो तो    आपल्या पुढे   येत नाही    आणि तो केवळ अर्थकारणाचा पदर असतो. त्याच्या कडे जास्तीत जास्त लक्ष देणे गरजेचे आहे असे प्रतिपादन श्री गिरीश कुबेर यांनी संजीवनी व्याख्यानमालेचे उद्घाटन करताना काढले.  जग अर्थव्यवस्थे भोवती फिरतं, आपल्याला सगळं कळतं परंतु  अर्थकारण समजत नाही. त्याचा फटका आपणास बसतो. मराठी समाजाला "एम" विटामिन ची कमतरता आहे. त्यामुळे आपण अर्थान्धळे झालेलो आहोत.
 
जगाचा इतिहास जो घडलेला आहे , वर्तमान जो घडतोय तो आर्थिक  ताकदीतून घडलेला आहे.  या सगळ्या पाठचे पहिले कारण  असते ते अर्थकारण ह्याची जाणीव  आपण करून घेणे  आवश्यक  आहे.



कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री नितीन पाटील होते. प्रास्ताविक व  पाहुण्याची ओळख अरविंद पाटील यांनी करून दिली.
 सुत्रसंचलन सौ स्वाती नाईक ह्यांनी केले तर सौ तेजल पाटील यांनी  ईशस्तवन सादर केले.  

Friday, 11 April 2014

"प्रतिमा प्रचीती"




photograph that Margaret Bourke-White took of Gandhi in 1946
चित्रकार कवी श्री नितीन दादरावाला याचं विदेशातील पंचवीस छायाचित्रकरांचा  परिचय करून देणारं पुस्तक म्हणजे  "प्रतिमा प्रचीती" .    छायाचित्र कले विषयी साहित्यिक वसंत आबाजी डहाके प्रस्तावनेत म्हणतात  " छायाचित्रकला ही आधुनिक कला आहे. कॅमेरा या यंत्राच्या सहाय्याने या कलाकृती जन्माला येतात. कॅमेरा हे साधन आहे. छाया-प्रकाश हे माध्यम आहे. छायाचित्रा मध्ये एक क्षण गोठवलेला असतो. तो विशिष्ट क्षण ती स्थिती पकडणारा डोळा आणि हात कलावंताचा असतो छायाचित्रात वस्तुस्थिती असते आणि वास्तवाभासही असतो. छायाचित्र देखील जग समजून घ्येण्याचे, जगाचा अर्थ लावण्याचे एक माध्यम आहे. ते सौदर्याचा प्रत्यय घडवते तसेच ते उग्रप्रखर वास्तवाचा साक्षात्कारही घडवते.


दादरावालानी पंचवीस  छायाचित्रकरांच्या  कामाचा आणि जीवनाचा वेध या पुस्तकात घेतलेला आहे.    त्यात आल्फ्रेड स्तिग्लिटस हा अमेरिकन छायाचित्र कलेचा पाया घडवणारा छायाचित्रकार आहे तसेच छायाचित्रामध्य सूक्ष्म सौदर्य पकडणारे मिचेल विसिली आहेत.

काही छायाचित्र वास्तवाचे प्रखर भान आणणारे तसेच माणुसकीला आवाहन करणारे आहेत.  केविन कार्टर याचं "गिधाड आणि मुलगी" हे सुदान येथील दुष्काळ आणि युद्धाची भयानकता दाखविणारे चित्र आहे. हे  चित्रं घेतल्या नंतर केविन म्हणतो " हे देवा मी माझ्या ताटात वाढलेलं अन्न कधीही वाया घालवणार नाही मग त्याची चव कशीही असो."









व्हिएतनाम युद्धाच्या पार्श्वभूमी वर निक उट (Nick Ut) यांनी काढलेले "नापाम गर्ल"  हे चित्र. या चित्रामुळे अमिरेकन जनमत युद्धविरोधी झाले. नापाम नावाचा बॉम्ब किम फुक या नऊ वर्षाच्या मुलीच्या घराजवळ टाकण्यात आला होता. ती ७५% भाजली होती, तिची कातडी सोलून निघाली होती. तिने कपडे काढून टाकले होते.
                   
            अरुण कोलटकराच्या भिजकी वही या कविता संग्रहात किम म्हणून कविता आहे.
 
किम
नऊ वर्षाची पोर एक
चिमुरडी
नापामानं पेटलेला झगा
केव्हाच फेकून दिला होता तू
अंगावरचा ओरबाडून काढून
त्या खाईतून धावत बाहेर येताना
आणि जीवाच्या आकांतानं
नुसती धावत सुटलेली होतीस तू
महामार्गावरून
एका कॅमे-याचं भक्ष्य होण्यासाठी
                                                                                  
                                                                                                कारण तशी तू धावत असताना
                                                                                     जिवंत गिळली तुला
                                                                                     निक युटच्या कॅमे-याने
                                                                                     जिभली चाटत
                                                                                     विद्युतजिव्ह सरड्यानं चटकन
                                                                                     एकादी माशी गिळावी तशी.

जगप्रसिद्ध कलावंताच्या  भारता  सबंधित कलाकृती 
                                 चर्चगेट  स्टेशन १९९५  -  सेबास्टीओ सालगडो (Sebastiao Salgado)


लाईफ मासिका  साठी मार्गारेट बर्क-व्हाईट  ह्यांनी काढलेली छायाचित्रं 

फाळणी १९४७ - पंजाब 
फाळणी १९४७ - नवी दिल्ली स्टेशन 
 

 
 
युसुफ कार्श यांनी केलेली नेहरू आणि इंदिराची पोर्ट्रेट 

Indira Gandhi
by Yousuf Karsh
 , 1956

Tuesday, 8 April 2014

रामप्रहर ते सूर्योदय

                                               
                                                            शांत , प्रसन्न  वातावरण

 









                                                              पक्षांचा किलबिलाट







 

फुलां  फळांची लगड   व कोकिळेचं पार्श्वसंगीत 





 











सोनेरी किरणानी पृथ्वीला न्हाउ   घालणारा अरुणोदय 







  सुनो!!    छायाचित्र   गात आहेत सकाळची भूपाळी!