Wednesday, 11 May 2016

वेदकाळापासून भारत आर्यावर्त म्हणून ओळखला जातो.

वेदकाळापासून  भारत आर्यावर्त म्हणून ओळखला जातो.   प्रा. आसावरी बापट. 




अलीकडच्या काळात भौगोलिक भूप्रदेश म्हणजे राष्ट्र अशी व्याख्या केली जाते परंतु राष्ट्र म्हणजे केवळ भूप्रदेश नव्हे. जो भूप्रदेश आध्यात्मित दृष्ट्या एका कुटुंबां प्रमाणे बांधला गेलेला आहे. तो प्रदेश म्हणजे राष्ट्र असे मत संस्कृत व कौटिल्य अर्थशास्राच्या अभ्यासक प्रा आसावरी बापट यांनी संजीवनी व्याख्यानमालेत "कौटिल्य , शिवाजी आणि राष्ट्रवाद या विषयावर बोलताना व्यक्त केले. त्या पुढे म्हणाल्या भारताला राष्ट्रवाद हि संकल्पना ब्रिटीश्या कडून मिळाली नसून. १६ महाजनपदा मध्ये  विभागलेला हा प्रदेश सांस्कृतिक विचाराने बांधला गेलेला होता. कौटिल्याने इ. स. पूर्व चौथ्या शतकात राष्ट्र , राज्याची कर्तव्य , अर्थकारण , जनपदाची कर्तव्य इत्यादी संकल्पना कौटिल्य अर्थशास्त्रा मध्ये विशद केल्या आहेत. पुढे त्यांनी शिवाजी महाराज, स्वा. सावरकर यांच्या जीवनातील प्रसंग सांगून राष्ट्रवादाची संकल्पना समजावून सांगितली. राष्ट्रभावना म्हणजे फक्त सैन्यात जाणे नसून आपल्या क्षेत्रात सजग राहणे. वेदात म्हटलं आहे कि राष्ट्रासाठी आम्ही सदैव जागे आहोत.  शेवट करताना त्यांनी ऋग्वेदातील मंत्र सांगितला ज्याचा अर्थ आम्ही सगळे एकत्र राहू , आमच्या मुखातून एकच विचार प्रकट होतील आमची मन एक असतील आमचे संकल्प एक असतील ज्या योगे राष्ट्राला वैभव प्राप्त होईल. 






अध्यक्ष स्थानी  सौ. प्रज्ञा वझे होत्या प्रास्ताविक व  पाहुण्याची ओळख सौ सपना पाटील ह्यांनी करून दिली कु. धनाली जोशी हिने सूत्र संचलन केले






 



कु. रूपल नाईक हिने ईशस्तवन सादर केले. 













वसई जनता व बसीन कॅथोलिक बँकेचे विशेष आभार मानण्यात आले. वसई जनता बँकेचे अध्यक्ष श्री महेश देसाई व श्री संतोष देशमुख उपस्थित होते. सुरवातीलाच  त्याचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं  





Tuesday, 3 May 2016

निर्मळ तलाव - रम्य पहाट ,कमळं आणि पक्षी





रविवार सकाळी निर्मळ येथील विमलतीर्थ या तलावावर फेरफटका मारत होतो, दोन चार पक्षी मित्र आपापले कॅमेरे लावून एकचित्त बसले होते. मी हि मोबईल च्या कॅमेरावरून काही नयनरम्य चित्र घेतली. परंतु पक्षीजगत मझ्या कॅमे-याच्या आवाक्या बाहेरील होते. पक्षांची प्रकाश चित्र वसई पक्षी मित्र पाटील यांची आहेत. फेरफटका मारत असताना वसई रोड येथील एक आजी आजोबा आपल्या लेकी बरोबर आले होते त्यांनी तलावातील कमळ पाहून सागितलं कि अशी कमळ आपल्याकडे कुठं आढळत नाहीत, परंतु त्यांनी मारीशस येथे पाहिल्याचे सांगितले.

निर्मळ -  विमलतीर्थ- तलावातील नयनरम्य कमलपुष्प. ही कमळाची  विशिष्ट  प्रजाती आहे  









लक्ष्मीकमळ   (शास्रीय नाव Nelumbo nucifera )  याची पाने, कमळपुष्प   पाण्यालगत न वाढता हवेत जवळजवळ ३ ते ४ फूट उंच वाढतात 
















आपल्याला   आकर्षित करणारे  हे निसर्गसौंदर्य , पक्षांनाही आकर्षित करत आहे,   तलाव परिसरावर ते  खुश आहेत. 


कमळपक्षी   (Pheasant Tailed Jacana)  
 कमळपक्षी हा दलदलीत, तलावात आणि
कमळवेलींच्या  तळ्यात
आढळणारा साधारण ३१ सें. मी. आकाराचा पक्षी आहे. कमळपक्षी एकट्याने किंवा थव्याने तलावात, कमळवेलींच्या आसापास दिवसभर पोहतांना दिसतात. 






जांभळी पाणकोंबडी (Purple Swamphen) : हा पक्षी पाणकोंबडी प्रकारातील आहे. भारतात विपूल प्रमाणात आढळतो. नदीकाठ, दलदली, तळी ही या पक्ष्याची आवडती वसतीस्थाने आहेत. याच्या जांभळ्या रंगामुळे हा पक्षी चटकन दूरुनही ओळखू येउ शकतो.











धनवर ( Spot-billed Duck ) : भारतात सर्वत्र आढळणारा पक्षी, खुल्या जलाशया पेक्षा कमळांनी वेढलेल्या जलाशयात सापडतात. 










घार  (Brown Kite )   :घार हा पक्षी आकाराने गिधाडापेक्षा काहीसा लहान असून त्याची लांबी ५० - ६० सेंमी. असते. रंग तपकिरी असतो. डोके बसके, चोच आकडीसारखी आणि काळी असते. चोचीच्या बुडाकडील मांसल भाग पिवळसर; डोळे तपकिरी; पाय आखूड व पिवळे असून त्यांवर तपकिरी पिसे असतात. नख्या तीक्ष्ण व काळ्या, पंख लांब व टोकदार आणि शेपूट लांब व दुभागलेले असते. आकाशात उडताना दुभागलेल्या शेपटीमुळे हा पक्षी इतर पक्ष्यांपासून ओळखता येतो. घार एकटी व चार-पाचच्या गटात भटकत असते







करकोच्या (Stork ) :  करकोचे पाणथळी पक्षी, क्रौंच भारतीय संस्कृती मध्ये प्रेमाचे प्रतिक मानले जाते.

 

विश्वातील सजीवसृष्टी - एक शोध

    


विश्वात आपल्या सारखे आपणच  सजीव आहोत - अरविंद परांजपे,

आपल्या आकाशगंगेत मध्ये प्रगत समाज कि ती असू शकतात या  साठी   फ्रॅंक   ड्रेक  या अमेरिकन  शास्रज्ञाने  एक समीकरण मांडले आहे. त्या समीकरणातील सर्व घटकांचा विचार करता, पृथ्वी सोडल्यास इतरत्र कुठेच सजीवसृष्टी आढळलेली नाही. असे प्रतिपादन श्री अरविंद परांजपे यांनी संजीवनी व्याख्यानमालेत विश्वातील सजीवसृष्टी - एक शोध या विषयावर बोलताना केलं  

                                                                                      










विश्वात इतरत्र सजीवाचा शोध शास्रज्ञ घेत आहेत. त्यातील एक प्रयोग १९७४ पासून दक्षिण अमेरिकेतील रेडीओ टेलीस्कोप च्या माध्यमातून सातत्याने आपली माहितीचे संदेश विश्वात पाठविले जात आहेत. अजून पर्यंत इतरत्र सजीव सृष्टी असल्याचा संदेश मिळाला नाही. सजीवाची वैशिष्ट सागताना म्हणाले कि सजीव आपली वंशवृद्धी करतो व संरक्षण करतो. सजीवामध्ये एका पिढी कडून दुस-या पिढीला माहिती दिली जाते. सजीवाच रासायनिक मूळ कार्बन बेस असून कार्बनची साखळी होऊ शकते व उर्जा साठवू व वापरू शकतात. 
आपल्या पृथ्वीचा इतिहास ४.५ कोटी प्रकाश वर्षाचा आहे. सुरवातीच्या एकपेशीय सजीवा पासून ते आजच्या प्रगती पर्यंतचे वेगवेगळे टप्पे त्यांनी समजून सागितले. 


आज माहित असलेल्या विज्ञाना समोर कोणतीही अलौकिक गोष्ट किवा अद्भुत घटना आलेली नाही उदा. विज्ञाना समोर भूत आलेलं नाही किंवा विज्ञानासमोर देव हि कल्पना आलेली नाही त्याला काही आधार नाही. 


जाताजाता त्यांनी १५ मे २०१६ हा शून्य सावली (Zero  Shadow ) दिवस असल्याचं सागितलं त्या दिवसी १२.३५ मिनिटांनी सूर्य आपल्या डोक्यावर असेल व आपली सावली आपल्या पायाखाली असेल. आपण जरूर अनुभव घ्या !

श्री विष्णू म्हात्रे अध्यक्ष स्थानी होते. अरविंद पाटील यांनी संजीवनीच्या उपक्रमाची माहिती व पाहुण्याची ओळख करून दिली. कुमारी मृगेषा नाईक हिने सूत्र संचलन केले तर कुमारी जुईली पाटील हिच्या इशस्तवनाने कार्यक्रमाची सुरवात झाली.   बसीन कॅथोलिक व वसई जनता या वसईतील अग्रगण्य बँकाचे  संजीवनी व्याख्यानमाला २०१६ साठी विशेष सहकार्य लाभले आहे.