संस्कृत साहित्य अथांग सागर आहे त्यातील दैदिप्तमान रत्न म्हणजे कालिदास असं प्रतिपादन प्रा. डॉ आसावरी बापट यांनी संजीवनी परिवार आयोजित "श्रावणमासी -कालिदास श्रावणी " या कार्यक्रमात केलं. पुढे जर्मन तत्त्ववेत्ता लेखक गटे यांचा संदर्भ देऊन म्हणाल्या "तारुण्याची नव्हाळी आणि परिपक्वता , पृथ्वी आणि स्वर्गाचा आनंद उपभोगायचा असेल तर तुम्हाला तो शाकुंतला नाटकात मिळेल."
इतिहासाच्या नोंदी नसल्यामुळे कालिदासाचा काळ ठरवणे कठीण आहे आणि उपलब्ध लोकसाहित्या नुसार इस पूर्व ३०० ते ६०० दरम्यात असावा. कालिदासाला कवी कुलगुरू , महाकवी म्हटलं जाते.
कालिदासाची दोन महाकाव्य कुमारसंभव आणि रघुवंश , दोन खंडकाव्य मेघदूत आणि ऋतुसंहार आणि तीन नाट्यसंहिता ‘मालविकाग्निमित्र’, ‘विक्रमोर्वशीय’ आणि ‘अभिज्ञान शाकुन्तल’
त्या पुढे म्हणाल्या दोन दिवसात कालिदासाचं साहित्याविषयी बोलणं म्हणजे कालिदासावर आणि माझ्यावर अन्याय आहे.
पहिल्या दिवशी त्यांनी दोन महाकाव्य कुमारसंभव , रघुवंश हि काव्य थोडक्यात विषद केली. राजधर्म सांगणा-या दोन श्लोकांचे निरूपण केलं ,कवी आणि साहित्यिक म्हणून कालिदास कसे प्रगल्भ होत गेले हे उदाहरणा सहित सांगितले. आणि आपल्या निवेदनानं शकुंतला हे नाटक प्रत्यक्ष उभं केलं
संस्कृत भाषेचं वैभव उभे करताना त्यांनी काही उदाहरणं दिली जसं अरण्य (रण नाही ते ) पत्नी दारा कलत्र ,नेमकं शब्द नियोजन हे कालिदास वैशिष्ट्य असल्याचं सांगितले.
दुसरे पुष्प मेघदूत वर गुंफताना मॅडम म्हणाल्या कालिदासचं मेघदूत हे सर्वात जास्त भाषांतर झालेलं काव्य आहे त्याच्यावर ९२ टीका प्रसिद्ध झाल्या आहेत. (टीका म्हणजे अभ्यासपूर्ण विवेचन )
१११ श्लोक ४४४ चरणाचं काव्य.
कुबेराच्या दरबारातील यक्षाला त्याच्या कामचुकारपणामुळे प्रिय व्यक्तीच्या विरहाचा शाप मिळाला आहे. विरहात होणारी तळमळ, काळजी, एकमेकांची ख्याली खुशाली कळावी म्हणून होणारी तगमग, मग कोणाकडून संदेश देता येईल, कोणाला दूत म्हणून पाठवता येईल, कालिदास आपल्या कवी कल्पनेने मेघाला दूत करतो. आणि यक्ष आपला संदेश या दूता करवी आपल्या प्रेयसीला हिमालयात धाडतो. हे काव्याचं कथानक.
ह्या काव्यात निसर्ग आहे , भूगोल आहे. मेघाचं जीवन चक्र आहे. हिमालयातील निसर्ग दर्शन आहे, श्रुंगारच सूचन आहेच, मर्यादाचं पालन आहे.
उपमा कालिदासानंच द्याव्या
सुरवातीलाच हेमंत नाईक याने प्रास्ताविक करताना म्हटलं कि भारतीय जीवन मूल्य , संस्कृती, साहित्य , थोर परंपरांचा वारसा आपल्याला लाभला आहे, त्याची ओळख व्हावी म्हणून संजीवनी श्रावणात अभ्यासवर्गाचं आयोजन करत असते या अगोदर श्री सायनेकर सरांच्या मार्गदर्शनाखाली भगवतगीता अभ्यास , श्री शांकरदर्शन असे वर्ग झाले त्याचा पुढचा भाग म्हणजे श्रावणमासी कालिदास श्रवणी.
समारोपा समयी कमलाकर पाटील यांनी प्रा. बापट मॅडमचे आभार मानले. त्यांच्याविषयी व श्रोतेवृंदा प्रती कृतज्ञता व्यक्त केली.
No comments:
Post a Comment