६ जुलै २०१४ महिन्याचा पहिला रविवार, म्हणजेच आपले मित्र, मार्गदर्शक व तत्त्वज्ञ असलेल्या वृक्षांचा वाढदिवस. श्री सायनेकर सरांच्या प्रेरणे तून जुलै २००५ साली वृक्ष संवर्धन प्रकल्प निर्मळ येथे श्रीमत शंकराचार्य मंदिर परिसरात राबवण्यास सुरवात झाली, त्याला नऊ वर्ष झाली. श्री बबनशेठ नाईक यांच्या अमृतमहोत्सवीवर्षाचं औचित्य साधून त्यांच्या हस्ते वृक्ष रोपण करण्यात आले. या वर्षी ताम्हन , अर्जुन ,पारिजात इत्यादी झाडे लावली.
वृक्षरोपण करताना श्री बबनशेठ नाईक |
६ जुलै २०१४ महिन्याचा पहिला रविवार, म्हणजेच आपले मित्र, मार्गदर्शक व तत्त्वज्ञ असलेल्या वृक्षांचा वाढदिवस. श्री सायनेकर सरांच्या प्रेरणे
वृक्षरोपण करताना श्री नितीन पाटील |
वृक्षरोपण करताना : श्री वसंत नाईक , श्री अनंत पाटील |
वृक्षरोपण करताना श्री सतीश चुरी |
कार्यक्रमाला उपस्तिथ असलेली मित्रमंडळी |
तीन महिन्यात नर्मदा परिक्रमा पूर्ण केलेले श्री सतीश चुरी उपस्थित होते. त्यांनी आपल्या ओघवत्या शैलीत अनुभव कथन केले. त्यांनी नर्मदा मैयाचे वैशिष्ट , नर्मदा परीक्रमेचे पाळावयाचे नियम, त्यातील एक म्हणजे नर्मदा मातेचं सतत दर्शन , प्रवासात भेटणारी साथ संगत , योगायोग , कडू, गोड आठवणी सांगितल्या. उपस्तीथ सर्वांनाच नर्मदा परिक्रमेचा अनुभव घ्यावा असे वाटून गेले.
या प्रसंगी जग किती सुंदर आहे, त्यामध्ये झाडांचे , निसर्गाचे योगदान कसे आहे. याच वर्णन असलेली दोन गीतांची प्रत उपस्थितांना देण्यात आली. ती गीतं म्हणजे "देवा तुझे किती सुंदर" आणि " What a Wonderful World".
देवा तुझे किती सुंदर
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो
सुंदर चांदण्या, चंद्र हा सुंदर
चांदणे सुंदर पडे त्याचे
सुंदर ही झाडे, सुंदर पाखरे
किती गोड बरे गाणे गाती
सुंदर वेलींची सुंदर ही फुले
तशी आम्ही मुले देवा तुझी
इतुके सुंदर जग तुझे जर
किती तू सुंदर असशील
सुंदर प्रकाश सूर्य देतो
सुंदर चांदण्या, चंद्र हा सुंदर
चांदणे सुंदर पडे त्याचे
सुंदर ही झाडे, सुंदर पाखरे
किती गोड बरे गाणे गाती
सुंदर वेलींची सुंदर ही फुले
तशी आम्ही मुले देवा तुझी
इतुके सुंदर जग तुझे जर
किती तू सुंदर असशील
कवी
|
-
|
Louis Armstrong – What A Wonderful World
I see trees of green, red roses too
I see them bloom for me and you
And I think to myself what a wonderful world.
I see skies of blue and clouds of white
The bright blessed day, the dark sacred night
And I think to myself what a wonderful world.
The colors of the rainbow so pretty in the sky
Are also on the faces of people going by
I see friends shaking hands saying how do you do
They're really saying I love you.
I hear babies crying, I watch them grow
They'll learn much more than I'll never know
And I think to myself what a wonderful world
Yes I think to myself what a wonderful world.

हिरवीगार दिसतात झाडं, लाल गुलाब उठून दिसतात
तुझ्यासाठी, माझ्यासाठी, बघ कसे फुलून येतात.म्हणतो मी स्वत:शीच मग, कसं अद्भुत सुंदर आहे हे जग
लख्ख निळं दिसतं आभाळ,
धवल -शुभ्र दिसतात जल-द
उजळलेले प्रसन्न दिवस, धीर गंभीर रात्री गडद
म्हणतो मी स्वत:शीच मग, कसं अद्भुत सुंदर आहे हे जग
खुलतात रंग इंद्रधनुष्याचे, आभाळात तिथे वर
पण त्याची आभा उजळते इथे साऱ्यांच्या चेहऱ्यावर
करतात मित्र हस्तांदोलन, विचारतात, कसा आहेस तू
खरं तर त्यांना म्हणायचं असतं, दोस्ता, आय लव यू
म्हणतो मी स्वत:शीच मग, कसं अद्भुत सुंदर आहे हे जग
किलबिलाट करताना दिसतात बाळं, दिसतात मोठी होताना
किती शिकून होतील शहाणी!
करताही येत नाही कल्पना
म्हणतो मी स्वत:शीच मग, कसं अद्भुत सुंदर आहे हे जग
भावानुवाद : ललिता बर्वे तुझ्यासाठी, माझ्यासाठी, बघ कसे फुलून येतात.म्हणतो मी स्वत:शीच मग, कसं अद्भुत सुंदर आहे हे जग
लख्ख निळं दिसतं आभाळ,
धवल -शुभ्र दिसतात जल-द
उजळलेले प्रसन्न दिवस, धीर गंभीर रात्री गडद
म्हणतो मी स्वत:शीच मग, कसं अद्भुत सुंदर आहे हे जग
खुलतात रंग इंद्रधनुष्याचे, आभाळात तिथे वर
पण त्याची आभा उजळते इथे साऱ्यांच्या चेहऱ्यावर
करतात मित्र हस्तांदोलन, विचारतात, कसा आहेस तू
खरं तर त्यांना म्हणायचं असतं, दोस्ता, आय लव यू
म्हणतो मी स्वत:शीच मग, कसं अद्भुत सुंदर आहे हे जग
किलबिलाट करताना दिसतात बाळं, दिसतात मोठी होताना
किती शिकून होतील शहाणी!
करताही येत नाही कल्पना
म्हणतो मी स्वत:शीच मग, कसं अद्भुत सुंदर आहे हे जग
No comments:
Post a Comment