कमळ हे एक जलपुष्प याला पद्म, नलिन, सारस, पुष्कर, तामरस, अरविंद, शतपत्र, राजीव इ.अनेक नावे आहेत. भारतीय परंपरेचे एक पूजनीय प्रतीक, धार्मिक, कला आणि पौराणिक संदर्भांत कमळपुष्पाला महत्व आहे.
कमळाचे खोड (मूलक्षोड) लांब असून पाण्याच्या तळाशी जमिनीवर सरपटत वाढते, तर पाने पाण्यावर तरंगतात. पाने मोठी, वर्तुळाकार असतात. देठ लांब असतो. पानांवरील शिरा पानाच्या मध्यापासून किरणांप्रमाणे पसरलेल्या असतात.
कमळाची पाने मोठी, वर्तुळाकार व छत्राकृती असून ६०- ९० सेंमी. व्यासाची असतात. पूर्वी कमळाच्या पानाचा वापर पत्रावळी करण्यासाठी करीत असत गावात कमळाच्या पानात पंगती उठत असत.
अलिप्ततेचे प्रतिक म्हणजे कमळपत्र , पाण्यात,चिखलात राहूनही लिप्त न होणारे.
कमळाच्या फुलांच्या पुंकेसराच्या आत पुष्पथाली गुरफटलेली असते.
भोव-याच्या आकाराची ही पुष्पथाली अनेक छोटे-छोटे कप्पे धारण करते आणि प्रत्येकात असतो एक रगीकेसर. पुष्पथालीला सुध्दा अनेक नावं आहेत. पद्मकर्कटी उर्फ कमळकाकडी, तसंच कमलगट्टा अथवा कमळकाकडी. कमळकाकडीच्या प्रत्येक कप्यात कालांतरानं एक बी तयार होतं.
कमळ हे सुंदरतेचे प्रतिक आहे, म्हणूनच सौंदर्याचे वर्णन करताना दिलेल्या उपमा बघा - मुखकमल, चरणकमल , करकमल , ह्र्दयकमल कमलनयन पदकमल इत्यादी
विष्णुपत्नी श्रीलक्ष्मी चे निवासस्थान कमळ आहे असे म्हणतात, म्हणूनच तीला कमला, पद्मा अशी नाव आहेत.. गौतम बुद्ध , बोधिसत्व यांचे कमळ पुष्पं आवडते होते. योगशास्रा मध्ये उमललेलं कमळ पुष्प हे शरीरातील ष्टटचक्रे जागृत झाल्याचे प्रतिक मानतात.
निर्मळ तलावातील मनाला आकर्षित करणारी सुंदर कमलपुष्प. खोदकाम सुरु असल्यामुळे अगदि जवळ जाण्याची संधी मिळाली.
No comments:
Post a Comment