दैनंदिन जीवनात कश्याला हवं साहस, धैर्य. आपल्याला काय लढाई करायची आहे. शांततेत, आनंदात, आरामात जगायचं.
तुकाराम महाराज म्हणतात
रात्र दिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर बाह्य जग आणि मन।
बाह्यजग आणि आंतर मन यांचा सतत झगडा सुरु असतो. लढाई नेहमी नसते हे तर नित्य आहे ,या सर्वांना धीराने तोंड देण्याची आवश्यकता असते.
लक्ष देऊन पाहिलं तर रोजच्या जगण्यात किती तरी प्रकारची साहस अंगी बाणवावी लागतात.
शेक्सपियरनी म्हटलं आहे
" शूर एकदाच मरतो तर भित्रा मृत्यू पूर्वी अनेकदा मरत असतो"
रोजच्या जीवनात टक्क टोणपे , टीकेचा भडीमार होत असतो टीकेला सामोरे जायला धैय हवं.
धैर्याने आपण खोट्या अहंकाराला आवर घालू शकतो,
चुकीची मतं,विचार धैर्याने बदलू शकतो,
स्वतः शी आणि इतराशी प्रामाणिक संबंध ठेवण्यास धैर्य मदत करत असते.
आपली स्पष्ट मतं मांडता येतात.
जे स्पष्ट पणे असहमती दर्शवतात ते धोकादायक नसुन जे असहमत असून हि सांगत नाहीत ते अधिक धोकादायक असतात.
तुमच्या कडील सामर्थ्य किंवा अधिकार तुम्हाला साहसी ठरवत नाही, तर साहस ही मानसिकता आहे.
प्रयत्नाने साहसी वृत्ती अंगिकारता येते.
जीवनाच्या अंगाप्रत्यंगात साहस जोपासण्याची आवश्यकता आहे.
स्वतःची चूक स्वीकारायला साहस लागतं
मोठी मोठी स्वप्नं बघायला आणि सत्यात उतरावायला साहस आवश्यक.
इतरांना माफ करण्यासाठी साहस.
दुस-याचा नकार स्वीकारण्यासाठी धैर्य लागतं
प्रम करायला धाडस लागतंय
स्पष्ट बोलायला धैर्य लागतं
योग्य वेळी रागावण्यासाठी धाडस हवंच
विजयात सौजन्य आणि प्रभावात सन्मान राखण्यासाठी धैर्य हवं
शिकण्या शिकवण्या साठी धीर हवा.
आणि वास्तवाचा सामना करण्यासाठी हिम्मत हवीच .
धाडसी वृत्तीने परिस्थिती वर नियंत्रित करता येते.
फक्त लढाई, रणांगणावर नव्हे तर चांगलं जीवन जगण्यासाठी साहस, धैर्य हवं. होय ना?
No comments:
Post a Comment