धम्महॉल,धम्मवाहिनी टिटवाळा
पाली भाषेत पश्यना म्हणजे पाहणे , विपश्यना म्हणजे विशेष पाहणे जे आहे जसे आहे तसे पाहणे म्हणजे सत्याचे आकलन करणे , सत्याचे दर्शन घेणे.
मनातील विकारामुळे जीवन दु:खी आहे, संघर्षमय आहे व्याकूळ, अशांत आहे. विकार जाणून घ्यायला हवेत.
आपल्या आजूबाजूला घडणा-या घटनांचा आपल्या पाच इंद्रिय व सहावे मन याच्या वर परिणाम होत असतो त्यातून विकार उध्दभवत असतात.
मनाला सतत हवे, नको पणानी घेरलेले असते.
मन जेव्हा जेव्हा अशांत असते तेव्हा आपला श्वासोश्वास अनियमित होत असतो.मनाचा आणि श्वासोश्वासाचा घनिष्ट सबंध आहे. मन जाणण्या साठी श्वासाचा अभ्यास म्हणजेच आनापन.
नाक , नाकपुड्या , वरचा ओठ या त्रिकोणा वर लक्ष केंद्रित करून श्वासाचा अवन गमन याचं अवलोकन करायचं तटस्थ पणे निरीक्षण करायचं श्वास थंड आहे, उश्वास गरम आहे, उजव्या नाकपुडीतून , डाव्या नाकपुडीतून कि दोन्ही नाकपुडीतून अवनगमन होतं श्वास धीमा आहे, जलद आहे , श्वासाचा स्पर्श कुठे होतो , काय संवेदना होतात याचं फक्त निरीक्षण.
चित्ताच्या शुद्धते साठी तीन गोष्टी महत्वाच्या. शील , समाधी , प्रज्ञा
शील म्हणजेच सदाचार : सम्यक वाणी (खोटे बोलू नये , दुस-याला दुखवू नये )
कयिककर्म : शरीरिक कर्माची शुद्धता ,अहिंसा , व्यभिचारा पासून दूर
सम्यक उपजीविका , उपजीविकेचे योग्य साधन. (लबाडी चुकारपणा टाळणे )
समाधी सम्यक व्यायाम
सम्यक स्मृती : वर्तमान क्षणाची जागरुकता, सावधानता
सम्यक समाधी : चित्ताची एकाग्रता
प्रज्ञा श्रुतिमय प्रज्ञा वाचून ऎकुन प्राप्त झालेलं ज्ञान
चिंतनमय प्रज्ञा जे वाचले आहे ऎकले आहे ते बुद्धीच्या निकषावर घासून पाहणे.
भावनामयी प्रज्ञा प्रत्यक्ष अनुभूती.
विपश्यना साधनेत अंतर्मुख होऊन मनाने शरीराच्या प्रत्येक अंगाचं डोक्यापासून पायापर्यंत निरीक्षण करायचं, शरीराच्या प्रत्येक अंगावर उमटणा-या संवेदनाचं तटस्थ पणे अवलोकन करायचं, या संवेदना अनित्य आहेत याचा प्रत्यंतर येणाची सुरवात होईल. पंच महाभूतानी बनलेल्या शरीराच्या अणुरेणूत असंख्य घटना घटत असतात.
अस्थिर चित्त व शरीराच्या अणुरेणूत घडणा-या असंख्य संवेदनाचा शांत चित्ताने , सजग, समता पूर्ण मानाने निरीक्षण व संवेदना सुखद असो किंवा दु:खद असो ती नष्ट होणार आहे, क्षणभंगुर याची अनुभूती घेणे आणि त्या विषयी मनातील आसक्ती, लोभ दूर करणे द्वेष न करणे म्हणजेच प्रतिक्रिया टाळणे.
चित्ताच्या चेतनेचे चार भाग आहेत. विज्ञान , संज्ञा, वेदना (संवेदना) , संस्कार. विज्ञान जे जाणण्याचं काम करतं संज्ञा जी ओळख पटवून देते , वेदना संवेदना म्हणजे जाणीव , संस्कार म्हणजे होणारा परिणाम.
विपश्यना म्हणजे चित्त शरीराचं समता पूर्ण मनाने निरीक्षण करणे , जाणणे. वेदनाचा कुठल्याही प्रकारचा संस्कार उत्पन्न होऊ न देण्याचा अभ्यास.
No comments:
Post a Comment